महत्वाच्या बातम्या
-
AUKUS Security Alliances | मोदींचा अमेरिका दौरा, पण भारताला AUKUS मध्ये नो एंट्री | अमेरिकेचे स्पष्टीकरण
अमेरिकेने इंडो-पॅसिफिकशी संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसोबत सुरक्षा करार केला होता. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या आक्रमकतेवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीकोनातून या कराराकडे पाहिले जात आहे, परंतु अमेरिकेने भारत किंवा जपानला या भागीदारीत समाविष्ट करण्यास नकार दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत ५० लाखांहून अधिक शालेय मुलांना कोरोनाची बाधा | कोरोना वाढू लागल्याने पालकांत भिती
अमेरिकेत एकूण बाधितांपैकी एक चर्तुथांश रुग्णांत लहान मुलांचा समावेश आहे.‘अमेरिकी ॲकडेमी ऑफ पीडियाट्रिक्स ॲड द चिल्ड्रन हॉस्पिटल’च्या एका अहवालानुसार गेल्या दीड वर्षात देशातील सुमारे ५० लाखांहून अधिक शालेय मुलांना कोरोनाची बाधा झाली असून जुलै महिन्याचा विचार केल्यास तब्बल ७ लाख ५० हजारापेक्षा अधिक मुलांना संसर्ग झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत ग्रीन कार्डसाठी नवीन विधेयकाची तयारी | फीस देऊन नागरिकत्त्वाचा मार्ग होऊ शकतो मोकळा
अनेक वर्षांपासून अमेरिकेचे नागरिकत्व शोधत असलेल्या लोकांसाठी काही दिलासादायक बातमी आहे. अमेरिकन संसद एका विधेयकावर विचार करत आहे ज्यामध्ये ग्रीन कार्डची वाट पाहणाऱ्या लोकांना काही शुल्क आणि काही अटी पूर्ण केल्यानंतर नागरिकत्व मिळेल. खरंतर, विधेयक अद्याप अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या प्रक्रियेस बराच वेळ लागू शकतो. ग्रीन कार्डचा बॅकलॉग खूप मोठा असतो आणि लाखो लोक विशेषत: आयटी व्यावसायिक त्याला बळी पडतात. त्यांना पुन्हा पुन्हा त्यांच्या कामाच्या व्हिसाचे नूतनीकरण करावे लागते.
3 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत लहान मुलांवर कोरोनाचा कहर | 7 दिवसात 1.80 लाख मुलांना कोरोना | श्वासाचाही त्रास | डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द
अमेरिकेतील 34 राज्यांमध्ये मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. पहिल्यांदाच, रुग्णालयांमध्ये गंभीर आजारी मुलांची गर्दी होत आहे. या मुलांचे वय दोन महिने ते 12 वर्षे आहे. मात्र, अनेक रुग्णालयांना उपचार देणे कठीण होत आहे. सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत आहे. एक म्हणजे साथीच्या आजारामुळे ते आपल्या पालकांपासून दूर आहेत आणि आजारपणामुळे त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. गंभीर आजारी मुलांना ऑक्सिजन दिला जात आहे. अनेक मुले व्हेंटिलेटरवर आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Kabul Airport Attack | दहशतवाद्यांना जबर किंमत मोजावी लागेल, सोडणार नाही - जो बायडेन
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर गुरुवारी संध्याकाळी दोन आत्मघाती हल्ले झाले. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 80 जण ठार झाले आहेत तर 200 हून अधिक जखमी झाले आहेत. वृत्तसंस्थेनुसार, इसिस या दहशतवादी संघटनेच्या खुरासान गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यूएस सेंट्रल कमांडचे जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी सांगितले की, मृतांमध्ये 12 सागरी कमांडोचा समावेश आहे, तर 15 जखमी आहेत.
3 वर्षांपूर्वी -
अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी
अमेरिकन सरकारने कोरोनावर लस तयार करण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांना 18 अब्ज डॉलर्स दिले होते. आता अमेरिकाजवळ 5 लसी असून त्यांना रेकॉर्ड टाईममध्ये तयार करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर बायडेन सरकार आता कोविड 19 च्या टॅबेलट बनवण्याची तयारी करत असून यासाठी 3 अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. या गोळ्या सुरुवातीलाच कोरोनाच्या विषाणूला नष्ट करणार आहे. यामुळे लाखो लोकांचे जीव वाचणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
भारतात कोरोनाची त्सुनामी | देश भयानक वळणावर येताच अखेर अमेरिका भारताच्या मदतीसाठी तयार
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.
4 वर्षांपूर्वी -
लशीच्या कच्च्या मालावर अमेरिकेकडून निर्यात बंदी | प्रथम अमेरिकेन लोकं | भारताच्या लस मोहिमेची कोंडी
कोरोना साथ सुरू झाल्यापासून विविध देशांना लस निर्यात करणारा भारत आता कोविड १९ प्रतिबंधक लस आयात करणारा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा मोठा देश ठरला आहे. आतापर्यंत या महिन्यात भारताने १.२ दशलक्ष लस मात्रा निर्यात केल्या आहेत. जानेवारी ते मार्च दरम्यान भारताने ६४ दशलक्ष मात्रा परदेशात पाठवल्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकेतील हिंसाचारावेळी तिरंगा फडकावणाऱ्या 'भक्ताची' ओळख पटली
अमेरिकेची संसद काँग्रेसने इलेक्टोरल कॉलेजच्या निकालाला गृहित धरत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. आता सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष पद सोडण्यास नकार देणारे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अखेर खुर्ची खाली करण्याची तयारी दाखवली. दरम्यान याआधी (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये (US Capitol Violence) ट्रम्प समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला होता.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकेच्या राजधानीत हिंसाचार | त्यात दिसला तिरंगा | ट्विटरवर 'भक्त' ट्रेंडिंग
अमेरिकेची संसद काँग्रेसने इलेक्टोरल कॉलेजच्या निकालाला गृहित धरत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आता सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष पद सोडण्यास नकार देणारे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अखेर खुर्ची खाली करण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान याआधी आज (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये (US Capitol Violence) ट्रम्प समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला.
4 वर्षांपूर्वी -
ट्रम्प समर्थकांचा राजधानीत राडा | वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लागू
अमेरिकेत झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं राजकारण संपायला तयार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप लावला आहे. सोबतच आता ट्रम्प त्यांच्या समर्थकांसोबत मिळून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगसमोर मोठ्यासंख्येने जमा होत राडा घातला. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | अमेरिकेत बेरोजगारांना दरमहा तब्बल ८८ हजारांचा भत्ता मंजूर
आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने नावाप्रमाणे कोरोना निर्मूलन आणि अर्थव्यवस्था सावरण्यासाठी ९०० अब्ज डॉलर्सचे (६६३ लाख कोटी) महाकाय आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. उद्योग धंदे, बेरोजगार आणि गरजू नागरिकांना या पॅकेजमधून आर्थिक मदत केली जाणार आहे. ज्यात बेरोजगारांना दर आठवड्याला ३०० डॉलर्सचा भत्ता दिला जाणार आहे. या पॅकेजमुळे दर महिन्याला बेरोजगारांना जवळपास १२०० डॉलर्स (८८००० रुपये) मिळणार आहे. यामुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढून बाजारपेठेला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
4 वर्षांपूर्वी -
पाऊस पडला इतिहास घडला | जो बायडन नवे राष्ट्राध्यक्ष | मोदींचे मित्र पराभूत
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन ( joe biden ) अखेर विजयी झाले आहेत. यानंतर जो बायडन यांनी अमेरिकेचे जनतेला संबोधित करत संदेश दिला. अमेरिकेच्या जनतेने माझ्यावर आणि आपल्या सहकारी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांच्यावर जो विश्वास दर्शवला त्यासाठी आपल्याला प्रचंड अभिमान वाटतो. संपूर्ण देशाने एकजूट होण्याची हीच योग्य वेळ आहे, असं जो बायडन देशवासियांना संबोधित करताना म्हणाले. बायडन यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी हा पुढच्या वर्षी म्हणजे २० जानेवारी २०२१ ला पार पडणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांचं आडमुठे धोरण | बायडेन यांना आत्ताच राष्ट्राध्यक्ष दर्जाची सुरक्षाव्यवस्था
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होण्यासाठी किमान २७० इलेक्टोरल कॉलेज व्होट आवश्यक असतात. बायडेन (Joe Biden) यांनी एकूण २६४ इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळवले आहेत. दुसरीकडे ट्रम्प यांना आतापर्यंत २१४ इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळाले आहेत. दरम्यान अध्यक्षीय निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी निर्णायक आणि ट्रम्प यांनी धोबीपछाड करणारी आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत दिसताच त्यांना राष्ट्राध्यक्ष दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बायडेन यांचा विजय नक्की मानला जात आहे | पण ट्रम्प यांच्या मनात काय शिजतंय?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होण्यासाठी किमान २७० इलेक्टोरल कॉलेज व्होट आवश्यक असतात. बायडेन (Joe Biden) यांनी एकूण २६४ इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळवले आहेत. दुसरीकडे ट्रम्प यांना आतापर्यंत २१४ इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी असलेले बायडेन २००९ ते २०१७ या कार्यकाळात अमेरिकेचे उपाध्यक्ष होते. या कार्यकाळात बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ओबामांच्या नंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्षपदी (US President Donald Trump) विराजमान झाले.
4 वर्षांपूर्वी -
जॉर्जियात बायडेन यांना आघाडी | डोनाल्ड ट्रम्प समर्थकांची चिंता वाढली
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची चुरस अजून देखील संपलेली नसून मतमोजणी सुरूच आहे. अजून देखील काही महत्वाच्या राज्यात मतमोजणी सुरु आहे. महत्वाचं म्हणजे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्या दरम्यान अत्यंत कमी फरकाने झुंज दिसत असली तरी आता जो बायडेन यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांना मोठा धक्का | जॉर्जिया आणि मिशिगनमध्ये कोर्टाने याचिका फेटाळली
अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर सर्वच जगाचं लक्ष निकालांकडे लागलं आहे. विशेष म्हणजे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पायउतार होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांचे स्पर्धक जो बायडन विजयाच्या टप्यात येऊन उभे राहिले आहेत. परंतु ट्रम्प मतगणनेच्या विरोधात थेट कोर्टात गेल्याने अंतिम निकाल येण्यासाठी खूप विलंब होतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ज्यो बायडन विजयाच्या दिशेने | बहुमताच्या २७० इलेक्टोरल मतांपैकी २६४ प्राप्त | केवळ...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणीला कालपासूनच सुरुवात झाली आहे. दरम्यान, सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
ट्रम्प आणि बायडन यांच्यात अटीतटीची लढत | पण सत्तांतराचे संकेत
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणीला कालपासूनच सुरुवात झाली आहे. दरम्यान, सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना
अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान ही घटना घडली. वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News