महत्वाच्या बातम्या
-
घ्या! शहांना मित्र पक्षाचं नाव माहित नाही आणि मोदी राहुल गांधींची स्मरणशक्ती काढतात
मागील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोदींनी भाषणादरम्यान राहुल गांधींना त्यांच्या एका उमेदवाराचं नाव चुकीचं उच्चारल्याने तो थेट भाषणाचा मुद्दा बनवला होता. त्यावेळी उपस्थित लोकांना मोदींनी ओरडून ओरडून सांगत होते की बघा काँग्रेस अध्यक्षांना त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचं नाव सुद्धा माहित नाही. वास्तविक मोदी स्वतः सुद्धा सर्व उमेदवारांची नावं वाचून बोलत असतात, पण मला सर्वकाही माहित आहे अशा अविर्भावात असतात.
6 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये भाजप-जनता दल (युनाइटेड) १७-१७ तर पासवान यांना ६ जागा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये राजकीय घटनांनी जोर धरला आहे. त्यानिमित्त बिहारमध्ये सुद्धा एनडीए’दरम्यानचे जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जागावाटपावर आज दिल्लीत या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि जागावाटप निश्चित करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राम मंदिर कधी बांधणार? भाजपा खासदारांकडूनच नैतृत्वाला जाब
आधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर प्रचंड दबाव असताना त्यात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी सुद्धा भर टाकल्याचे समजते. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनीही राम मंदिराच्या निर्माणासाठी नेमकी काय पावले सरकारने उचलली आहेत, असा जाब भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी थेट संसदीय मंडळाच्या बैठकीत विचारला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नैतृत्वाची चांगलीच अडचण झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
'आबरा का डाबरा' जादू संपली, २०१९ला मोदी सभा घेतील तिथे भाजपचा पराभव निश्चित? सविस्तर
सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आला होता, जेव्हा स्थानिक भाजप नेत्यांनी मोदींना सभेला आणू नका अशी विनंती केली होती. सध्या देशातील या ५ प्रमुख राज्यांमधील जनतेने मोदी आणि अमित शहांना अक्षरशः नाकारलं आहे. त्यामुळे काही दिवसात भाजपमध्ये मोदी-शहा हटाव मोहीम सुरु झाल्यास आश्चर्य वाटायला नको असं राजकीय तज्ज्ञांना वाटत आहे.
6 वर्षांपूर्वी -
५ राज्यांमध्ये पोस्टल मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर
५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या पोस्टल मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर असल्याचं वृत्त आहे. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता येईल असा अंदाज होता. दरम्यान, राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीत अलटुनपालटुन सरकार स्थापन होतात तोच ट्रेंड या निवडणुकीत कायम राहील असं चित्र आहे.
6 वर्षांपूर्वी -
५०% पेक्षा जास्त आरक्षण नाही, सुप्रीम कोर्टाने तेलंगणा सरकारला झापले
सुप्रीम कोर्टाने तेलंगणा राज्य सरकारला मुस्लीम आरक्षणावरून चांगलीच चपराक दिली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये ६७ टक्के आरक्षण बहाल करण्याची मागणी एका याचिकातर्फे कोर्टाकडे करण्यात आली होती. सदर प्रकरणी कोर्टात सुनावणी पार पडली. त्यात, ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यात येणार नाही असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणात तुम्हीच जिंकणार ना 'राव', मोदी-शहा-योगींना तेलुगू जनता लांबच ठेवणार?
तेलंगणात विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा टीआरच्या हाती सत्ता जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तेलगू जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांना स्पष्ट नाकारल्याचे चित्र समोर येऊ शकते. त्यामुळे दक्षिणेच्या राजकारणातील भाजपच्या प्रवेशाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप एमपी'त बाहेर, राजस्थानात सुपडा साफ तर तेलंगणात क्लीन बोल्ड होणार?
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगण या ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे. आता उत्सुकता आहे ती, ११ तारखेच्या निकालांची. आता विविध वाहिन्यांचे एक्झिट पोल अंदाज येण्यास एकामागे एक सुरुवात झाली आहे. त्यानुसार मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांची सत्ता भारतीय जनता पक्षाला गमवावी लागेल असं चित्र आहे. तसे झाल्यास भारतीय जनता पक्षासाठी आणि मुख्यत्वे मोदी आणि अमित शहांना तो मोठा धक्का असेल असं म्हटलं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणात तब्बल १२० कोटी जप्त; मतदानाच्या आधी आला बेहिशेबी पैसा?
तेलंगणात मतदानाला काही तास उरले असताना काल सकाळी तेलंगणात पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ३ कोटी रुपये जप्त केले. सदर प्रकरणी एकूण ८ जणांना पोलिसांनी विभागाने ताब्यात घेतलं आहे. असं असलं तरी प्राथमिक अंदाजानुसार ही रक्कम कर्नाटकातून आली असल्याचे पोलिसांनी मत व्यक्त केले आहे. पण पकडण्यात आलेली रक्कम कोणत्या पक्षाशी संबंधित आहे का? यावर काही माहिती समजू शकलेली नाही.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: मराठा आरक्षणात दगा होणार? शहांच्या तोंडून कायद्याचं अप्रत्यक्ष बिंग फुटलं?
देवेंद्र फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाला अधिकृत मान्यता दिली असली तरी अमित शहांच्या तेलंगणातील भाषणादरम्यान एकप्रकारे घटनात्मक आणि न्यायालयीन बिंग फुटल्याची शंका प्रसार माध्यमांवर व्यक्त होऊ लागली आहे. अनेक घटनातज्ञांच्या मतानुसार मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर ठाम पणे टिकण्यासाठी ते ओबीसीमध्येच नवा प्रवर्ग करून देणे गरजेचे होते. तसेच त्यासाठी ओबीसींच्या एकूण राखीव कोटय़ामध्येच वाढ करून, त्यासाठी भारताच्या संसदेत अधिकृतपणे कायदा करणे गरजेचे होते.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: भाजप नेते कपाळावरील हिंदू धर्माचं मंगल-प्रतीक स्वस्तिक पुसून, स्वस्तिकवर उभे रहात आहेत
सध्या सुरु असलेल्या राजस्थान निवडणुकीत हिंदुत्ववादी पक्ष म्हणून प्रचार करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते या कारणाने वादात अडकण्याची शक्यता आहे. याआधी छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मंदिरांना भेटी देत असताना पुजाऱ्याने कपाळावर काढलेले स्वस्तिक चिन्हं लगेचच पुसून टाकत आहेत. तसेच भाजप अध्यक्ष आमित शहा तर भाषणासाठी स्वस्तिक असलेल्या पाटावरच उभे राहून भाषण करत असताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गुजरात सोहराबुद्दीन चकमक: अमित शहा सुद्धा कटात होते, पण कागदोपत्री पुरावे?
कथित गुंड सोहराबुद्दीन शेख आणि त्याचा साथीदार तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट चकमकीचा कट रचणाऱ्यांमध्ये मुख्यत्वे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष व गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा, डी.जी. वंजारा, राजकुमार पांडियन व एम. एन. दिनेश हे ३ IPS अधिकारी सामील होते. परंतु, हे आरोप सिद्ध करणारे कोणता सुद्धा कागदोपत्री पुरावे नव्हते’, असे CBIचे मुख्य तपास अधिकारी संदीप तामगडे यांनी बुधवारी विशेष CBI न्यायाधीश एस. जे. शर्मा यांच्याकडे नोंदवलेल्या साक्षीत नमूद केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगाल: भाजपाची रथयात्रा रोखणाऱ्यांना आम्ही त्याच रथाखाली चिरडू
पश्चिम बंगालमधील ‘जे लोक आमची रथयात्रा रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही त्याच रथाच्या चाकाखाली चिरडून टाकू’ असं वादग्रस्त वक्तव्य पश्चिम बंगाल राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा लॉकेट चॅटर्जी यांनी यांनी केल्याने खळबळ माजली आहे. मालदा जिल्ह्यात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. भाजपने प. बंगालमध्ये लोकशाही स्थापन करण्याच्या उद्देशाने ही रथयात्रा आयोजित केली आहे असं त्या म्हणाल्या.
6 वर्षांपूर्वी -
भर दिवाळीत भाजपवर 'राज'कीय फटाके, भाजप IT सेल चवताळण्याची शक्यता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष केलं असून त्यांना नरकासुर असं म्हटलं आहे. व्यंगचित्रात अमित शहा हे भाजपाला पडलेलं दिवाळी स्वप्न असून, अमित शहा हे नरकासूर असल्याचा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशात भाजप ४० पेक्षा अधिक विद्यमान आमदारांना तिकीट नाकारणार?
पुढील महिन्यात राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये होऊ घातलेल्या राज्य विधानसभा निवडणुकांसंदर्भात भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली आहे. दरम्यान, या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते सुद्धा उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहा आणि मोहन भागवत यांच्यात भेट, राम मंदिरावर चर्चा?
आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद आदी महत्वाच्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्याकरिता मोदी सरकारवर दबाव आणला असतानाच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईत भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केल्याचे वृत्त आहे. या बैठकीत राम मंदिर तसेच शबरीमला मंदिर अशा मुद्यावर बराचवेळ चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
पवारांची अमित शहांवर टीका, न्यायालयाचे निर्णय सुद्धा तुम्हाला मान्य नाहीत
पुण्यात एनसीपीच्या संविधान बचाव यात्रेची समारोप सभा आज पार पडली. दरम्यान, या कार्यक्रला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा सुद्धा भाषणादरम्यान समाचार घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
संघ दक्ष! भाजप मध्य प्रदेशात तब्बल ७८ आमदारांना तिकीट नाकारणार? संघाचा सल्ला
मध्य प्रदेशातील भाजप विद्यमान ७८ आमदारांना तिकीट नाकारण्याची शक्यता आहे. आरएसएस’ने केलेल्या एका सर्वेक्षणात त्या ७८ आमदारांवर मतदार प्रचंड नाराज असल्याचं समोर आल्याने आधीच धोका स्वीकार करा आणि त्यांना पुन्हा तिकीट देऊ नका, अशी सूचना आरएसएस’ने भाजपला केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश भाजपमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक केवळ दीड महिन्यावर आल्याने आणि त्यात संघाच्या या सल्ल्यामुळे भाजप अजूनच अडचणीत आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहांना आवाहन; आपच्या आणि भाजपच्या विकास कामांची चर्चा रामलीला मैदानावर होऊन जाऊ दे
आपचे नेते तसेच दिल्ली’चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विकास कामांच्या मुद्यावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट रामलीला मैदानावर खुल्या चर्चेचे आवाहन दिल आहे. देशातील पूर्वांचलच्या भागात विकासासाठी मोदी सरकारने काय केले याचा हिशेब रामलीला मैदानावरील पूर्वांचल महाकुंभामध्ये अमित शहांनी मांडला होता त्याला केजरीवाल यांनी खुलं आवाहन देत, तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं याची खुली चर्चा होऊन जाऊ दे असं म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुन्हा मार्मिक 'राजअस्त्र' : संघ, संस्कार, लोकशाही आणि वर्गाबाहेरील २ विद्यार्थी : सविस्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर एकामागून एक मार्मिक अस्त्र डागण्यास सुरुवात केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा दाखल देत, मोदी आणि अमित शहांच्या एकाधिकारशाहीवर मार्मिक टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार