अब की बार महंगाई छप्परफाड, महागाई वाट्टोळं करणार! फक्त 3 महिन्यात डाळीचे दरांमध्ये 22 टक्क्यांची वाढ
Modi Hai To Mumkin Hai | मार्च २०२३ च्या तिमाहीत तूर किंवा हरभरा डाळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. देशांतर्गत पुरवठा कमी झाल्याने हरभरा डाळीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये अवकाळी पाऊस आणि शेतकरी सोयाबीन, कापूस या पिकांकडे वळत असल्याने उत्पादनात २० ते ३० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. सेंट्रल पूलमध्ये पुरेसा साठा नसल्याने चिंतेत भर पडली आहे. गेल्या तीन महिन्यांत हरभरा डाळीच्या दरात २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षभरात हरभरा डाळीच्या दरात ३२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी