महत्वाच्या बातम्या
-
गोव्यात देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी राजकीय भूकंप करणार?
देशाच्या राजकारणाला महाराष्ट्रातील महाविकासआघाडीच्या निमित्ताने कलाटणी मिळाली आहे. या महाआघाडीने मोदी-शहा जोडीला अक्षरशः नामोहरम करून सोडले आहे. त्यात महत्वाची भूमिका बजावली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे सर्वश्रुत आहे. मात्र महाराष्ट्रात सत्तापालट करण्यात यश आलेलं असताना आता गोव्याच्या राजकरणात नवी आघाडी जन्माला येणार आहे असं स्वतः संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
'KG टू PG' मोफत शिक्षणावरून आदित्य यांना लक्ष केलं तोच मुद्दा झारखंडच्या जाहीरनाम्यात
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ऑक्टोबर २०१६ रोजी मुंबईतील केजी टू पीजी मोर्चात पूर्वीच्या काँग्रेस सरकार आणि विद्यमान भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या युती सरकारवर देखील प्रचंड टीका केली होती. देशात आणि राज्यात २०१४ मध्ये सत्ताबदल झाला आणि त्यावेळी आपलं सरकार आलं असं वाटलं होतं. मात्र त्यानंतर २ वर्षांत कोणताही बदल न झाल्यानं विराट मोर्चा काढावा लागला असा घणाघात त्यांना युती सरकारवर देखील केला होता. तसेच जर परिस्थिती जैसे थेच राहणार असेल तर मग आधीच्या आणि आताच्या सरकारमध्ये काही फरक वाटत नाही, अशी जहरी टीका त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी सार्वजनिकरित्या केली होती.
5 वर्षांपूर्वी -
बॅनरवर मोदींचा फोटो लावून आदित्य ठाकरे आणि सेनेच्या आमदारांनी मतं मागितली: अमित शहा
राज्यातील भारतीय जनता पक्षाचं सरकार अवघ्या साडेतीन दिवसात पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा चांगलेच संतापले दिसले, जनादेशाचा अनादर करण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. विचारधारा आणि युतीधर्माच्या विरोधात त्यांनी काम केलं आहे. शिवसेनेचा एकही आमदार असा नाही ज्यांनी त्यांच्या बॅनरवर फोटो लावून मतं मागितली नाही, आदित्य ठाकरेंनी तेचं केलं असा अमित शहांनी टोला लगावला.
5 वर्षांपूर्वी -
मोदी लाट वेगाने ओसरते आहे; अनेक राज्य भाजपमुक्त होण्यास सुरुवात
२०१४ नंतरच्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचा मोदी लाटेत देशभर जोरदार प्रसार होऊ लागला. त्यानंतर अनेक राज्यात विधानसभा निवडणुका पार पाडल्या आणि त्यात देखील मोदी लाटेचा बोलबाला पाहायला मिळाला. त्यानंतर उन्मत्त भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नैत्रुत्वाच्या डोक्यात हवा गेल्याच दिसू लागलं आणि त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे वेळोवेळी काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला गेला. त्यात जम्मू काश्मीर सारख्या राज्यात काँग्रेसला बाजूला करण्यासाठी थेट पक्षीय विचारधारा बाजूला ठेवत पीडीपी’सोबत संसार थाटला होता.
5 वर्षांपूर्वी -
महाविकासआघाडीच्या एकजुटीने भाजपचा राजकारणातील 'राष्ट्रीय पोपट' झाला
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच ही बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासूनच सुरु होते. आज अखेर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते.
5 वर्षांपूर्वी -
पवारांच्या जुन्या प्रतीमेचा वापर करून सेना-काँग्रेस-एनसीपीत फूट पडण्याचा भाजपचा प्लान फसणार
कोणाच्या ध्यानीमनी नसताना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ऐतिहासिक युती झाली आणि विशेष म्हणजे शिवसेना एनडीए’मधून देखील बाहेर पडत भारतीय जनता पक्षाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालेली असताना पाहून भाजपचे केंद्रीय नैतृत्व देखील विचारात पडलं आहे. यासर्व राजकीय उलथापालत शक्य झाल्या त्या केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच हे सर्वश्रुत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी शहांनी यापुढे काँग्रेस-मुक्त भारताची कल्पनाही करू नये: काँग्रेस
मागील लोकसभा निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस मुक्त भारत करण्याचा निर्धार अनेक सभांमधून केला होता. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मोदी-शहांना इशारा दिला आहे. यापुढे मोदींनी काँग्रेस मुक्त भारताची कल्पनाही करू नये, असे गहलोत यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थानातील पालिका निवडणुकीत २३ ठिकाणी काँग्रेसची सत्ता; भाजपचा सुपडा साफ
दोन दिवसांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने आयत्यावेळी जनता दल सेक्युलरला पाठिंबा देत भाजपाला धक्का दिला होता. मात्र, वर्षभरात कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधात भाजपने ऑपरेशन लोटस राबवत पुन्हा सत्ता स्वतःकडे खेचून आणली होती.
5 वर्षांपूर्वी -
६ वर्ष भ्रष्टवादी संबोधलं; मोदींसाठी राष्ट्रवादी अचानक सद्गुणी; पवारांनी चाणक्यचा अर्थ शिकवला?
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या दिवशी राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आणि बिजू जनता दल (Biju Janata Dal) या दोन पक्षांचं कौतुक केलं. या दोन्ही पक्षांचे खासदार कधीच वेलमध्ये उतरत नाहीत. या दोन्ही दलांकडून आपण सर्वांनी धडा घ्यायला हवा. भारतीय जनता पक्षानं (Bharatiya Janata Party) देखील शिकायला हवं, असं मोदी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात रुबाब सोडला नसला तरी हरयाणात शहाणे झाले? सहकारी पक्षाच्या १० आमदारांमागे ११ मंत्रिपदं
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजप पाठोपाठ शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, २०१४ मधील मोदी लाटेनंतर एनडीए’चं राजकारण मोदी आणि अमित शहा केंद्रित झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर एकामागे एक सहा इतर राज्यात विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचे परिणाम दिसू लागले आणि परिणामी भाजपअधिक उन्मत्त होऊ लागला. त्यात सर्वात मोठ्या घटना म्हणजे स्थानिक पक्षांचं अस्तित्व शिस्तबद्ध संपविण्याच्या योजना भाजप आखू लागला आणि काँग्रेसमुक्त भारतात स्वतःचीच एकाधिकारशाही देशभर कशी प्रस्थापित करतात येईल यासाठीच सत्ता वापरू लागला. सत्तेच्या आडून केवळ विरोधी पक्षच नव्हे तर सहकारी पक्षांवर देखील दबाव सुरु झाल्याचं पाहायला मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
अमित शहांच्या प्रतिक्रियेतून शिवसेनेशी युती तुटल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित?
राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्यावर भाजचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया मांडली आहे. जर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची महायुती विधानसभेमध्ये विजयी झाली तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं पंतप्रधान आणि मी काय म्हणत आलो. त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. पण आता मात्र त्यांनी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे अशा शब्दात अमित शहा यांनी शिवसेनेनं केलेला आरोप फेटाळला आहे. शिवसेनेची ही मागणी मान्य नसल्याचंही अमित शहा यांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तवाहिनीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते; पण चुकून जय शहांचं १५०० टक्क्यांनी वाढलं: सविस्तर
केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाची संपत्ती तब्बल १६ हजार पटींनी वाढल्याचा गौप्यस्फोट एका संकेतस्थळाने केला आणि देशात जणू भूकंपच झाला होता. ज्या मुलाबाबत ही बातमी होती तो म्हणजे जय शहा. केंद्रीय गृहमंत्री अन् भाजपच्या सर्व सत्ताधीशांमधील क्रमांक दोनचे नेते अमित शहा यांचे चिरंजीव. जयच्या माध्यमातून तेव्हा काँग्रेसने मोदी-शहा जोडगोळीवर प्रचंड रान उठविले. पुढे अर्थातच हे प्रकरण शीतपेटीत गेले. तेव्हा प्रकाशात आलेले जय शहा हे नंतर येनकेन प्रकारे माध्यमांत झळकत राहिले. आता तर ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाल्याने पेज थ्रीसह विविध बातम्यांध्ये सतत झळकत राहणार यात शंका नाही. हे महाराज बीसीसीआयमध्ये अचानक कसे टपकले, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रीय कृषीमंत्री अमित शहा शेतकऱ्यांची भेट घेण्याची शक्यता: मिटकरींकडून खिल्ली
सध्या राज्यात ओल्या दुष्काळाने थैमान घातले असून, आधीच दुष्काळात होरपळला शेतकरी राजा आता ओल्या दुष्काळाने हैराण झाला आहे. एका बाजूला शेतकरी मदतीच्या आशेने हंबरडा फोडत असताना राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांच्या भेटीगाठी म्हणजे कशाचा कशाला पत्ता नाही असंच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
अमित शहा उद्या मुंबईत येण्याची शक्यता; मोठ्या राजकीय हालचालींना वेग
देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत असून भारतीय जनता पक्षात वरिष्ठ पातळीवर जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्याचे वृत्त आहे. त्यानुषंगाने राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली दोन्ही बाजूने पुढे सरकल्या असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या तडकाफडकी मुंबईत दाखल होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
Exit Poll: हरियाणामध्ये भाजपाला धक्का बसण्याची शक्यता
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं आहे. मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी या निवडणुकांच्या निकालाबाबतचे अंदाज व्यक्त केले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेचं सरकार येईल, असा अंदाज सर्वच संस्थांच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. परंतु हरियाणाबाबत एका संस्थेनी वर्तवलेल्या अंदाजाने भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्रीही आम्हीच ठरवणार: अमित शाह
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला बहुमत मिळेल यात शंका नाही. पण भारतीय जनता पक्षाला स्वबळावरसुद्धा बहुमत मिळेल, असा दावा अमित शहा यांनी केला आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका खाजगी टीव्ही वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचाच असेल.
5 वर्षांपूर्वी -
दुष्काळी जतमध्ये अमित शहांकडून काश्मीरच्या ३७० कलमाचा प्रचार
देशाचे गृहमंत्री अमित शहांनी जतपासून राजकीय प्रचाराची सुरुवात आज केली. आजच्या प्रचारसभेत अमित शहा म्हणाले की, विलास जगतापना विजयी करा असे आवाहन करण्यासाठी मी आलो आहे. सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जतवासियांपुढे अमित शहांनी सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७०, राष्ट्रहित यावरच भर देत पुढे प्रत्येक नेता देतो तशी आश्वासन देत म्हणाले की, टेंभू म्हैसाळ सिंचन योजनेला निधी दिला. कर्जमाफी, शौचालय, वीज पुरवठा, प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या खात्यात थेट सात हजार रुपये दिले. त्यानंतर अमित शहांनी विविध योजनांसाठी दिलेल्या निधींची आंकडेवारी सांगत भाषण संपविले.
5 वर्षांपूर्वी -
भीषण! गुजरातमध्ये शिपाई पदासाठी डॉक्टर आणि बी-टेक शिक्षण झालेले उमेदवार
देशात रोजगार देण्यात गुजरात अव्वल असल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्येच सुशिक्षित बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर आले आहे. कारण गुजरात मधील निरनिराळ्या न्यायालयांमधील वाहनचालक पदांची काही महिन्यापूर्वी भरती सुरु करण्यात आली होती आणि त्यासाठी इयत्ता १२ वी अहर्ता असताना सुद्धा पीचडी, एमटेक, एमबीए, एलएलएबी, एमएससीपासून थेट अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर तरुणांनी वाहनचालक पदांसाठी अर्ज केले होते.
5 वर्षांपूर्वी -
बीडच्या समस्या राहिल्या दूर; घरोघरी जाऊन कलम ३७०बद्दल सांगण्याची शहांची अजब सूचना
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.
5 वर्षांपूर्वी -
शहांकडून 'बोला भारत माता की जय' आडून बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या विषयांना बगल
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम