महत्वाच्या बातम्या
-
खड्डयांसोबत सेल्फी | राष्ट्रवादी यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर स्तुत्य उपक्रम का राबत नाही?
गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई- गोवा महामार्गावर हा “स्तुत्य उपक्रम” का राबत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? असे प्रश्न भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी विचारले आहेत. शेलार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना यासंदर्भात एक पत्रदेखील लिहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास - आ आशिष शेलार
विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. यूजीसीच्या 6 जुलैच्या गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. ही तारीख राज्य सरकार पुढं ढकलू शकते, असं कोर्टानं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनमध्ये पार्ट्यांच्या आयोजनात पब-पार्टी गँगचे कुणी समर्थक सत्ताधारी आहेत का?
सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश देताना प्राथमिकदर्शी मुंबई पोलिसांनी कोणतंही चुकीचं काम केल्याचं सूचवत नसल्याचं म्हटलं आहे. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांनी मर्यादित तपास केला असून एफआयआर दाखल केला नसल्याचं न्यायालयाने निदर्शनास आणलं.
4 वर्षांपूर्वी -
वटवृक्ष वाचवण्यासाठी पुढाकार आणि मुंबईत १२८२ झाडांची कत्तल करण्याचे प्रस्ताव मंजूर
भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या आड येणारा सुमारे ४०० वर्षे पुरातन वटवृक्ष वाचविण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती. या पत्रास मान ठेवून महामार्गाचा नकाशा बदलला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकार कोकणात विशेष रेल्वे सोडायला तयार, ठाकरे सरकारकडून मागणीच नाही - आ. आशिष शेलार
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना चाकरमान्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय ठाकरे सरकारने घेतला नसून, आता यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. एवढेच नाही तर चाकरमान्यांची कोंडी करण्याची ठाकरे सरकारची इच्छा असल्याचा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आपण हसायचं दुसऱ्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला, अशी त्यांची अवस्था आहे
देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होण्याचं स्वप्न मोदी सरकारने गुंडाळलं आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससीचं मुख्यालय गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये होणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं असून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट गिफ्ट सिटी आकारास येत आहे. त्यातच आता आयएफएससीचं मुख्यालय गांधीनगरला हलवल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिक्षण संदर्भातील मागण्यांसाठी मुख्यमंत्री व मंत्र्यांना टाळून शेलार राज्यपालांकडे
मंगळवारी दुपारच्या सुमारास फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी केली. राज्यात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करुन पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला होता. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा अशी मागणी यावेळी त्यांनी केली होती
5 वर्षांपूर्वी -
आम्ही गुजरात'मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही; आव्हाडांचं शेलारांना प्रतिउत्तर
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) पाठिंबा दर्शवला आहे की विरोध हे प्रोमोमध्ये स्पष्ट झालेलं नाही. तर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (NRC) विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भुमिका मांडली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांना 24×7 तास पाणी देऊ अशी 'फेंकम फाक' करत 24×7 बार उघडे: आशिष शेलार
वांद्रे ते जोगेश्वरी विभागात मागील ३ दिवस पाणी नसल्यामुळे तेथील रहिवाशांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. मेट्रोच्या कामामुळे वांद्रे ते जोगेश्वरी विभागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे येथे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. असे असूनही अजून पालिकेने याची दखल घेतली नसून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पाणी नसल्याने लोकांनी थेट बिस्लरी बॉटलचे पाणी कपडे, भांडी आणि आंघोळीसाठी विकत घेतलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या बेकारांकडे सध्या खिजवणे, चिडवणे, टिंगलटवाळी एवढेच काम: अनिल परब
सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना नेत्यांमध्ये मुंबईतील नाईटलाईफ’वरून जोरदार टीका टिकण्या सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यात भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष केल्याने शिवसेनेतील नेते मंडळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार सर्वात अग्रणी असल्याने परिवहन मंत्री अनिल मंत्री एकूणच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर बोचरी टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कृष्णकुंज'वर भाजप नेत्यांच्या भेटीगाठी; भगव्या मनसे मोर्चाची चर्चा देशभर होणार
राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाची कास धरल्याने भारतीय जनता पक्षाला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते राज ठाकरेंना भेटत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंची भेट घेऊन काही दिवस लोटत नाही तोच आता आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतलीय. या वाढत्या भेटींमुळे ९ फेब्रुवारीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला भारतीय जनता पक्ष छुप्या पद्धतीने सहकार्य करणार असल्याची चर्चा सुरु झालीय.
5 वर्षांपूर्वी -
आशिष शेलार यांची Y दर्जाची सुरक्षा काढली; यापुढे त्यांच्यासोबत केवळ २ हवालदार
भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात अनेक व्यक्तींना विशेष सुरक्षा पुरवली होती. त्यात आपलंच सरकार असल्याने अनेक भाजप नेत्यांनी गरज नसताना केवळ स्टेटस दाखविण्यासाठी मोठ्या दर्जाच्या पोलीस सुरक्षा घेतल्या होत्या. सध्या ठाकरे सरकारने त्यासर्व सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून अनेकांची सुरक्षा घटवून राजकीय टिमक्या मिरवण्यापासून रोखले आहे. त्याचा विशेष फटका भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना देखील बसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले: आशिष शेलार
राज्यसभेत बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. त्याअगोदर ते लोकसभेतही मंजूर झाले होते. या विधेयकाला दोन्ही सभागृहात विरोधकांनी विरोध केला होता. शिवसेनेने लोकसभेत फारसा विरोध केला नाही. परंतु, राज्यसभेत शिवसेनेने विरोध केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सभागृहात या विधेयकावर स्पष्ट मत मांडले. या विधेयकाच्या माध्यमातून मतांचे राजकारण व्हायला नको, असे राऊत म्हणाले. एवढेच काय तर या विधेयकाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने सभात्याग केला. परंतु, तरीही राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. दरम्यान, शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन भारतीय जनता पक्ष नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा मोदींबद्दलचा आदर स्वाथी की नि:स्वार्थी? आशिष शेलार
गुरूवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. ‘मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा बंद दाराआड अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली होती. ती बंद दाराची खोली खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यामुळे त्यांची ती खोली आम्हाला मंदिरापेक्षा कमी नाही. तिथे झालेली शहा-ठाकरे यांच्यातील चर्चा शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली नाही, त्यामुळे गोष्टी बिघडल्या’, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांच्यावर केला होता. त्यामुळे आशिष शेलार यांनी आज संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
5 वर्षांपूर्वी -
दुष्काळग्रस्त भागातील गरीब विद्यार्थ्यांचं परीक्षा क्षुल्क माफ
राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील गरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा राज्य सरकारने दिला आहे. या भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा क्षुल्क माफ करण्यात आले आहे. हा महत्वपूर्ण निर्णय राज्यसरकारने घेतला असल्याची माहिती शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरून दिली. ज्या दुष्काळग्रस्त भागात लोकांना अन्न पाण्याविना राहावे लागते. त्याच परिस्थितीत विध्यार्थी परीक्षा क्षुल्क कसे भरू शकणार यासाठी राज्यसरकारने हा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मनोज कोटक यांची वर्णी लागण्याची शक्यता
लोकसभेच्या निवडणुका झाल्याने आता निकालाची प्रतीक्षा असली तरी सर्वच पक्षांमध्ये फेरबदलाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बदल होणार असल्याचे संकेत आहेत. मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशीष शेलार यांची अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्या जागी नव्या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि त्यात गुजराती चेहऱ्यालाच प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवाजी पार्कातली काय, इथे कृष्णकुंज'च्या आतली झाडं पण जपली आहेत: शेलारांना नेटिझन्सच उत्तर
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दत्तक गावावर टीका केली होती. यावर भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडीओ दाखवून सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी तुम्ही करताय तो विपर्यास, आमचे खासदार करतात तो प्रयास, अशी बोचरी टीका देखील केली. पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ज्या माणसाने शिवाजी पार्कवरचं एक झाड देखील दत्तक घेतलं नाही ते गाव काय दत्तक घेणार, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.
6 वर्षांपूर्वी -
शेलारांना माहीत नसावं, भाजपचे प्रवक्ते वेरिफाइड अकाऊंटवरून असे फेक व्हिडिओ शेअर करतात
मुंबई : आज मुंबईमध्ये आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या व्हीडीओ आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी जे काही दाखवलं त्यातील अनेक गोष्टी या हास्यास्पद होत्या. मुळात वेरिफाइड अकाउंट कोणाला मिळत याचे फेसबुक व ट्विटरने काही नियम आखले आहेत आणि अकाउंट वेरिफाइड करण्यासाठी संबंधिताला पुरावे देखील द्यावे लागतात. मुळात सामान्य वापरकर्त्याला फेसबुक किंवा ट्विटर अकाउंट वेरीफाईड करता येत नाही. अगदी अनेक पत्रकार, समाज सेवक आणि सामाजिक संस्था देखील आज अन वेरिफाइड अकाउंट वापरतात. त्यात मागील वर्षभरापासून फेसबुक व ट्विटरने भारतात अकाउंट वेरीफाईड करण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंना मोदींच्या मुद्यावरून विचलित करण्याची राज्यातील नेत्यांची रणनीती?
मागील काही महिन्यापासून राज ठाकरे यांनी केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशपातळीवरील नेत्यांना लक्ष करण्याचं एकमेव ध्येय ठेवलं आहे. त्यात ते अनेक व्हिडिओ पुरावे दाखवून मोदींना लक्ष करत असल्याने मोदींच्या अडचणीत वाढताना दिसत आहेत. त्याचा थेट परिणाम राज्यातील नेत्यांवर देखील होताना दिसत आहे. त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना बारामतीचा पोपट असा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढे कार्यकर्त्यांना म्हणाले की त्यांच्या भाषणाने तुम्ही विचलित होऊ नका.
6 वर्षांपूर्वी -
शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे: आशिष शेलार
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेते एकमेकांवर टीका करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बारामतीचा पोपट’ असा त्यांचा उल्लेख केला होता. राज ठाकरेंची भाषणं बारामतीहून येतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तेव्हापासून मनसे आणि भाजपा नेत्यांमध्ये डिजिटल युद्ध पेटलं आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो