महत्वाच्या बातम्या
-
सुप्रीम कोर्टाच्या नावे भाजपा मुख्यालयात अहवाल तयार करण्यात आला - मनिष सिसोदिया
सर्वोच्य न्यायालयाच्या ऑक्सिजन ऑडिट समितीने दिलेला अहवाल अस्तित्वातच नसून हा भारतीय जनता पक्षाने तयार केला आहे असा गंभीर आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. ऑक्सिजन ऑडिट समितीने दिलेल्या अहवालात मागील महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना दिल्ली राज्य सरकारने गरजेपेक्षा चौपट ऑक्सिजनची मागणी केल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्या पाकिस्तानशी युद्ध झाल्यास राज्यांना हत्यारं विकत घ्यायला सांगून विषय राज्यांवर सोडणार का? | केजरीवाल संतापले
देशात मागील काही दिवसात लशींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे आणि परिणामी अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ राज्यांवर ओढवली आहेत. त्यामुळे भाजपाशासित राज्य सोडून इतर राज्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले.
4 वर्षांपूर्वी -
परिस्थिती बिघडली | दिल्लीत आणखी रुग्णांना दाखल करून घेणं शक्य नाही | 6 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर
भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृयू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे. मागील चोवीस तासात देशामध्ये 2 लाख 74 हजार 944 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासोबतच 1 लाख 43 हजार 701 लोक बरे झाले असून 1620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडली
दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन (Delhi Border Farmers Protest ) सुरू आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली. आता दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal ) यांनी शेतकऱ्यांना समर्थन देत कृषी कायद्यांच्या (New Farm Act) प्रति टराटरा फाडल्या. तसंच केंद्र सरकारवर निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
भारत बंद | मोदी सरकार बिथरलं? | मुख्यमंत्री केजरीवाल नजरकैदे | आपचा दावा
केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज (८डिसेंबर)भारत बंदची हाक दिली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. माथाडी कामगारही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. संवेदनशील मार्गावर एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सकाळपासूनच भारत बंदच्या या शेतकऱ्यांच्या हाकेला लोकांनी सहकार्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला कंटाळून लोकं काँग्रेसला मतदान करतात | मग काँग्रेसचे आमदार भाजपचं सरकार स्थापन करतात
नुकतेच बिहारमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार बिहारमध्ये स्थापन करण्यात आलं. निवडणुकीत महाआघाडीत काँग्रेसची कामगिरी ही निराशाजनक होती. काँग्रेसनं ७० जागांवर निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांना केवळ १९ जागांवरच विजय मिळाला. दरम्यान, एकंदरीत परिस्थितीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. असं वाटतंय की आता काँग्रेसचं कोणी आई-बाप शिल्लक नाही. ज्याप्रकारे ते कामगिरी करत आहेत त्यावरून काँग्रेस आता देशाचं भविष्य नाही असं वाटत आहे,” असं केजरीवाल म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीत विध्वंसासाठी तब्बल ६० हजार लिटर अॅसिड? आप नेत्याचा विचार तरी काय होता?
ताहिरच्या घरामध्ये आणि शेजारील दुकानामध्ये सल्फ्युरिक अॅसिडचा मोठा साठा सापडला आहे. त्याच्या घराच्या बाजुलाच असलेल्या दुकानामध्ये मोठेमोठे ड्रम सापडले आहेत. यावर गंगाजल लिहिले होते. हे अॅसिड एवढे तीव्र आहे की काही मिनिटांतच ते त्वचेच्या आतील भागापर्यंत जाळू शकते. हे ऍसिड फॅक्टरीमध्ये वापरले जाते. ते लायसन, आधार कार्ड आणि कारण सांगितल्याशिवाय सहजासहजी खरेदी करता येत नाही.
5 वर्षांपूर्वी -
जीत कर हारने वाले को केजरीवाल कहते है - शशी थरूर
जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी दिल्ली सरकारने परवानगी दिली आहे. यावरुन काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी टि्वट करुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. जीतकर हारनेवाले को केजरीवाल कहते हैं, असा टोला त्यांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजद्रोहाच्या खटल्याला मंजुरी दिल्याबद्दल धन्यवाद; प्रकरण गंभीरपणे घ्यावे - कन्हैय्या कुमार
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि इतर नऊ जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याला दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने पोलिसांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार पी चिदंबरम यांनी दिल्लीतील आप सरकारच्या निर्णयावर टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने नव्हे तर कन्हैय्या कुमारवरील देशद्रोहाच्या खटल्याला केजरीवालांकडून मान्यता
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि इतर नऊ जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याला दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने पोलिसांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार पी चिदंबरम यांनी दिल्लीतील आप सरकारच्या निर्णयावर टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीत बाहेरचे दंगेखोर घुसले आहेत; ती दिल्लीतील जनता नाही: मनीष सिसोदिया
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन दिल्लीतील जाफराबाद येथील आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले आहे. या हिंसाचारात एकूण ७ जण मृत्युमुखी पडले आहेत. यात एक पोलीस आणि ६ नागरिकांचा समावेश आहे. तर ७५ हून अधिकजण जखमी झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मेलेनिया ट्रम्प यांची दिल्लीतील शाळांना भेट; केजरीवाल व सिसोदियांना वगळले
अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येणार असल्याने अहमदाबाद पासून ते आगरा पर्यंत जोरदार तयारी करण्यात येत आहे. अहमदाबाद येथील रस्ते सुद्धा सजवण्यात आले आहेत. तर मोटेरा स्टेडिअम येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. याच दरम्यान शुक्रवारी अहमदाबाद विमानतळावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षिततेसाठी कडक बंदोबस्त करण्यात येणार आहे. तर आज विमानतळाच्या बाहेर मॉक ड्रिल सुद्धा झाले. ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांची सुरक्षितता पाहता अहमदाबाद विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची दोन दिवसांची सुट्टी २४-२५ फेब्रुवारीला रद्द करण्यात आली आहे. पोलिसांना हे कर्मचारी ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान मदत करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आप'ची सुद्धा विकासासोबत 'हिंदुत्वाकडे' वाटचाल? भाजपच्या हिंदुत्वाला आव्हान देणार?
पुढील व्यापक राजकारणाचा विचार करता महाराष्ट्रात मनसेने हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला आहे. दिल्लीत देखील केजरीवाल सरकार विकासाच्या बळावर सत्तेत आलं आहे. मात्र देशातील प्रत्येक राज्यात निवडणुका निरनिराळ्या मुद्यांवर होतं असतात. त्यात दिल्लीच्या बाहेर आपला जनाधार नसून, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची फळी देखील नाही. त्यामुळे दिल्लीबाहेर हातपाय पसरायचे असतील तर दिल्लीतील केलेल्या विकासाच्या आडून प्रचार करत स्वतःची हिंदुत्वाला मानणारी आम आदमी पार्टी अशी प्रतिमा बनवायची आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
5 वर्षांपूर्वी -
अण्णांमुळे 'ब्रँड' केजरीवाल उदयास आला; त्यांनाच शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण नाही
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे एकेकाळचे सहकारी आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आता तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याकडून शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धाडण्यात आलंय. परंतु, उल्लेखनीय म्हणजे अद्याप या सोहळ्याचं निमंत्रण अण्णा हजारे यांना मिळालेलं नाही. त्यामुळे, या शपथविधीसाठी अण्णा हजारे यंदा तरी उपस्थित राहणार का? याची उत्सुकता कायम आहे.
5 वर्षांपूर्वी -
केजरीवालांची खासदार असलेल्या भोजपुरी कलाकारासोबत तुलना करण्याचा प्लॅन यशस्वी
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच भाजपाच्या रणनीतीकारांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारात तुलना करण्याची योजना आखली होती. मात्र, आपच्या सोशल मीडिया टीमने कुठेही चलबिचल न होता, भाजपचे दिल्लीतील खासदार आणि भोजपुरी कलाकार मनोज तिवारी यांच्याशी केजरीवालांची तुलना सुरूच ठेवण्याची योजना आखली होती.
5 वर्षांपूर्वी -
अमित शहा! करंट लगा क्या?...दिल्लीत आप कार्यकर्त्यांनी पोस्टर्स झळकावले
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का देत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत विजयाची हॅट्रिक करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आतापर्यंतच्या कलानुसार दिल्लीतील विधानसभेच्या ७० जागांपैकी आम आदमी पार्टी ५८ आणि भारतीय जनता पक्ष १२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.
5 वर्षांपूर्वी -
भाजपकडून हजारो प्रचारक आमदार, २०० खासदार, ११ मुख्यमंत्र्यांसाठी सांत्वन पोस्टर
नवी दिल्ली: दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात लावलेल्या पोस्टरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो दिसत आहे. यासोबतच पोस्टरवर, विजयामुळे आम्हाला गर्विष्ठ होत नाही आणि पराभवामुळे आम्ही निराश होत नाही असा संदेश लिहिण्यात आलेला आहे. मतमोजणीआधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून, दिल्लीमध्ये सरकार बनेल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मनोज तिवारी यांनी भारतीय जनता पक्षाला ५५ जागा मिळतील असं म्हटलं होतं. पण मतमोजणीला सुरूवात होताच आपने स्पष्ट आघाडी घेतल्याचं समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून हे पोस्टर लावण्यात आलं आहे. यामुळे एकप्रकारे भारतीय जनता पक्षाने पराभव स्वीकारण्याची तयारी केल्याचं म्हटलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा ठरले भाजपसाठी शनीचा अवतार
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे. दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार,… पुन्हा केजरीवाल सरकार कमबॅक करणार का?… भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची कामगिरी कशी असेल?…. आपची हॅटट्रिक भाजप रोखणार का?… मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरणार का?…. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
प्रदूषणामुळे विजयानंतर फटाके न फोडण्याचे केजरीवाल यांचे कार्यकर्त्यांना आदेश
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे. दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार,… पुन्हा केजरीवाल सरकार कमबॅक करणार का?… भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची कामगिरी कशी असेल?…. आपची हॅटट्रिक भाजप रोखणार का?… मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरणार का?…. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच आवाहन होतं 'राष्ट्र द्वेषींना हटवा'; मतदाराने भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला हटवलं
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे. दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार,… पुन्हा केजरीवाल सरकार कमबॅक करणार का?… भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची कामगिरी कशी असेल?…. आपची हॅटट्रिक भाजप रोखणार का?… मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरणार का?…. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळत आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER