महत्वाच्या बातम्या
-
ज्यांच्यावर आगपाखड, त्यांचा मातोश्रीवर फोन येताच स्वतः बॅकफूटवर आणि 'भारत बंद'वरून विरोधकांची खिल्ली?
काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या तसेच एकूणच वाढलेल्या महागाईविरोधात आज भारत बंद पुकारला आहे. आज सकाळ पासूनच प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक तसेच बसेस अडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जवळपास देशभरातील एकूण ३१ पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला असला तरी महाराष्ट्रात मनसेने सक्रिय पाठिंबा दिल्याने राज्यात मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदी व भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीतील मतांसाठी वाजपेयींच्या मृत्यूचं राजकारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या निधनाचं राजकारण करत आहेत, असा थेट आरोप वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांनी केल्याने खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
धक्का! शिरोमणी अकाली दलाचा भाजपशी काडीमोड, स्वतंत्र निवडणूक लढणार
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला पंजाबमधील मित्र पक्ष शिरोमणी अकाली दल (एसएडी) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी जोरदार धक्का दिला आहे. आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका शिरोमणी अकाली दल (एसएडी) स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: भाजप मुख्यालयात ध्वजारोहण आणि अमित शहांच्या हातून झेंडा निसटला
आज ७२व्या स्वातंत्र्यदिना निमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते दिल्लीतील भाजप मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. दरम्यान भाजप कार्यालयात अमित शहांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तेव्हा एक चूक घडली आणि अमित शहा टीकेचे धनी ठरत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भाजपची सोशल मीडिया नीती पार्ट २; 'संपर्क फॉर समर्थन' मागील खरी योजना काय? सविस्तर
मागील निवडणुकीत म्हणजे २०१४ मध्ये देशातील सर्व विरोधी पक्ष समाज माध्यम आणि समजा माध्यमांचा निवडणुकीसाठी उपयोग किती मोठ्या स्वरूपात करता येऊ शकतो याबाबतीत पूर्णपणे गाफील होते. सर्वांना गाफील ठेवत भाजपने अक्षरशः समाज माध्यमं २०१४ मध्ये अशा प्रकारे वापरली की, अनेक सुशिक्षित तरुण आणि तरुणी सुद्धा त्यांच्या रणनीतीपुढे भुरळ पडून अडकली.
6 वर्षांपूर्वी -
कोलकाता तापलं! अमित शहांची रॅलीपूर्वी भाजपच्या बसेस फोडल्या : ANI
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित आज कोलकाता येथील माया रोड येथे युवा समावेश रॅलीला संबोधित करण्यासाठी येणार आहेत. परंतु त्यापूर्वीच स्थानिक राजकारण पेटलं असून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर बरोबरच भाजप समर्थकांच्या गाडीच्या काचाही तृणमूलच्या आक्रमक कार्यकर्त्यांकडून फोडण्यात येत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, प्रत्येक बूथ प्रमुखाला २३ सूत्री कानमंत्र: अमित शाह
महाराष्ट्र आणि गोव्यातील भाजप पक्ष विस्तारक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मुंबईमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान अमित शहा यांनी कोणताही सार्वजनिक भाषण न करता पदाधिकाऱ्यांशी वन टू वन असा थेट संवाद साधला.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात भाजपकडून पुन्हा आमदार फोडाफोडी? येडियुरप्पा पुन्हा सक्रिय
भाजपकडून कर्नाटकात पुन्हा सत्ताधारी पक्षातील आमदार फोडाफोडी करून सत्ता स्थाणपणेचा दावा केला जाऊ शकतो. जेडीएस आणि काँग्रेसच्या आमदारांच्या भेटीगाठी सुरु झाल्या असून, त्यांना भाजपमध्ये सामील करण्याच्या हालचालींनी कर्नाटकात जोर धरला आहे.
7 वर्षांपूर्वी -
चाहत्यांना धडे, सोशल मीडियावर नम्रपणे उत्तर द्या
२०१४ मधील भाजपला मिळालेल्या यशानंतर त्यांचे चाहते समाज माध्यमांवर इतके उर्मट झाले की, प्रत्येकाला वेड्यात काढणे हाच त्यांचा एकमेव कार्यक्रम सुरु होता. समाजमाध्यमांवर असणारा प्रत्येकजण त्यांना काँग्रेस समर्थक आहे असच एकूण प्रतिक्रिया देताना कल आहे. याचाच दुसरा परिणाम असा झाला की भाजपची समाजमाध्यमांवर प्रतिमा डागाळण्यास ते एक कारण झालं.
7 वर्षांपूर्वी -
नोटबंदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा हे राज ठाकरेंचे आरोप खरे ठरले? सविस्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भर सभेत भाजपने लादलेली नोटबंदी ही म्हणजे देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. राज ठाकरेंच्या त्या आरोपाला सध्या माहितीच्या अधिकारात बाहेर आलेल्या आकड्यामुळे दुजोरा मिळताना दिसत आहे. कारण भारतात इतक्या सहकारी बँका असताना सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत सर्वाधिक म्हणजे ७४५. ५९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा नोटाबंदीनंतर अवघ्या ५ दिवसांमध्ये जमा झाल्याच माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये एनडीए फुटीच्या उंबरठ्यावर?
२०१९ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूका लक्षात घेता सध्या बिहारमध्ये होणाऱ्या राजकीय घडामोडी एनडीएला डोकेदुखी ठरू शकतात. कारण भाजपप्रणीत एनडीए बिहारमध्ये फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे समजतं.
7 वर्षांपूर्वी -
युतीतले रुसवे-फुगवे दूर, २०१९ नंतर जनतेचे पुन्हां 'अच्छे दिन' येणार?
काल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नियोजित वेळेनुसार सुद्धा ही चर्चा खूप लांबल्याने सर्व काही मनासारखं आणि सकारात्मक झालं असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
सीबीआयला इशरत जहाँ प्रकरणी मोदींना व शहांना अटक करायचं होत
सीबीआयला गुजरातमधील इशरत जहाँप्रकरणी गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांना अटक करायची होत असं खुलासा गुजरातचे माजी पोलीस महानिरीक्षक डी. जी. वंजारा यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सेलिब्रिटीं संपर्कात, महागाईने होरपळणारा सामान्य 'संपर्क क्षेत्राच्या' बाहेर ?
सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानावर आहेत. अमित शहा आज मुंबईमध्ये प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची सुद्धा त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. एकूणच देशभरातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल आणि कर्नाटकातील राजकीय कलाटणीने भाजपची झोप उडाल्याचे चित्र आहे.
7 वर्षांपूर्वी -
अफजल खान व उंदीर यांची उद्या गळाभेट : काँग्रेस
आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. परंतु भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना अनेक वेळा चिखलफ़ेक आणि बोचरी टीका केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या भेटीवर कॉग्रेसने ट्विटरवरून उपहासात्मक टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१९ ची धास्ती, अमित शहा-उद्धव ठाकरे भेट, युतीची चर्चा ?
भाजप अध्यक्ष अमित शहा उद्या संध्याकाळी ६ वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युतीसाठी पुन्हा बोलणी सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाना आगामी निवडणुकीचे नकारात्मक संकेत मिळताच जवळीक साधली जाऊ शकते.
7 वर्षांपूर्वी -
युपीमध्ये भाजपचे 'बुरे-दिन' आल्याचं आकडेवारी सांगते ?
केंद्रात कोण सत्तेत बसणार हे उत्तर प्रदेशातील आकड्यावर बऱ्यापैकी अवलंबून असत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. २०१४ मधील निवडणुकीचा निकाल लक्षात घेतल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजे ७१ जागा असं अभूतपूर्व यश मिळालं होत. परंतु मागील पोटनिवडणुकीची आकडेवारी म्हणजे गोरखपूर आणि फुलपूर आणि त्यानंतर कालच्या कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत आरएलडी’ने भाजपला अक्षरशः धूळ चारली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सेना 'एनडीए'त राहायचं की नाही हा निर्णय घेण्यास स्वतंत्र: अमित शहा
शिवसेना ‘एनडीए’त राहायचं की नाही तो निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत. भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीला सामोर जाण्यास तयार आहे असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लखनऊ मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
7 वर्षांपूर्वी -
भाजपने आता तेलंगणावर लक्ष वळवले
दक्षिणेत पहिल्याच विधानसभा निवडणुकीत सत्तास्थापनेला अपयश आल्याने आता भाजपने आता दक्षिणेतील दुसरं राज्य तेलंगणावर लक्ष केंद्रित केलं आहे. तेलंगणा विधानसभेत एकूण १२० जागा असून सध्या भाजपचं तेथे एकूण संख्याबळ केवळ ५ आमदार इतकंच आहे. परंतु तेलंगणात परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर गुजरात मॉडेल अंमलात आणण्याचा विचार आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपला दणका, 'ती' अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती अवैध
कर्नाटकात भाजपला उद्या बहुमत सुद्धा करायचे असताना त्यांना सर्वोच न्यायालयाने अजून एक दणका दिला आहे. राज्यपालांनी केलेली अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती अवैध असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे भाजपला हा एकाच दिवशी मिळालेला दुसरा दणका असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो