महत्वाच्या बातम्या
-
Minister Anil Parab Vs ED | मी काही चुकीचं केलेलं नसल्याने ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे - अनिल परब
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मला दुसरं समन्स आल्याने मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
3 वर्षांपूर्वी -
अनिल परब यांना ईडीचे समन्स | २८ तारखेला राहावे लागणार हजर
ईडीच्या रडारवर असलेले राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना २८ तारखेला त्यांना हजर राहून जबाब नोंदविण्यासंदर्भातील समन्स पाठवण्यात आले आहे. पहिल्या समन्सला परब यांनी गैरहजर राहत मुदतवाढ मागून घेतली होती. आता दुसरे समन्स पाठवून चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | भाजप नेते किरीट सोमैय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमैया यांच्याकडून वारंवार होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून अनिल परब आता सोमैया यांच्यावरती 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार होते. या प्रकरणी परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमैय्यांना एक बिनशर्त माफी मागण्याची नोटीस पाठवली होती. त्यानुसार सोमैय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिले होते. सोमैया यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता.
3 वर्षांपूर्वी -
रामदास कदमांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या मार्फत अनिल परब यांच्याबाबतची माहिती सोमैयांना दिली - वैभव खेडेकर
भाजपचे नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तसेच्या त्या संदर्भात त्यांनी ईडीकडे कागदपत्रेही सोपवली आहेत. राज्याचे परिवहवन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या संदर्भातही किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यानेही हात घालताना शिवसेना नेत्यासंदर्भातच एक दावा केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
राजकीय हेतू साध्य करण्यासाठी न्यायालयाचा वापर होऊ नये | अनिल परब यांचे म्हणणे सुद्धा ऐकू - हायकोर्ट
परब यांच्यासह परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार होत आहे, असा आरोप करून सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका निलंबित आरटीओ अधिकारी गजेंद्र पाटील यांनी ॲड. व्ही. पी. राणे यांच्यामार्फत काही महिन्यांपूर्वी केली. याविषयी बुधवारी प्राथमिक सुनावणी झाली.
3 वर्षांपूर्वी -
Anil Parab Vs Somaiya | अनिल परब सोमैयांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार | नोटीस पाठवली
माजी खासदार आणि भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमैया यांच्याकडून वारंवार होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून अनिल परब आता सोमैया यांच्यावरती 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. या प्रकरणी परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमैय्यांना एक बिनशर्त माफी मागण्याची नोटीस पाठवली आहे. त्यानुसार आता सोमैय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिले आहे. सोमैया यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. या बरोबर त्यांच्या खात्याअंतर्गत परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमैय्या यांनी केला होता.
3 वर्षांपूर्वी -
म्हाडाच्या जमिनीवर अनिल परब यांनी बांधलेले बेकायदा ऑफीस पाडणार | लोकायुक्तांचा आदेश
ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती अनिल परब यांनी म्हाडाच्या जमिनीवर पूर्व बांद्र्याला बांधलेले ऑफिस पाडण्यात येणार आहे. लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही एन कानडे यांनी यासंदर्भातला आदेश दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
अनिल परबांच्या अडचणींमध्ये वाढ | निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांना ईडीची नोटीस
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सध्या ईडीकडून चौकशांचे सत्र सुरू आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर अनिल परबांच्या मागे देखील ईडीची पिडा लागली आहे. दरम्यान अनिल परब यांचे निगटवर्तीय मानले जाणार बजरंग खरमाटे यांच्या देखील ईडीकडून नोटीस बजावण्यता आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ED Notice To Anil Parab | परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस
परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची नुकतीच सांगता झाली आहे. याआधी राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात चांगलेच वादंग माजले होते. या सर्व गोष्टींवर पडत असतानाच आता परब यांना ईडीने नोटीस दिली आहे. येत्या मंगळवारी परब यांनी ईडी कार्यालयात हजर रहावे असे समन्स बजावण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझे आज पत्र देणार आणि तिसरी विकेट काढणार हे भाजपला आधीच माहिती होतं - अनिल परब
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील अजून एका मंत्र्यावर गंभीर आरोप केला आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे. ते पत्र आता NIA कोर्टाला दिलं जाणार आहे. अद्याप हे पत्र जमा करण्यात आलेलं नसल्याचं कळतंय.
4 वर्षांपूर्वी -
यासाठी थोडे दिवस थांबा | कोण घाबरतंय आणि कोण घाबरत नाही हे स्पष्ट होईल - शिवसेना
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यात मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा वाद दिसू लागल्याचं सांगितलं जात असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचं दिसतं आहे. आपल्याच आमदारांना इतकं घाबरणारं सरकार मी पहिल्यांदाच पाहातो आहे’, असं फडणवीस म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मनसे सुपारी घेऊनच काम करतात | नागड्यासोबत उघडा झोपल्यावर काय होतं ते दिसेल - शिवसेना
महाविकास आघाडीची स्थापना करून शिवसेनेच्या पदरात मुख्यमंत्रीपद पडलं आणि भारतीय जनता पक्षाचा राजकीय गेम केल्यानंतर भाजपचे नेते शहरी भागातील मराठी मतांवरून चिंतेत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत अमराठी मतच भाजपच्या केंद्रस्थानी असतील असं राजकीय विश्लेषक मत मांडत आहेत. पण मराठी मतदार हा शिवसेनेचा बेस असल्याने भाजपाला मराठी मतांसाठी दुसरा साथीदार हवा आहे. त्यामुळे मनसे संबंधित निवडणूक पूर्व पुड्या सोडण्यास भाजपकडून सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल स्पॉट नाना म्हणतो मला नोटीस आली नाही | नोटीस जागा मालकाला येते हडपणाऱ्याला नाही
शिवसेना नेते अनिल परब यांनी वांद्र्यात म्हाडाची जागा बळकावून कार्यालय उभारल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी किरीट सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी राज्यात फिरायलाच पाहिजे असे नाही - अनिल परब
प्रवीण दरेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल