महत्वाच्या बातम्या
-
देशमुख यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली | आता अनिल देशमुख जामीनासाठी अर्ज करु शकतात
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी (6 नोव्हेंबर) विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान, ईडीने कोठडीची मागणी केली होती. पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावत त्यांना न्यायालयीन कोठडीत धाडलं आहे. दरम्यान, आता अनिल देशमुख यांची (Anil Deshmukh in Court custody) रवानगी तुरुंगात होण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
Breaking News | देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत | परमबीर सिंहांचं चौकशी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र
IPS परमबीर सिंह यांच्यावर ठाणे कोर्ट आणि मुंबईतील किला न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर सिंह यांच्यावर ठाणे आणि मुंबईत खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh in ED Custody | अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख याना काल मध्यरात्री ईडीने 100 कोटीच्या वसुलीप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर अनिल देशमुखांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. अटकेनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून कोर्टात हजर करण्यात (Anil Deshmukh in ED Custody) आलं होतं. यावेळी कोर्टात बराच वेळ युक्तीवाद सुरु होती.
3 वर्षांपूर्वी -
ड्रग प्रकरणी भाजप गोत्यात आणि सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात येताच अनिल देशमुख यांना अटक?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्याअगोदर त्यांची 13 तास कसून चौकशी (Anil Deshmukh Arrested) करण्यात आली.
3 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh in ED Office | अनिल देशमुख ED कार्यालयात चौकशीसाठी दाखल
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आतापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेकदा समन्स बजावले होते. मात्र, असं असूनही ते मागील अनेक महिन्यांपासून या यंत्रणांसमोर हजर होत नव्हते. मात्र आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास अनिल देशमुख हे अचानक मुंबईतील ईडी कार्यालयात (Anil Deshmukh in ED Office) दाखल झाले.
3 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh Vs CBI | अनिल देशमुख यांचे पुत्र सलील आणि सुनेविरुद्ध सीबीआयचे अटक वॉरंट
आज सकाळी सीबीआयचे एक पथक दाखल त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी दाखल झाले आहे. ज्यामध्ये सहा अधिकारी असून एक महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे. सीबीआयचे पथक अनिल देशमुख यांचे पुत्र सलील आणि सुनेविरुद्ध अटक वॉरंट (Anil Deshmukh Vs CBI) घेऊन आलेले आहे. मात्र, विविध यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई सुरू झाल्यापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय अज्ञातवासात गेले आहेत. त्यामुळे आता सीबीआयचं पथक अटक वॉरंट संदर्भात काय निर्णय घेतं हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
ED Vs Anil Deshmukh | ED'कडून भ्रष्टाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल | अनिल देशमुखांचं नाव वगळलं?
मनी लॉड्रिंगप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळाले. ईडीने अनिल देशमुखांशी संबंधित मालमत्तांवर छापेही टाकले. ईडीने अनेकदा समन्स बजावूनही अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. आता ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. विशेष म्हणजे या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचे नाव नसल्याची माहिती मिळाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
ED, CBI दोन्ही तपास यंत्रणा राज्यभरात ठिकठिकाणी देशमुखांना शोधण्यासाठी छापेमारी करण्याची शक्यता
शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स बजावूनही ते गैरजर राहिले आहेत. तसेच त्यांचा ठावठिकाणाही लागत नाहीय. यामुळे ईडीने त्यांना शोधण्यासाठी थेट सीबीआयची मदत मागितली आहे.
3 वर्षांपूर्वी -
कागदपत्रं लीक करून ED तपासयंत्रणा केवळ माध्यमांद्वारे खळबळ निर्माण करू पाहतंय | सुनावणी सुरु
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यामागे मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. परंतु आता देशमुखांनी ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून समन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. तपासयंत्रणा केवळ खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महत्वाची कागदपत्रं लीक केली जात असल्याचा आरोपही अनिल देशमुखांकडून करण्यात आला आहे. कोर्टाने याप्रकरणी सोमवारपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे.
3 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख यांच्या विरोधात 'ईडी'कडून लूकआऊट नोटीस
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने लुकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती ज्येष्ठ वकील जयश्री पाटील यांनी दिली आहे. जयश्री पाटील यांनीच सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. त्यानंतर 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात कारवाई केली होती.
3 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांना 100 कोटी वसुली प्रकरणात क्लिनचिट? | CBI नं दिलं स्पष्टीकरण
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता. या आरोपानंतर आता CBI च्या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुख यांना क्लिनचिट देण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं. यावर आता खुद्द सीबीआयनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
सीबीआयच्या अहवालात देशमुखांविरोधात एकही पुरावा सापडला नाही, तरी CBI कारवाई कुणाच्या इशाऱ्यावर?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्याच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढलाय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. सीबीआयच्या अहवालात अनिल देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नसल्याचं म्हटलं. त्यानंतरही मग सीबीआयने कुणाच्या इशाऱ्यावर कारवाई केली? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केलाय.
3 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh in Supreme Court | अनिल देशमुखांची ED बाबतीतली याचिका सुप्रीम कोर्टाकडून स्विकृत
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीकडून (सक्तवसुली संचालनालय) आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावण्यात आले होते. याबाबत अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून आता हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या कार्यालयात आपण चौकशीसाठी उपस्थित राहू, असे पत्र अनिल देशमुख यांनी प्रसिद्ध केल आहे.
3 वर्षांपूर्वी -
समन्स बजावूनही अनिल देशमुख ED चौकशीला गैरहजर | वकिलांनी स्पष्ट केलं कारण
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि देशमुख यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आज पाचव्यांदा अनिल देशमुख अंमलबजावणी संचालनालयासमोर गैरहजर राहिले आहे. यापूर्वी चारीही वेळेस त्यांचे वकील इन्द्रपाल सिंह यांनी ईडी ऑफिसात हजेरी लावली होती. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी देशमुख यांना मोठा झटका दिला. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने देशमुख यांच्या वरील ईडीची चौकशी थांबवण्यास नकार दिला आहे. त्यानंतर देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनरयाचिका दाखल केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखांच्या सर्व मागण्या फेटाळल्या | CRPC'च्या अनुषंगाने याचिका करण्याची सूचना
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला नाही. अनिल देशमुख यांच्या मागण्या कोर्टाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता अनिल देशमुखांचा शेवटचा पर्यायही बंद झाला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख यांच्या नागपुरातील एनआयटी महाविद्यालयावर ईडीचे छापे
मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील शैक्षणिक संस्थेवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूर जिल्ह्यातील फेट्री शिवारातील माहुरझरी परिसरात श्रीसाई शिक्षण संस्थेचे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी कॅम्पसमध्ये ईडीचे अधिकारी पोहचले आहे. ही तीच संस्था आहे, ज्याचे अध्यक्ष अनिल देशमुख, पत्नी आणि मुलगा ऋषिकेश यामध्ये संचालक पदावर आहे. याशिवाय देशमुख यांच्या महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी ईडी पथकामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांचे ईडीला पत्र | सुप्रीम कोर्टात आधीच आव्हान दिल्याने चौकशीसाठी हजर राहणार नाही
100 कोटी वसुली प्रकरणामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अडचणीत सापडलेले आहेत. या प्रकरणी त्यांना सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. तसेच त्यांचा – मुलगा ऋृषीकेश यांना देखील समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तिसऱ्या समन्सनंतरही अनिल देशमुख हे ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख यांची सीबीआयच्या FIR विरोधातली याचिका हायकोर्टाने फेटाळली
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. त्यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. सीबीआयने अनिल देशमुखप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात महाराष्ट्र सरकारला दिलासा मिळालेला नाही. एफआयआरमधील आक्षेपार्ह भाग वगळण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून अद्याप सुनावणी सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख नॉट रिचेबल असल्याचं वृत्त चुकीचं | सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ED समोर चौकशीला जाणार
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली असून, रविवारी देखील त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले. या छाप्यानंतर देशमुख यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अनिल देशमु ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली होती. अटकेच्या भीतीने देशमुख गायब झाले असल्याचं बोललं जात असून, ईडीकडून त्यांचा शोध घेतला जात आहे असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
मोठी कारवाई | अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणामध्ये ईडीने ही पहिलीच मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी या वाढल्या आहेत. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील संपत्तीवर जप्ती आणली असल्याचे वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा