Archean Chemical Industries IPO | आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज आयपीओ लाँच होणार, प्राईस बँड रु. 386-407 प्रति शेअर
Archean Chemical Industries IPO | आर्कियन केमिकल इंडस्ट्रीज या खास सागरी रासायनिक उत्पादक कंपनीने आपल्या आयपीओची किंमत पट्टी निश्चित केली आहे. यासाठी कंपनीने प्रति शेअर ३८६-४०७ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला १,४६२ कोटी रुपये उभे करायचे आहेत. हा आयपीओ ९ नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. ११ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदार यात गुंतवणूक करू शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली 7 नोव्हेंबर रोजीच उघडेल.
2 वर्षांपूर्वी