Balaji Solutions IPO | बालाजी सोल्यूशन्स आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या
आयटी हार्डवेअर आणि मोबाइल अॅक्सेसरीज कंपनी बालाजी सोल्यूशन्स आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे. आयपीओच्या माध्यमातून पैसे उभे करण्यासाठी कंपनीने भांडवली बाजार नियामक सेबीकडे प्रारंभिक मसुदा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे. सेबीकडे दाखल झालेल्या मसुद्यानुसार कंपनी आयपीओच्या माध्यमातून 120 कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर्स जारी करणार आहे. याशिवाय कंपनीचा प्रमोटर आणि प्रवर्तक समूह ऑफर फॉर सेल (ओएफएस) विंडोअंतर्गत 75 लाख इक्विटी शेअर्सची विक्री करणार आहे.
2 वर्षांपूर्वी