नव्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंबंधित फाईल सुप्रीम कोर्टाने मागवली, VRS नंतर गुजरात निवडणुकीपूर्वीच नियुक्ती करण्यात आलेली
Appointment Files of New Election Commissioner | पंजाब कॅडरचे निवृत्त आयएएस अधिकारी अरुण गोयल यांची व्हीआरएसनंतर लगेचच नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. या नियुक्तीशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यास कोर्टाने केंद्र सरकारला सांगितले आहे. या नियुक्तीत काही गडबड आहे का, हे त्यांना पाहायचे आहे, असे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे. न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचं घटनापीठ निवडणूक आयुक्तांसाठी निष्पक्ष नियुक्ती प्रक्रिया करण्याच्या याचिकेवर सुनावणी करत होतं.
2 वर्षांपूर्वी