Ascom Leasing and Investments Share Price | लॉटरी लागली! हा शेअर आहे का तुमच्याकडे? फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पहा
Ascom Leasing & Investments Share Price | ‘ॲसकॉम लीजिंग एंड इंवेस्टमेंट्स लिमिटेड’ या स्मॉल कॅप फायनान्स कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ‘ॲसकॉम लीजिंग एंड इंवेस्टमेंट्स लिमिटेड’ कंपनीने नुकताच सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने यासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. ‘ॲसकॉम लीजिंग एंड इंवेस्टमेंट्स लिमिटेड’ कंपनीने प्रत्येक दोन शेअर्सवर एक बोनस शेअर मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे, आणि त्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून 6 मार्च 2023 हा दिवस निश्चित केला आहे. ‘ॲसकॉम लीजिंग एंड इंवेस्टमेंट्स लिमिटेड’ कंपनीचे बाजार भांडवल 339.67 कोटी रुपये आहे. तर शुक्रवार दिनाक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 434.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Ascom Leasing & Investments Share Price | Ascom Leasing & Investments Stock Price | NSE ASCOM)
2 वर्षांपूर्वी