महत्वाच्या बातम्या
-
शिक्षण, आरोग्य आणि वीज अशा मुद्यांवर दिल्लीत पुन्हा 'केजरीवाल सरकार' येणार
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे. दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार,… पुन्हा केजरीवाल सरकार कमबॅक करणार का?… भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची कामगिरी कशी असेल?…. आपची हॅटट्रिक भाजप रोखणार का?… मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरणार का?…. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली: फिर एक बार केजरीवाल सरकार; मोदी-शहांचा प्रचार कुचकामी
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध वृत्तसंस्था आणि सर्वेक्षण संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (EXIT POLL) निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पक्षाचीच (आप) सत्ता येईल. परंतु, गेल्यावेळच्या तुलनेत त्यांच्या जागांमध्ये घट झाली आहे. याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. तर काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीप्रमाणे एकही जागा मिळवता आलेली नाही. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
केजरीवाल यांनी घोषणा केल्या कामं नाही; मोदीजी कमी बोलले पण कामं जास्त: चंद्रकांत पाटील
महाराष्ट्रातून दिल्ली विधानसभेच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी नेत्यांना बोलावण्यात आले आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी देखील दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी एक सभेत उपस्थित लोकांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘केजरीवाल यांनी केवळ घोषणा केल्या पण कामं आजोबाच्या नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी कमी बोलले पण कामं जास्त केल्याचा दावा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपला दिल्लीत धुव्वा उडण्याची भीती? २०० खासदार, ७० केंद्रीय मंत्री, ११ मुख्यमंत्री प्रचारात
अवघ्या १० दिवसांवर आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीला भाजपने आता हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाकिस्तान असाच रंग देण्याची पुरेपूर योजना आखली आहे. त्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी आपल्या प्रचारसभेत भाजप समर्थकांना ‘गोली मारो’च्या घोषणा द्यायला उद्युक्त केल्यानंतर, मंगळवारी दिल्लीचे लोकसभेतील खासदार प्रवेश वर्मा यांनीही दिल्लीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास आपल्या मतदारसंघातील सरकारी जमिनींवरील सर्व मशिदी हटविण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानला हरवायला ३ दिवसही लागणार नाहीत, अशी ग्वाही एनसीसीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिली.
5 वर्षांपूर्वी -
चांगलं ते स्विकारण्याच्या वृत्तीवरून अरविंद केजरीवाल यांच्याकडून आ. रोहित पवारांना शुभेच्छा
शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार विधानसभा निवडणुकीदरम्यान चांगलेच चर्चेत होते. पक्षाची चौकट सोडून लोकांमध्ये सहजपणे मिसळण्याच्या त्यांच्या स्वभावाचे अनेकांनी कौतुक केले होते. यानंतर आता आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी रोहित पवार यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे ते पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर; ८ फेब्रुवारी रोजी मतदान
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने यावेळी केली. दिल्लीत एक कोटी ४६ लाख मतदार आहेत. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच दिल्लीत मात्र राजकीय वातावरणं चांगलंच तापलं आहे. सोबतच दोन मुद्द्यांवर गूढ कायम आहे. एक म्हणजे या निवडणुकीत भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आहे ? आणि दुसरं म्हणजे सुधारित नागरिक्तव कायद्याचा निवडणुकीत काय परिणाम होईल?.
5 वर्षांपूर्वी -
केजरीवाल सरकार मोदी सरकारच्या विकास कामांचं क्रेडिट स्वतःकडे घेत आहे: अमित शहा
राजधानी दिल्लीत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोपांच्या फेरी झडण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी दिल्ली विकास प्राधिकरणद्वारा आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
निवडणूक रणनीती चाणक्य प्रशांत किशोर दिल्लीत आम आदमी पार्टी'साठी रणनीती आखणार
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले की, प्रशांत किशोर यांची कंपनी आयपॅक दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत काम करणार आहे. दरम्यान, आज बिहारमध्ये प्रशांत किशोर आणि मुख्यमंत्री नीतिश कुमार यांची भेट होणार आहे. नागरिकत्व संशोधन कायद्याबाबत वेगळं मत असल्याने जेडीयूमध्ये प्रशांत किशोर यांना विरोध होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली महिला सुरक्षा; उद्यापासून बसमध्ये १३,००० मार्शल तैनात होणार: केजरीवाल
बसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सार्वजनिक बसेसमधील मार्शलची संख्या वाढवून जवळपास १३,००० केली जाईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले. महिलांच्या सुरक्षिततेबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, ‘मंगळवारपासून अतिरिक्त मार्शल बसगाड्यांमध्ये बसण्यास सुरवात करतील. सध्या दिल्लीत सुमारे ४,४०० बस मार्शल आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आम्ही या प्रकाराशी सहमत नाही. केजरीवालांच्या सुरक्षेत उणीव राहता कामा नये: शिवसेना
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखामधून आपचे सर्वेसर्वा आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘किती थपडा खाल?’ या मथळ्याखाली आज सामनामधून उद्धव ठाकरे यांनी नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. ‘नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न खरंच सुटणार आहेत काय? संताप व्यक्त करण्यापुरते हे प्रकार मान्य, पण शेवटी संयमाचा बांध फुटतो व हे नको ते प्रकार घडतात.
6 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदींकडून आचारसंहितेचा भंग? निवडणूक आयोगाने मागवला अहवाल
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचार संहिता हि लागू झाली आहे. परंतु भाजप नेतृत्व आणि नेते, उच्च पातळीवर असो कि खालच्या लेवल ला सगळेच भाजपवाले आचार संहितेचा भंग करताना दिसत आहेत. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याच्या अनेक तक्रारींचा भडीमार सध्या निवडणूक आयोगाला सहन करावा लागत आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी मुलांसाठी एक शाळाही उभारलेेली नाही: अरविंद केजरीवाल
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी थेट शिक्षणव्यवस्था तसेच नव्या शाळांचा दाखल देत दिल्लीतील पालकांना ‘देशभक्ती’ आणि ‘मोदीभक्ती’ या दोन्हीपैकी एक पर्याय निवडण्याचे आवाहन केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजीव गांधींच्या ‘भारतरत्न’वरुन आपमध्ये फूट? आमदार अलका लांबा नाराज?
दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीचा ठपका ठेवत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत सरकारने परत घेण्याच्या ठरावावरुन आपमध्ये वादंग निर्माण झालं आहे. कारण दिल्ली विधानसभेत सदर विषयाला अनुसरून थेट ठराव मांडण्यात आल्यानंतर आपच्या विद्यमान आमदार अलका लांबा यांनी समाज माध्यमांवर उघड नाराजी व्यक्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
केजरीवालांवर हल्ल्याचा कट? तरुणाकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काही दिवसांपूर्वी कार्यालयाजवळ धक्काबुक्की करत एका इसमाने मिरची पूड फेकल्याचं असफल प्रयत्न केला होता. ते संपूर्ण प्रकरण ताज असताना आत केजरीवालांच्या जनता दरबारातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने त्याला पोलिसांनी ताबडतोब अटक करून चौकशी सुरु केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आम आदमी पार्टी उभी करत आहे १५,००० जणांची सोशल मीडिया आर्मी
आगामी निवडणूक या सर्वच पक्षांची अग्निपरीक्षा ठरणार आहे. त्यात समाज माध्यमांचा उपयोग करून विरोधकांच्या रणनीतील शह देण्यासाठी आणि आप पक्षा विरूद्धच्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. कारण आता आम आदमी पक्ष तब्बल १५,००० सोशल मीडिया आर्मी उभी करत असून भाजपला केंद्रस्थानी ठेऊन सर्व योजना आखली जात असल्याचं वृत्त आहे. प्रिंट मीडियापेक्षा डिजिटल न्युज सर्वात प्रभावी माध्यम ठरलं आहे आणि बातमी वेगाने व्हायरल करण्यासाठी समाज माध्यमं हा त्यामागील सर्वात मोठा स्रोत असल्याचं सर्वच प्रमुख पक्षांच्या ध्यानात आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
दिल्लीकरांचे अच्छे दिन येणार - घर बसल्या शासकीय सुविधा
दिल्लीकरांचे अच्छे दिन येणार – घर बसल्या शासकीय सुविधा
6 वर्षांपूर्वी -
अमित शहांना आवाहन; आपच्या आणि भाजपच्या विकास कामांची चर्चा रामलीला मैदानावर होऊन जाऊ दे
आपचे नेते तसेच दिल्ली’चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विकास कामांच्या मुद्यावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट रामलीला मैदानावर खुल्या चर्चेचे आवाहन दिल आहे. देशातील पूर्वांचलच्या भागात विकासासाठी मोदी सरकारने काय केले याचा हिशेब रामलीला मैदानावरील पूर्वांचल महाकुंभामध्ये अमित शहांनी मांडला होता त्याला केजरीवाल यांनी खुलं आवाहन देत, तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं याची खुली चर्चा होऊन जाऊ दे असं म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मशिदींवरील लाऊडस्पीकरने ध्वनीप्रदुषण होते का? तपास करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश
मशिदींवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनीप्रदुषण होते का त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. कारण पूर्व दिल्लीतील सात मशिदींवर लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत आणि त्यामुळे ध्वनीप्रदुषण होत असल्याची तक्रार राष्ट्रीय हरित लवादाकडे संबंधितांकडून करण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
अरविंद केजरीवाल यांचे मराठीत ट्विट, लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर
दिल्ली चे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे सर्वेसेवा अरविंद केजरीवाल यांची मराठीतून ट्विट करत महाराष्ट्राला साद.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार