Anmol India Share Price | मालामाल शेअर! अनमोल इंडिया शेअरने 843% परतावा दिला, आता एका शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स मिळणार
Anmol India Share Price | अनमोल इंडिया या कोळसा व्यवसायाशी संबंधित कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ही कंपनी एका शेअर्सवर 4 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 843 टक्के वाढली अबे. अनमोल इंडिया कंपनीचे शेअर्स 29 जून 2020 रोजी 26.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 246.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के वाढीसह 250.50 रुपये किमतीची ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी