महत्वाच्या बातम्या
-
Cuttputlli Movie | अक्षय कुमार दिसणार क्राईम मिस्ट्री थ्रिलर चित्रपटात, कटपुतली सिनेमा हॉटस्टारवर रिलीज
Cuttputlli Movie | बॉलिवुडचा सुपरस्टार अक्की म्हणजेच अक्षय कुमार वर्षातुन 5 च्यावर चित्रपट बनवत असतो. अक्षय कुमार, रखुलप्रीत सिंह आणि सरगुण मेहता यांचा कटपुतली सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर नुकताच रिलीज झाला आहे. प्रत्येक चित्रपटांमध्ये आपण अक्षय कुमारची भुमिका पाहतो त्यात तो प्रेमी, फायटर, किंवा ऑफिसर यांसारख्या भुमिका बजावताना आपल्याला दिसून येतो. मात्र यावेळी तो क्राईम मिस्ट्री थ्रिलर चित्रपटामध्ये काम करताना दिसून येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Akshay Kumar New Film Gorkha | अक्षय कुमारचा नवा चित्रपट ‘गोरखा’ | पोस्टर प्रदर्शित
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. त्याच्या पुढील चित्रपटाचे नाव ‘गोरखा’ (Gorkha) असणार आहे. आपल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करताना अक्षय कुमारने (Akshay Kumar New Film Gorkha) त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, “कधीकधी तुमच्यासमोर इतक्या प्रेरणादायी कथा समोर येतात की, तुम्हाला त्यांच्यावर चित्रपट बनवायचा असतो. असाच एक चित्रपट महान गुरखा युद्ध नायक मेजर जनरल इयान कार्डोझोच्या जीवनावर आधारित असेल.
4 वर्षांपूर्वी -
अक्षय, आदित्य ठाकरे आणि पोलीस आयुक्तांची भेट, निराधार वृत्त प्रसिद्ध
अक्षय कुमारने मुंबई पोलिसांसाठी fitness- health tracking devices भेट दिली असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी फेसबूकद्वारे दिली. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत या तिघांची बैठक झाली.
5 वर्षांपूर्वी -
सामान्यांना २ किमीच्या मर्यादा असताना अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकला, चौकशीचे आदेश
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नाशिक दौऱ्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अक्षय कुमार दोन दिवस नाशिकजवळ मुक्कामी होता. अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
फिल्मी अक्षयची जामिया मिलिया विद्यार्थ्यांच्या पोस्ट 'Like'वर फिल्मी प्रतिक्रिया
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध विद्यार्थ्यांची हिंसक निदर्शने आणि विद्यापीठ परिसरातील वाढता तणाव लक्षात घेऊन दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या असून ५ जानेवारीपर्यंत विद्यापीठाला हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: राज यांचा गुढीपाडव्याच्या सभेतील अक्षय कुमारवरील तो आरोप त्याच्याच तोंडून?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला शिवतीर्थावर जाहीर सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या नागरिकत्वावर बोट ठेवलं होतं. त्याचं मूळ कारण होत ते भाजपसोबत त्याचा २०११ पासून जो शिस्तबद्ध खेळ सुरु होता तो त्यांच्या राजकारणाच्या अनुभवातून ध्यानात आला होता. त्यावेळी समाज माध्यमांवर राज ठाकरे यांना लक्ष करण्यात आलं होतं. त्यात भाजप समर्थकांचा मोठा वाटा होता.
6 वर्षांपूर्वी -
गुरु ग्रंथ साहिब अवमान; अक्षय कुमारची पंजाब एसआयटीकडून चौकशी
शीख धर्मीयांचा पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केल्याप्रकरणी पंजाब राज्य एसआयटीकडून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची आज तब्बल २ तास प्रश्नांचा भडीमार करत कसून चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. पंजाब राज्य एसआयटीने अक्षय कुमारला चौकशीदरम्यान तब्बल ४२ प्रश्न विचारल्याची माहिती आहे. परंतु, अक्षय कुमारने पोलिसांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अक्षय कुमारच्या त्या कृत्याचं काय? ते कोणत्या मोहिमेत मोडतं?
सध्या तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर संपूर्ण चित्रपट श्रुष्टि ढवळून निघाली असताना, नाना पाटेकरांवर १० वर्षांपूर्वीच्या गैरवर्तणुकीच्या आरोपांवर बोट ठेवत अक्षय कुमारने हाऊसफुल ४ मधून तूर्तास लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर सुद्धा आरोप झाल्याने पेच अजूनच वाढला आहे. त्यातील नाना पाटेकर यांच्यावरील आरोप सध्या न्यायालयात गेल्याने थोडं सबुरीने घेणं गरजेचं आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी अक्षय कुमारने केलेली कृत्य स्वीकारावी अशी होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
7 वर्षांपूर्वी -
#MeToo : नाना पाटेकर व साजिद खानवर आरोप झाल्याने ‘हाऊसफुल ४’चे दरवाजे बंद?
अभिनेते नाना पाटेकर आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर गैरवर्तणुकीचे जाहीर आरोप झाल्याने त्यांच्यासोबत यापुढे चित्रपटात काम करणार नाही असा निर्णय बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार याने घेतला आहे. त्यामुळे आता #MeToo मोहिमेमुळे झालेल्या आरोप प्रत्यारोपाणानंतर फिल्मी दुनियेतील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘क्यूँके ये सडक किसीके बापकी नहीं?' जाहिराती मागील मूळ संकल्पना एका मराठमोळ्या तरुणीची
जनजागृती! शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या लोकांची जनजागृती करण्यासाठी एक अनोख्या पद्धतीची जाहिरात सध्या प्रसिद्ध होत आहे. त्यात अभिनेता अक्षय कुमार वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या लोकांना थांबवतो, तर हेल्मेट न घालणाऱ्या मुलाला थांबवून विचारतो ‘ये रोड तुम्हारे बाप की नहीं? तो बिना हेल्मेट पहने गाडी क्यूँ चला रहें हो?’ ‘याद रखो ट्रॅफिक नियमोंका पालन करो क्यूँके सडक किसीके बापकी नहीं.’ असे म्हणत अक्षय कुमारने वाहतूक नियम पाळण्यासंबंधीचा संदेश आणि जनजागृती करण्याची मोहीम आखली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अक्षयने ट्विटर वरून भाजपच्या अडचणी 'डिलीट' केल्या
अक्षय कुमारने त्याची २०१२ मधील एक ट्विट डिलीट केल्याने त्याला नेटिझन्सने चांगलेच धारेवर धरले आहे. कारण २७ फेब्रुवारी २०१२ मधील त्या ट्विट मध्ये अक्षय कुमारने कॉग्रेसच्या काळातील वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवर केलं होतं. सध्या मोदी सरकार असताना देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किंमतीचा भडका उडाला असताना नेटिझन्सने अक्षय कुमारला चांगलाच धारेवर धरलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
गणवेश लिलावामुळे नौदल अधिकारी अक्षय-ट्विंकलवर संतापले
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी नौदल गणवेशाचा लिलाव करून ‘भारतीय नौदलाच्या भावनांशी खेळत’ असल्याचा आरोप करत कायदेशीर सूचना पाठवली आहे.
7 वर्षांपूर्वी -
BLOG - 'अक्षय' राजकारणाचा डाव
अक्षय कुमार हा तसा माणूस म्हणून चांगला त्यात काहीच वाद नाही. किंबहुना त्याने केलेलं सामाजिक काम सुद्धा उत्तमच होतं यात कोणताच वाद नाही. परंतु अक्षय कुमार हा कोणी राजकारणी किंव्हा मुरलेला राजकारणी माणूस नव्हता, त्यामुळे आपल्याबरोबर नक्की काय शिस्तबद्ध शिजतंय याची त्याला कल्पनाच नसावी.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER