महत्वाच्या बातम्या
-
नितीन गडकरींच्या पत्रावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया आली, म्हणाले नितीन गडकरी...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पत्रामुळे शिवसेनेच्या शिस्तबद्ध पदाधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत मात्र, अकोल्याचे पालकमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे हे योग्य भूमिका घेतील, असे ते म्हणाले. तसेच गडकरी साहेबांचा मी पण एक चाहता आहे, असेही ते म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
नाशिकचा आसिफ आणि रसिका | लव जिहादच्या आरोपांनी मोडले लग्न | बच्चू कडूंनी घडवला समेट
नाशिकमध्ये होणाऱ्या एक आंतरजातीय विवाह सोहळ्याला लव जिहादचा रंग देत समाजातून होणाऱ्या तीव्र विरोधामुळे विवाह रद्द करण्याची वेळ मुलीच्या परिवारावर आली. अशात या मुलीच्या कुटुंबाची मंत्री बच्चू कडू यांनी भेट घेत कुटुंबाला मानसिक आधार देत पाठिंबा दर्शवला. इतकेच नाही तर मी लग्नात येऊन नाचेल, असेही बच्चू कडू यांनी म्हणत आंतरजातीय विवाह सोहळ्याला विरोध करणाऱ्याला तंबी दिली.
4 वर्षांपूर्वी -
...तर दहावी, बारावीच्या शाळा सुरू होऊ शकतील - राज्यमंत्री बच्चू कडू
राज्यात सध्या कोरोनाची रुग्ण संख्या ही कमालीची घटली आहे. लॉकडाऊनमध्येही शिथिलता मिळाली आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. कोरोनाची अशीच परिस्थिती राहिली तर शाळा सुरू करायला हरकत नाही. जर पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढला तर शाळा बंद देखील कराव्या लागतील. अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री मंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्याला अधिक लस किंवा इतर कोरोनासंबंधित साहित्य द्या असे एक तरी निवेदन फडणवीसांनी मोदींकडे दिले का? - बच्चू कडू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या भूमिका बजावायला पाहिजे होत्या, त्या त्यांनी बजावल्याच नाही. त्यामुळे आज जी आपत्ती आली आहे ती देशासोबत राज्यावर येऊन पडली आहे. देशात जर योग्य नियोजन झाले असते तर आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते,” असा जोरदार हल्लाबोल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे वागले | त्यांनीच पदाचा मान ठेवला नाही
राज्यपाल गेल्या वर्षभरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागले, त्यांनीच राज्यपालाच्या पदाचा सन्मान ठेवला नाही, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. राज्यपालांना सरकारी विमानप्रवास नाकारणे हा केवळ तांत्रिक मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्याविरोधात काॅंग्रेसचा मोर्चा | तोही राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात
नव्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशींवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने अखेर एक पाऊल मागे घेतले. याबाबत स्वतंत्र समिती नेमून तोडगा निघेपर्यंत तिन्ही कायद्यांना दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने बुधवारी शेतकरी संघटनांसमोर ठेवला. तसे प्रतिज्ञापत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याची तयारी केंद्राने दर्शवली. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
बच्चू कडूंच्या नेतृत्वात मुंबईतील रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा | पण त्याआधीच...
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज मुंबईत रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पण बच्चू कडू यांना पोलिसांनी नागपुरातच रोखून धरलं आहे. महत्वाची बाब म्हणजे बच्चू कडू यांना वरिष्ठांच्या आदेशानुसारच अडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हा आदेश देणारे वरिष्ठ कोण? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायदे फक्त अंबानी-अदानी यांच्या सारख्या मोठ्या लोकांसाठी आणले आहेत - बच्चू कडू
कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी पंजाबच्या सात जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजार गावातून 1,500 हून अधिक वाहनं येणार आहेत. त्यापैकी 1,300 ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्लीकडे येणार आहे. किसान मजदूर संघर्ष समितीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आंदोलकांनी त्यांचा एक नवीन काफिला तयार केला आहे. जो रविवारी दिल्लीच्या सीमेपर्यंत दाखल होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा आहे, की पाकिस्तानचा हे एकदा चेक करा
“रावसाहेब दानवे यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे, की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल,” अशी घणाघाती टीक राज्यमंत्री बच्चू कडू (MahaVikas Aghadi Minister Bacchu kadu) यांनी केली. ते मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे (BJP MP Raosaheb Danve) यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.
4 वर्षांपूर्वी -
नाथाभाऊंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने भाजप उ. महाराष्ट्रात अनाथ होणार | बच्चू कडूंची प्रतिक्रिया
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आपली कन्या रोहिणी आणि निवडक कार्यकर्त्यांसह शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते - बच्चू कडू
जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पावसाने किती नुकसान झाले आहे याची पाहणी केली. अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सोयाबीन आणि कपाशी पिकांची पाहणी करुन, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. “शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळेल”, असे आश्वासन यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिवाळीनंतर इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत शाळा सुरू करणार | शिक्षण राज्यमंत्र्यांची माहिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शासकीय खाजगी शाळा महाविद्यालय अद्यापही बंद आहे. परंतु दिवाळी नंतर राज्यातील वर्ग ९ ते १२ वी पर्यत शाळा सुरू करणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंत्री बच्चू यांनी दिली. कोरोना काळातील सर्व नियम अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे असही शिक्षण राज्यमंत्री बच्चू म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणुकीत पण निवडून येणार नाही | माध्यमं जास्तंच महत्व देत आहेत
गेल्या काही दिवसांपासून राज्यात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांवर कंगनानं केलेल्या टीकेमुळे या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर कंगनानं शिवसेनेविरोधात सोशल मीडियावर मोर्चा उघडला. कंगनाच्या ट्विटला सुरुवातीला खासदार संजय राऊत यांनीही जोरदार उत्तर दिलं. त्यानंतर हा वाद आणखी पेटतच गेला.
4 वर्षांपूर्वी -
मोदीजी, ही शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय | बच्चू कडुंचा संतप्त सवाल
केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी उठवलेली कांद्यावरील निर्यातबंदी आता पुन्हा लागू केली आहे. त्यामुळे लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिक्षण सर्वांना समान मिळायला हवं | ऑनलाईन शिक्षणाने शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं लक्षात येताच साधारण पाच महिन्यांपूर्वी प्रशासनाकडून काही महत्त्वाची पावलं उचलली जाऊ लागली. दैनंदिन जीवनावर याचे थेट परिणाम पाहायला मिळाले. त्यातच शिक्षण व्यवस्थेवरही या परिस्थितीमुळं काही मोठे परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरु झालेलं असूनही कोरोनाचं संकट टळल्यामुळं शाळा काही अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. पण, येत्या काळात हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे - राज्यमंत्री बच्चू कडू
राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांच्या मुद्द्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाली झाल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले. ते शनिवारी चांदूर बाजार तालुक्यातील शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कृषी खात्याला खडे बोल सुनावले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा