भूकंप नव्हे! 100 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ED च्या धाडसत्रात अडकलेले बाबा सिद्दीकी अजित पवार गटात 'पावन' होणार
Baba Siddique Resigned | महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्याबाबतच्या एका बातमीमुळे ED पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. काँग्रेसचे मुंबईतील ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडली आहे. ते अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेनुसार अखेर बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आता १० फेब्रुवारी रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत.
11 महिन्यांपूर्वी