Bank Rules | बँके किंवा पोस्ट ऑफिसमधून रोख रक्कम काढणे किंवा जमा करण्याचे नियम बदलले | तपशील जाणून घ्या
चालू खाते उघडण्यासाठी तसेच आर्थिक वर्षात २० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी सरकारने आधार किंवा पर्मनंट अकाउंट नंबर (पॅन) अनिवार्य केला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका अधिसूचनेत म्हटले आहे की, आर्थिक वर्षात बँकांकडून मोठ्या रकमेचा व्यवहार करण्यासाठी पॅन नंबरची माहिती किंवा आधारची बायोमेट्रिक पडताळणी देणे बंधनकारक असेल. याशिवाय बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडणेही आवश्यक असणार आहे.
3 वर्षांपूर्वी