Bajaj Steel Industries Share Price | बजाज स्टील इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 1500 टक्के परतावा दिला, आता 60 टक्के लाभांश देणार
Bajaj Steel Industries Share Price | बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनी मागील आठवड्यात शुक्रवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले. मार्च 2023 तिमाहीत बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनीने 1566.06 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाही कालावधीत बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनीने 519.44 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील एका वर्षात बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनी आपल्या शेअर धारकांना 128.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनीने Q4 निकालांसह लाभांश वाटप करण्याची घोषणा देखील केली आहे.
2 वर्षांपूर्वी