महत्वाच्या बातम्या
-
महाराष्ट्र विधानसभा: अमित शहांचा अजब प्रचार; सभा बीड'मध्ये आणि तुणतुणं काश्मीरचं
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील सर्व प्रश्न संपले; भाजपसारखा आत्मविश्वास कोणाकडेच नाही: उद्धव ठाकरेंचा टोला
‘राज्यात पूर्ण बहुमतानं भाजपचंच सरकार येणार, हे भाजपाध्यक्ष अमित शहा यांचं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलंच खटकलं आहे. शहांच्या या वक्तव्याचा उद्धव यांनी अप्रत्यक्षपणे समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ही केवळ औपचारिकताच उरली आहे. लोकांनी फक्त बटण दाबायचे आहे, दुसरे काय?,’ असं उद्धव यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात बहुमताने भाजप सरकार येणार: अमित शाह
भाजप-शिवसेना युतीवर भाष्य करणे टाळत, ‘राज्यात पूर्ण बहुमताने पुन्हा भारतीय जनता पक्षाचेच सरकार येणार’, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार नसल्याचे संकेत दिले. या बरोबरच ‘देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील’, अशी घोषणा करत शहा यांनी पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित सभेद्वारे शहा यांनी राज्यातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी त्यांनी कलम ३७० वर पक्ष आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाध्यक्ष अमित शाह आज मुंबईत, युतीचा निर्णय होणार?
विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज, रविवारी मुंबईत येत असून, गोरेगावमधील नेस्को सभागृहात त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात एकच भाषा लादता येणार नाही, अन्यथा जनआंदोलन उभारू: कमल हसन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक देश, एक भाषा’ याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता अभिनेता आणि राजकीय नेता कमल हसनने उडी घेतली आहे. पूर्ण देशात एकच भाषा लादता येणार नाही, असे करण्याच्या प्रयत्न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत कमल हसन यांनी शहा यांच्या वक्तव्याला विरोध केला.
5 वर्षांपूर्वी -
'एक देश एक भाषा' धोरणावरून स्टॅलिन यांची प्रतिक्रिया देखील 'तमिळ भाषेत'
हिंदी आपल्या देशाची राष्ट्रभाषा असली पाहिजे असं स्वातंत्र्यसैनिकांना वाटत होतं. त्यामुळे हिंदी भाषा ही आपल्या राष्ट्राची भाषा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. “आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक भाषा एका देशात बोलल्या जाणं याकडे काही लोक एखादं ओझं म्हणून पाहतात. मात्र एका देशात अनेक भाषा बोललं जाणं ही एक सुंदर बाब आहे. असं असलं तरीही देशाची अशी एक भाषा असणं खूप आवश्यक आहे.
5 वर्षांपूर्वी -
'एक देश एक भाषा' धोरणाचं शहांनी समर्थन करताच देशभरातून टीकास्त्र
हिंदी आपल्या देशाची राष्ट्रभाषा असली पाहिजे असं स्वातंत्र्यसैनिकांना वाटत होतं. त्यामुळे हिंदी भाषा ही आपल्या राष्ट्राची भाषा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. “आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक भाषा एका देशात बोलल्या जाणं याकडे काही लोक एखादं ओझं म्हणून पाहतात. मात्र एका देशात अनेक भाषा बोललं जाणं ही एक सुंदर बाब आहे. असं असलं तरीही देशाची अशी एक भाषा असणं खूप आवश्यक आहे.
5 वर्षांपूर्वी -
कलम ३७१ ला धक्का लावणार नाही: अमित शहा
आसाममधील वैध नागरिकांची नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) प्रक्रिया ठरल्या वेळेनुसार पूर्ण झाल्याचे अमित शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘एनआरसीवर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण, मी स्पष्ट शब्दांत सांगतो की एकाही अवैध नागरिकाला सरकार देशात राहून देणार नाही. हे आमचे वचन आहे.’
5 वर्षांपूर्वी -
सरकारवरील टीकेला देशद्रोह ठरवल्यास परिस्थिती कठीण होईल: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
मागील अनेक वर्षांपासून देशभरात कोणत्याही सरकारी टिकेवरून विरोधक आणि सामान्य लोकांवर देखील थेट देशद्रोहसारखे गंभीर लेबल लावण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यात ना सामान्य नागरिक, कलाकार, साहित्यिक आणि राजकीय विरोधक असे सगळेच भरडले गेले आहेत. देशद्रोह सारखे लेबल लावल्याने अनेक तरुणांची आयुष्य उध्वस्थ झाली आहेत. समाज माध्यमांचा त्यासाठी मोठ्या ताकदीने वापर केला गेल्याचे अनेकांनी पाहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमित शहा रुग्णालयात; छोटी शस्त्रक्रिया होणार; अहमदाबादच्या इस्पितळाला पसंती
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुजरातमधील अहमदाबादच्या खासगी रुग्णालयात अमित शाह ऍडमिट झाले आहेत. अमित शाहांवर छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांच्या एकूण ४ ते ५ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या.
5 वर्षांपूर्वी -
हे बाप्पा! देशाचे आर्थिक संकट टळूदे, हिटलर शाही जाऊन लोकशाही नांदू दे: संदीप देशपांडे
आज घरोघरी श्री गणेशाचं आगमन मोठ्या आनंदात आणि उत्साहात झालं आहे. अनेकांनी आपल्या लाडक्या बाप्पाकडे स्वतःच्या इच्छा व्यक्त करत विघ्नहर्त्याला साकडं घातलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सतत भाजपच्या एकूणच कार्यपद्धतीवर हिटलर शाहीचा आरोप सातत्याने केला आहे. विरोधकांना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप एनेक वेळा विरोधकांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
‘एनआरसी’मध्ये नाव नसल्यास कायदेशीर मदत; अनेकांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातील जनतेला न घाबरण्याचे आवाहन केले आहे. जे खरोखरच भारतीय आहेत त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील आणि गरिबांना कायदेशीर मदतही उपलब्ध करून दिली जाईल, असेही सोनोवाल यांनी स्पष्ट केले.
5 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांचा अविचारी मास्टरस्ट्रोक, विधानसभेत 'पॉर्न' बघणारा आमदार कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री पदी
सध्या संपूर्ण भारतीय जनता पक्षावर पकड असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे धक्कादायक निर्णय पाहून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे. कारण कर्नाटक विधानसभेचे कामकाज सुरू असताना सभागृहात मोबाईलवर पॉर्न पाहणारे तत्कालीन मंत्री लक्ष्मण सवदी यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लावल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा सरकारवर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जोरदार टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे बेरोजगारी वाढणार आणि नोकरदारांना पगारवाढ नाही: सविस्तर
पगार वाढ होणं ही सर्व नोकरदारांची अपेक्षा असते. परंतु, अर्थव्यवस्था बिघडल्यामुळे यंदाच्या वर्षी अनेक नोकरदार वर्गाचा पगार अपेक्षित वाढला नसल्याचं समोर आलं आहे. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार खाजगी क्षेत्रातील नोकरदारांचा पगार यंदाच्या वर्षी मागील १० वर्षाच्या तुलनेत अत्यंत कमी झाला आहे. त्याचसोबत देशात बेरोजगारीचा दर ६.१ टक्के आहे जो आत्तापर्यंत सर्वात उच्चांक आहे.
5 वर्षांपूर्वी -
शासकीय नियम: मनसेकडून ईडीलाच नोटीस; कार्यालयाचा बोर्ड मराठी भाषेत करा...सक्ती आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नियमाचे आणि कायद्याचे पालन करत ईडीच्या मुंबईतील कार्यालयात हजर झाले. त्यानंतर महाराष्ट्र सैनिक चवताळून उठले आहेत. राज ठाकरे यांच्या पाठी ईडीचा डाव आखून सत्ताधारी सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप महाराष्ट्र सैनिकांनी केला होता. रस्त्यावर देखील राडा होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेण्यात आलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
#महाराष्ट्रनामा इफेक्ट: शहांचा फॉलोवर ईडी अधिकाऱ्याची काल बातमी देताच तासाभरात FB प्रोफाइल डिलीट
कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे काल सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे गेले होते. दरम्यान, कालच्या चौकशीत नक्की किती वेळ लागणार हे निश्चित सांगता येत नव्हतं तरी बाहेरील परिस्थिती बिघडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागलं होतं. एकदिवस आधीपासूनच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी नोटीस बजावल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
आठवण! २००५ मध्ये अमित शहा देखील CBI पासून ४ दिवस लपून बसले होते
सध्या माजी पी चिदंबरम यांच्या सीबीआय अटकेची चर्चा रंगली असली तरी २००५ साली अशीच वेळ सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचावर आली होती. अमित शहा गुजरातचे गृहराज्यमंत्री असताना ते देखील तब्बल सीबीआयच्या दबावाने तब्बल ४ दिवस अज्ञातस्थळी लपून बसले होते. त्यावेळी देखील अशाच घटना घडल्या होत्या जशा पी चिदंबरम यांच्या बाबतीत घडत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
कलम ३७० निर्णयानंतर होणाऱ्या हिंसेत ८ ते १० हजार जणांचा मृत्यू होईल: शाह फैजल
कलम ३५- ए आणि ३७० वरून मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील वातावरण तापत चाललं होतं. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत होत्या. काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर २ दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याची शिफारस केली. या शिफारशीला राष्ट्रपतींनीही देखील मान्यता दिली आहे. देशाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतल्याची सर्वत्र रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
गर्जना! पाक व्याप्त काश्मीरात भाजपचेचं २१ आमदार असणार; पण हा आत्मविश्वास कशामुळे?
केंद्रातील मोदी सरकारने माहितीचा अधिकार कायद्यात बदल करून माहिती आयोगाच्या स्वायत्ततेवर घाला घालून हा कायदा निष्प्रभ केला. आपल्या देशात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनद्वारे (ईव्हीएम) मतदान घेऊन निवडणुक प्रक्रिया पार पडते. त्यामध्ये मोठा गडबड घोटाळा व भ्रष्टाचार आहे. हे वारंवार प्रकाशात आले आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. यासाठी ‘ईव्हीएम हटाव, आरटीआय बचावसाठी’ आंदोलन केले जाणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
मिशन काश्मीर जगमोहन यांच्या 'माय फ्रोझन ट्रब्युलन्स', या पुस्तकात दिलेल्या सल्ल्यानुसार?
मोदी सरकारने २०१७ मध्ये केलेल्या नोटबंदीबाबत मंत्रिमंडळासहित वरिष्ठ अधिकारी, ते थेट रिझर्व्ह बँकेपर्यंत कोणालाही कल्पना नव्हती हे उघड झाले होते. तशीच माहिती सध्या कालच्या जम्मू काश्मीरसंबंधित कलम ३७० विषयाला अनुसरून झालेल्या घटना क्रमानंतर बाहेर आली आहे. देशातील सर्व महत्वाच्या निर्णयांमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा संपूर्ण श्रेय स्वतःकडे घेण्याची योजना आखतात. कोणत्याही अति महत्वाच्या निर्णयात ते ना स्वतःच्या मंत्रिमंडळातील लोकांना विश्वासात घेत, नाही वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना हे पुन्हा सुद्धा झालं आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL