महत्वाच्या बातम्या
-
कृषी कायदे मागे घेण्यास केंद्राचा नकार | शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम
मागील काही दिवस शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली असून, आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठक देखील कोणत्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना आज (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव देणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
आंदोलक शेतकऱ्यांची चिकाटी | अखेर अमित शहांनी बोलावली शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक
‘भारत बंद’ बरोबर व्यापक झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या (All India Bharat Bandh called by protestant farmers) पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Minister Amit Shah) यांनी आज सध्याकाळी ७ वाजता शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली आहे. ९ डिसेंबरला बुधवारी सरकार शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार असताना देखील अमित शहा यांनी ही तातडीची बैठक अचानक बोलावली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिकाटीपुढे सरकार झुकवणार की शेतकऱ्यांची आश्वासनांवर बोळवण होणार ते पाहावं लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमित शहा प. बंगालमध्ये आले | पण बिरसा मुंडांऐवजी दुसऱ्याच प्रतिमेला पुष्पहार घातला
मोदी सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्रीअमित शाह गुरुवारी बंगालच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी आदिवासी बहुल बांकुरा येथे भेट दिली आणि स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. त्यादरम्यान त्यांनी बिरसा मुंडा यांच्याऐवजी दुसऱ्याच प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अमित शकांनी केलेल्या या चुकीने पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने शहांवर तिखट शद्बात टीकास्त्र सोडलं आहे. शहांविरोधात संताप व्यक्त करताना त्यांचा उल्लेख थेट ‘बाहेरचे’ असा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब प्रकरणी भाजपचे सर्व नेते आक्रमक | पण अन्वय नाईकच्या न्यायाबद्दल शांतता
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ माजली आहे. रायगड पोलिसांनी धडक कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दरम्यान, पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, न्यायालयाचे आदेश किंवा समन्स नसतानाही ही धडक कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून यानंतर करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही त्यांना एनडीएतून बाहेर काढले नाही | शिवसेना - अकाली दलच एनडीएमधून बाहेर पडले
“राज्यपालांना आपल्या पत्रात काही वेगळे शब्द वापरता आले असते. काही शब्द टाळता आले असते”, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील धार्मिक स्थळे, मंदिर खुली करण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले होते. या पत्रात राज्यपालांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वावर बोट ठेवले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना पत्रातून सडेतोड प्रत्युत्तर दिले. गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधील हाच पत्रव्यवहार राजकीय वर्तुळात गाजतो आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा AIIMS'मध्ये दाखल | कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
सोमवारी रात्री अमित शहांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याचे समजते. 2 ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर उपचारानंतर 14 ऑगस्टला अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कोरोनावरील उपचार करण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी -
राजस्थानचं भाजप मुठीत घेण्याची मोदी-शहांची खेळी वसुंधरा राजेंनी धुळीस मिळवली? - सविस्तर वृत्त
सध्या भाजपच्या राजस्थानमधील राजकीय खेळीची चर्चा संपूर्ण देशात रंगली आहे. भाजपमधील केंद्रीय पातळीवरील आणि राज्य पातळीवरील नेते मंडळी यामध्ये प्रतिक्रिया देत असले तरी, त्या चर्चेपासून मोदी-शहांनी स्वतःला दूर ठेवलं आहे. जणू राजस्थानात जे घडत आहे त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नसून, जे घडतंय त्यात राजस्थानमधील काँग्रेसमधील अस्वस्थ असलेली नेते मंडळी कारणीभूत आहेत असं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या प्रश्नाला अमित शहांकडून तो व्हिडिओ ट्विट करून प्रतिउत्तर
गलवान खोऱ्यातील संघर्ष सध्या देशातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. भारत चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा सुरू असताना गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना वीरमरण आले होते. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नांचा वर्षावच सुरू केला होता. या सगळ्या वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रश्न उपस्थित करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताचे २० जवान शहीद झाले तरी भाजपच्या व्हर्च्युअल रॅली सुरू होत्या, टीका होताच बंद
पूर्व लडाखमधील भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना चोख उत्तर देताना भारताचे 20 जवान शहीद झालेले आहेत. असे असताना भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी व्हर्च्युअल रॅली सुरूच ठेवल्या होत्या. मात्र काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भाजपाच्या या स्वार्थी राजकारणावर कडाडून टीका करताच आज भाजपाने यापुढील व्हर्च्युअल रॅली रद्द केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राची दुर्गम भागात मदत पोहोचत नाही, पण भाजपच्या प्रचाराचे LED पोहोचतात
देशावर करोनाचं संकट ओढवलं आहे. तर दुसरीकडे काही राज्यातील विधानसभा निवडणुकाही जवळ येऊ लागल्या आहेत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हर्च्युअल रॅलीतून प्रचाराचा बिगुल फुंकला. आउटलूकनं सूत्रांच्या माहितीवरून दिलेल्या वृत्तानुसार शाह यांच्या या व्हर्च्युअल रॅलीसाठी भाजपानं तब्बल १०,००० मोठ्या एलईडी स्क्रीन बसवल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
काही काम न करता नुसती बडबड करणारे चॅम्पियन परतले, अमित शहांना टोला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. केंद्र सरकारच्या योजना पश्चिम बंगालमध्ये लागू केल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमित शाह यांच्या टीकेला तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी उत्तर दिलं असून पश्चिम बंगालला गरज होती तेव्हा कुठे होतात अशी विचारणा केली आहे. फक्त बोलणारे आणि काही काम न करणारे चॅम्पियन असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या रॅलीमध्ये ७२ हजार LED स्क्रीन्स, तब्बल १४४ कोटी खर्च, असा दिला हिशेब
लॉकडाऊनसारखा उपाय योजल्यानंतरही देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाशी लढण्यात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील.
5 वर्षांपूर्वी -
आत्मनिर्भर बोलताही येत नाही, ते देशाला आत्मनिर्भरता शिकवू शकतात का? - काँग्रेस
लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आत्मनिर्भर पॅकेजच्या आकडेवारीबाबत मोदी सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Aatmanirbhar package 20 लाख कोटींचे असेल, असे सांगितले होते. हे प्रमाण देशाच्या एकूण जीडीपीच्या १० टक्के इतके असल्याचेही मोदींनी म्हटले होते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील मिशन 'अजित पवार' अनुभवामुळे भाजपाला मध्यप्रदेशात धाकधूक - सविस्तर वृत्त
मध्यप्रदेशमधील २२ पैकी १३ बंडखोर आमदार काँगेसला सोडचिठ्ठी देणार नसल्याचा दावा पक्षाचे वरिष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी बुधवारी केला आहे. विधानसभेत कमलनाथ सरकार विश्वासदर्शक ठराव निश्चितच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.आम्हीही गप्प बसलेलो नाही किंवा झोपा काढत नसल्याचेही ते म्हणाले. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमधून बाहेर पडले, त्याचप्रमाणे त्या राज्याच्या विधानसभेतील २२ काँग्रेस आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे राज्यपालांकडे पाठविले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
CAA समर्थनार्थ रॅलीमुळे दिल्ली हिंसाचार घडला असे म्हणता येणार नाही: केंद्रीय गृहमंत्री
ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन सोडलं आहे. लोकसभेमध्ये अमित शाह यांनी दिल्लीतल्या हिंसाचारावर भाष्य केलं. दिल्लीतला हिंसाचार हा सुनियोजित कट होता, असा आरोप अमित शाह यांनी केला आहे. दंगल करणारा कोणताच व्यक्ती वाचणार नाही, असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात: २००२ मधील नरोदा पाटिया दंगलीच्या खटल्यातील न्यायाधीशांची बदली
Special SIT Judge MK who is hearing the 2002 Naroda Patiya riots case. Dave has been transferred as the Chief District Judge of Valsad on the orders of the Gujarat High Court. According to a notification issued by the Gujarat High Court on Friday, M.K. Dave has been transferred as the Chief Justice of Valsad district. The Gujarat High Court is facing trial in the 2002 riots in Naroda Patiya in Gujarat. The 32 accused in the case had filed a petition in the High Court. They include former Gujarat minister Maya Kodnani, who was sentenced to life imprisonment by a junior court. This is an overview of what is causing the uproar across the country
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली जळत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठे होते? - शिवसेना
राजधानी दिल्लीतल्या हिंसाचारावरुन गृहमंत्री कुठे आहात असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखामधून विचारण्यात आला आहे. देशाची अर्थव्यवस्था कोसळत असून भडकाऊ भाषणांचे भांडवल आणि त्यांचा बाजार जोरात सुरू असल्याचे अग्रलेखातू नमूद करण्यात आलं आहे. ज्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले, त्या न्यायमूर्तींची बदली केल्याबद्दल सामनामधून टीका करण्यात आली आहे. न्यायालयासही सत्य बोलण्याची शिक्षा मिळू लागली का? असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यामुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम: प्रकाश जावडेकर
दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दिल्लीत झालेला हिंसाचार चिंतेचा विषय असून, केंद्राने जाणीवपूर्वक ७२ तासात कारवाई केली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार: सोनिया गांधी
दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दिल्लीत झालेला हिंसाचार चिंतेचा विषय असून, केंद्राने जाणीवपूर्वक ७२ तासात कारवाई केली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवार दिग्गज नेते, त्यांनी अनेक सरकारे पाडली अन नवी सरकारे स्थापन केली: अमित शाह
दिल्ली विधानसभेतील पक्षाच्या पराभवावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाष्य केले आहे. ‘देश के गद्दारों को’ यासारखी भाषा प्रचारादरम्यान वापरायला नको होती. प्रचाराच्या दरम्यान नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे पक्षाला नुकसान झाले, असे शहांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आम्ही जय-पराजयासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत नाही. भाजप विचारधारा आणि विस्तार यावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम