Investment Tips | या योजनेत 7 रुपये जमा करून मिळवा 60 हजार पेन्शन आणि कर सवलतही, सरकारी योजनेबद्दल जाणून घ्या
Investment Tips | अटल पेन्शन योजना : अटल पेन्शन योजनेची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली होती. यापूर्वी ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी चालू होती, परंतु आता 18 ते 40 वर्षे वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी ही योजना खुली करण्यात आली आहे. या पेन्शन योजनेत योजनाधारकाना 60 वर्षांनंतर पेन्शन सुरू होते. या योजनेत, तुम्ही 1,000, 2000 रुपये, रुपये 3000, रुपये 4000 आणि कमाल रुपये 5,000 मासिक पेन्शन मिळवू शकतात. ही एक सरकारी पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला सुरक्षेची हमी दिली जाते. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नोंदणी करू शकता. यासाठी तुमच्याकडे बँक बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.
2 वर्षांपूर्वी