महत्वाच्या बातम्या
-
आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का देण्यासाठी अमित शहांची दिल्लीत बैठक?
विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे दोघेही दिल्लीत दाखल झाले आहेत. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे जयकुमार रावळ निरंजन डावखरे हे देखील दिल्लीत आज उपस्थित आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षात नेमकी काय खलबतं सुरू आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल
बंगालच्या नारदा प्रकरणात पुन्हा एकदा केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) ने तपास सुरू केला आहे. सीबीआयने सोमवारी अनेक ठिकाणी छापेमारी केली. यानंतर ममता सरकारमधील मंत्री फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर शोवन चॅटर्जी यांची चौकशी करुन सर्वांना अटक करण्यात आले. आता या सर्वांना कोर्टात हजर केले जाणार आहे. सीबीआय कोर्टाकडे या चौघांच्या कस्टडीची मागणी करू शकते.
4 वर्षांपूर्वी -
महाविकासआघाडी सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, आम्हाला काहीही करावं लागणार नाही - अमित शहा
महाराष्ट्रातील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी स्थापीत केलेले महाविकासआघाडीचे सरकार लवकरच कोसळणार असा दावा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून वारंवार केला जात आहे. यात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सगळ्यांनीच लवकरच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | अखेर अमित शहांनी सत्य सांगितलं? | मोदीजी २४ तास झोपतात कारण देशातील गरिबांचं भलं व्हावं
सध्या भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर सभा होताना दिसत आहेत. मोदी आणि शहांनी अक्षरशः पश्चिम बंगालमध्ये सभांचा सपाटा लावला आहे. त्यात सभांमध्ये मोठे दावे आणि प्रतिदावे केले जातं आहेत. त्यातील एका सभेत अमित शहा यांनी मोदी गरिबांच्या कल्याणासाठी नेमकं काय करतात ते सत्य उघड केल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. पश्चिम बंगालमधील एका सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “नरेंद्र मोदीजी २४ तास झोपतात कारण या देशातील गरिबांचं व्हावा म्हणून आणि दीदी २४ तास विचार करतात की माझा भाचा कधी मुख्यमंत्री बनेल’. भाजप समर्थकांनी नंतर ‘सोते’ या शब्दाला ‘सोचते हैं’ असं असल्याचं म्हटलं.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या प्रसाराची गती इतकी अधिक आहे की ही लढाई थोडी कठीण आहे - अमित शाह
भारत देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सक्रीय रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात चोवीस तासांत देशात 2.33 लाख नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा अडीच पटीने जास्त असल्याचे वर्तवले जात आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये एका दिवसात सर्वात जास्त 97 हजार प्रकरणे समोर आले होते. शास्त्रज्ञ आणि तज्ञांमध्ये या गोष्टीची चर्चा सुरु असून देशात कोरोनाचे सक्रीय रुग्ण का वाढत आहे यावर विचारमंथन सुरु आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, देशातील रुग्ण वाढीस जगात आलेला नवीन व्हॅरिएंट आणि भारतातील डबल म्यूटेशन व्हायरस जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
काही गोष्टी सावर्जनिक करायच्या नसतात... त्या भेटीच्या वृत्तावर शहांनी संधी साधली?
काही गोष्टी सावर्जनिक करायच्या नसतात, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्याशी झालेल्या गुप्त बैठकीवर सूचक उत्तर दिलं आहे. दिल्लीत पत्रकारांनी पवारांसोबत भेटीबाबत छेडलं असता अमित शाहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत, असं सांगून प्रश्न उडवून लावला आहे. दरम्यान, अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकराच्या समीकरणात काही बदल होणार का? राजकीय खेळी पलटणार का? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांकडून चर्चेचं आवाहन | केंद्रासोबत चर्चा होणार
कृषी कायद्याविरोधात (Agriculture Bills) आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home minister Amit Shah) यांनी आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांच्या सर्व समस्या तसेच मागण्यांवर विचार करण्यासाठी मोदी सरकार तयार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. कृषीमंत्री नरेंद्र तोमर (Union Agriculture minister Narendra Tomar) यांनी शेतकऱ्यांना ३ डिसेंबर या दिवशी शेतकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींनी सांगताच लोकांनी दिवे लावले, घंटा वाजवल्या, माझ्या कारकिर्दीत असं पाहिलेलं नाही : अमित शहा
अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक केल असून भारता दोन्ही लढाया जिंकत असल्याचे म्हटले. देशातील कोरोनाविरुद्धची लढाई भारताने अर्धी जिंकली असून कोरोनावर मात देण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत प्रभावी ठरला आहे. त्यामुळे, देशातील कोरोनाविरुद्धची लढाई आणि पूर्व लडाख सीमारेषेवरील सीमावादाच्या टेन्शनची लढाई, या दोन्ही लढाया भारत जिंकत असल्याचं अमित शहांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
१९६२ पासून काय घडले यावर संसदेत चर्चा होऊन जाऊ दे - अमित शहा
भारत-चीन प्रश्नावर चर्चा करायची असेल तर आम्ही घाबरत नाही. १९६२ पासून काय काय घडले यावर संसदेत एकदा दोन हात होऊनच जाऊ दे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काँग्रेससह विरोधकांना आव्हान दिले. ते रविवारी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षानंतर काँग्रेसकडून मोदी सरकारला सातत्याने धारेवर धरले जात आहे. चीनविषयक मोदी सरकारच्या धोरणांवर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘सरेंडर मोदी’, असे संबोधले होते.
5 वर्षांपूर्वी -
आंध्र प्रदेश: एक आमदार असलेल्या पवनकल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत भाजपची युती जाहीर
महाराष्ट्रातील राजकरणात मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाची मनसेसोबत युती शक्य असल्याचं म्हटलं जातं. अगदी मनसेने हिंदुत्वाच्या मुद्याला अनुसरून राजकारण स्वीकारल्यास ते शक्य आहे. विशेष म्हणजे मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारून स्वतःला भाजपपासून वेगळं ठेवत स्वतःच हिंदुत्वाच राजकारण सुरु ठेवल्यास ही युती अधिक शक्य आहे अशी शक्यता आहे. भाजप-मनसे युतीचे पहिले प्रयोग कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नवी मुंबई या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केले जातील. त्यानंतर २०२४ मधील निवडणुकीची आखणी केली जाईल असं राजकीय विश्लेषक म्हणतात. एक आमदार असलेल्या आणि मोदी-शहांना टोकाचा विरोध करणाऱ्या पक्षासोबत ते कसं शक्य आहे असे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र हाच प्रयोग आंध्र प्रदेशात आज उदयास आला आहे. तेलगू देसम आणि वायएसआर काँग्रेस असे पक्ष यांच्यासमोर डाळ शिजणार नसल्याने भाजपने येथे मोदींचा आणि भाजपचा विरोध करणाऱ्या आणि केवळ आमदार असणाऱ्या पवनकल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत अधिकृतपणे युती जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
उलट मोदींनी आणि त्यांचे असिस्टंट अमित शहांनी देशाची माफी मागावी: राहुल गांधी
भाषणावेळी राहुल गांधी म्हणाले, “काल संसदेत भाजपावाले म्हणाले, भाषणासाठी तुम्ही माफी मागा. मात्र, जे खरं आहे त्यासाठी माझ्याकडून माफी मागितली जात होती. माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेसवाला माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींना आणि त्यांचे असिस्टंट अमित शाह यांना देशाची माफी मागावी लागेल.”
5 वर्षांपूर्वी -
NRC: वायुदलाच्या नावाने निवडणूक प्रचार; अन तेच अधिकारी नागरिकत्वापासून वंचित: सविस्तर वृत्त
एनआरसीची अंतिम यादी सप्टेंबरमध्ये जाहीर झाल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या एका माजी जवानाचा या यादीत समावेश नसल्याचं समोर आलं. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सदर यादीत समावेश असला तरी त्यांचं या शेवटच्या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे. भारतीय वायुदलाच्या सेवानिवृत्त फ्लाइट लेफ्टनंट छबिंद्र सरमा हे आसाममधील बिस्नाथनाथ चरियालीचे रहिवासी असून शेवटच्या यादीत त्यांचे नाव नसल्याची धक्कादायक घडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बॅनरवर मोदींचा फोटो लावून आदित्य ठाकरे आणि सेनेच्या आमदारांनी मतं मागितली: अमित शहा
राज्यातील भारतीय जनता पक्षाचं सरकार अवघ्या साडेतीन दिवसात पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा चांगलेच संतापले दिसले, जनादेशाचा अनादर करण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. विचारधारा आणि युतीधर्माच्या विरोधात त्यांनी काम केलं आहे. शिवसेनेचा एकही आमदार असा नाही ज्यांनी त्यांच्या बॅनरवर फोटो लावून मतं मागितली नाही, आदित्य ठाकरेंनी तेचं केलं असा अमित शहांनी टोला लगावला.
5 वर्षांपूर्वी -
अफझल खान सरकारला अजून ५ वर्ष देऊन बघू - उद्धव ठाकरे एवढे का नरमले?
स्वतःला शिव-शंभूंचे अवतार मानून अफझल खानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे पूर्वीचे उद्धव ठाकरे आणि सध्या भाजपच्या हातात हात घालून त्यांचे गोडवे गाणारे उद्धव ठाकरे हे मराठी माणसांना रुचण्यासारखं नक्कीच नाही. उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करताच भाजप पुढे शड्डू ठोकून उभा असलेला सामान्य शिवसैनिक मात्र मातोश्री आदेशानंतर बुचकाळ्यात पडला आहे. सामान्य शिवसैनिकांना बाळासाहेबांची शपथ देऊन आणि वचन घेऊन उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा शंख वाजवला खरा परंतु असे काय नेमके घडले कि त्यांना भाजप सोबत युती करावी लागली?
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो