Annapurna Swadisht Share Price | अन्नपूर्णा स्वादिष्ट शेअरने 9 महिन्यांत गुंतवणूकदारांना 300 टक्क्याहून अधिक परतावा दिला, खरेदी करणार?
Annapurna Swadisht Share Price | अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीचा IPO 9 महिन्यांपूर्वी शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. याकाळात अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 68-70 रुपये निश्चित करण्यात आली होती. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना शेअर्स 70 रुपये किमतीवर वाटप केले होते. तर या कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर 120 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीचे शेअर्स 16 जून 2023 रोजी 251 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के वाढीसह 250 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी