Bank of Maharashtra Alert | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेच्या या सेवा दरांमध्ये वाढ, नेमकं काय होणार?
Bank of Maharashtra Alert | जर तुमचे खातेही बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने विविध कालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड इंटरेस्ट रेटमध्ये (एमसीएलआर) ०.१० टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व प्रकारच्या कर्जाच्या EMI मध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आर्थिक फटका बसणार आहे.
2 वर्षांपूर्वी