Baleno Price | सुवर्ण संधी! मारुती बलेनो कार खरेदीवर मोठी बंपर सूट, पाडव्यापूर्वी लोकांची शो-रूमकडे धाव
Baleno Price | या महिन्यात म्हणजेच एप्रिल 2024 मध्ये तुम्ही मारुती सुझुकीची बलेनो खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठी सूट मिळणार आहे. खरं तर, कंपनी या महिन्यात आपल्या बेस्ट सेलिंग प्रीमियम हॅचबॅकवर 53,000 रुपयांचे फायदे देत आहे. ग्राहकांना या ऑफरचा लाभ 30 एप्रिलपर्यंतच मिळणार आहे. म्हणजेच ही कार खरेदी करण्यास उशीर करू नये. बलेनो ची विक्री मारुतीच्या नेक्सा डीलरशिपवर केली जाते. तसेच देशातील टॉप-5 बेस्ट सेलिंग कारच्या यादीत याचा समावेश आहे.
9 महिन्यांपूर्वी