Bank Shares | अमेरिकेतील बँकिंग संकट भारतासाठी सुवर्ण संधी? तज्ञ म्हणतात बँकिंग स्टॉक खरेदी करा, स्टॉकचे नाव, टार्गेट प्राईस पहा
Bank Shares | जगात आर्थिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेला जबरदस्त दणका बसला आहे. अमेरिकेतील दोन प्रतिष्ठित बँका बुडाल्या आहेत. आणि 14 इतर अमेरिकन बँका बुडण्याच्या जवळ आहेत. अशा सर्व नकारात्मक बातम्यांचा परिणाम भारतीय बँकांच्या शेअर्सवर ही पाहायला मिळत आहे. ‘युनियन बँक’, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’, ‘बँक ऑफ बडोदा’, ‘कॅनरा बँक’, ‘आयसीआयसीआय बँक’, ‘आरबीएल बँक’, ‘इंडसइंड बँक’, ‘अॅक्सिस बँक’, यांचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली आले आहे. अशा वेळी बऱ्याच तज्ञांनी या संकटाकडे संधी म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. पुढील काळात भारतीय बँकिंग सेक्टर मजबूत वाढेल असे तज्ञांना वाटते.
2 वर्षांपूर्वी