महत्वाच्या बातम्या
-
PMC बँकेच्या आणखी एका महिला खातेदाराचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
पीएमसी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी आणखी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीएमसी बँकेत अडकलेले पैसे मिळतील की नाही या चिंतेत असलेल्या आणखी एका खातेदार महिलेचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये घडली. कुलदिपकौर विग (६४) असे या महिलेचे नाव असून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे पीएमसी बँकेमध्ये सुमारे १७ लाख रुपये अडकले होते. कुलदिपकौर या बुधवारी रात्री पीएमसी बँकेसंदर्भातील बातम्या पाहून झोपी गेल्यानंतर दोन तासांतच त्यांचा हृदयविकराने मृत्यू झाला.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली नागरिक सहकारी बँकही PMC बँकेच्या मार्गावर? SBI पेक्षा १३ पट एनपीए
देशात पीएमसी बँकेवरून वातावरण तापलेलं असताना अजून एक बँक प्रचंड वाढत्या एनपीए’मुळे प्रकाशझोतात आली आहे आणि त्यामुळे ग्राहकांची धाकधूक वाढली आहे. दिल्ली राज्य सरकारच्या सहकारी संस्थांच्या रजिस्ट्रारने (आरसीएस) सदर खटला दिल्ली नागरिक सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीविरूद्ध चालवण्यास अधिकृत परवानगी दिली आहे. आरसीएस’च्या बँक ऑडिट टीम त्यांना अनेक कारणांसाठी दोषी ठरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच बँकेच्या नॉन परफॉर्मिंग अस्सेट्स’मध्ये (एनपीए) प्रचंड वाढ झाल्याने, मोठं आर्थिक आर्थिक नुकसान झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
PMC बँक: वृद्ध आजींचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मुलीचे अडीच कोटी बँकेत अडकले
पीएमसी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी आणखी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत पीएमसीच्या चार खातेदारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा एका पीएमसीच्या खातेदारकाच्या आईचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हृयविकाराच्या झटक्याने मुंबईत राहणाऱ्या भारती सदारंगानी (७३) यांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पीएमसी बँक खातेदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका; याचिकेवरील सुनावणीस नकार
पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानं लाखो खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हवालदिल झालेल्या खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास आज सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
PMC Bank घोटाळा: आर्थिक गुन्हे शाखेकडून बँकेचे संचालक व बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) कथित गैरव्यवहार प्रकरणी आज अखेर आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरून एचडीआयएल आणि बँकेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
PMC बॅंकेनंतर लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयचे निर्बंध
रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर कडक कारवाई केली आहे. या बँकेला PCA यादीत टाकण्यात आलं आहे. PCA म्हणजेच प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन. या श्रेणीतल्या बँकांची आर्थिक स्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत बँक नवं कर्ज देऊ शकत नाही. याआधीही आणखी काही सहकारी बँका PCA मध्ये आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
HDIL'ला कर्ज देताना काही संचालकांनी ६ वर्षांपूर्वी तांत्रिक फेरफार केल्याने RBI'ला सत्य समजलं नाही
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे या बँकेचे हजारो ग्राहक हवालदिल झाले असतानाच आमच्या बँकेत आर्थिक घोटाळा झालेलाच नाही, रिझर्व्ह बँकेने केलेली कारवाई ही अतिशय कठोर आहे, असा दावा या बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत केला.
5 वर्षांपूर्वी -
पीएमसी बँकेविरोधात सखोल चौकशीसाठी किरीट सोमय्यांची आरबीआय'कडे तक्रार
महाराष्ट्रासह अन्य ७ राज्यांमध्ये मिळून १३७ शाखा असलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून, त्यामुळे काही लाख खातेदारांवर संकट कोसळले होते. आरबीआयने या बँकेतून खातेधारकांना केवळ एक हजार रुपयेच काढण्याची मुभा दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
PMC बँक: खातेदारकांना आता सहा महिन्यात १० हजार काढता येणार
महाराष्ट्रासह अन्य ७ राज्यांमध्ये मिळून १३७ शाखा असलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून, त्यामुळे काही लाख खातेदारांवर संकट कोसळले होते. आरबीआयने या बँकेतून खातेधारकांना केवळ एक हजार रुपयेच काढण्याची मुभा दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
PMC बँक: बँकेचं संचालक मंडळ आणि त्याचं भाजप कनेक्शन समोर आलं
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. २३ सप्टेंबर पासून हे निर्बंध लागू झाले. बँकेची सद्यस्थिती पाहून नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचं रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात नमूद केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अनेक अंगणवाडी सेविकांचे पगार पीएमसी बँकेत; घर कसं चालवावं या विचाराने रडकुंडीला
सहकार क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँकेने मंगळवारी निर्बंध आणल्यानंतर मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील या बँकेचे हजारो ग्राहक कमालीचे हवालदिल झाले आहेत. तब्बल २५ वर्षांनंतरही सहकारी बँकांत केवळ एक लाख रुपयापर्यंतच्याच ठेवींना विमा कवच, निर्बंधांतून बाहेर पडणाऱ्या बँकांचे अल्प प्रमाण अशा अनेक गोष्टी या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या असून, या सगळ्या परिस्थितीत बँकेचा सामान्य खातेदार वाऱ्यावरच सोडला जात असल्याचे अधोरेखित झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रनामाची बातमी खरी ठरली; या एका कर्जदाराने सामान्यांवर ही वेळ आणली
सहकार क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँकेने मंगळवारी निर्बंध आणल्यानंतर मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील या बँकेचे हजारो ग्राहक कमालीचे हवालदिल झाले आहेत. तब्बल २५ वर्षांनंतरही सहकारी बँकांत केवळ एक लाख रुपयापर्यंतच्याच ठेवींना विमा कवच, निर्बंधांतून बाहेर पडणाऱ्या बँकांचे अल्प प्रमाण अशा अनेक गोष्टी या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या असून, या सगळ्या परिस्थितीत बँकेचा सामान्य खातेदार वाऱ्यावरच सोडला जात असल्याचे अधोरेखित झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
RBI सांगते ६ महिन्यांनी आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन निर्णय; आ. वायकर सांगतात आठवड्यात सुरु?
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. २३ सप्टेंबर पासून हे निर्बंध लागू झाले आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहून नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचं रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात नमूद केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामान्य अंधारात मात्र धनाढ्यांना पूर्व कल्पना; कंपनी अकाउंट आधीच खाली; मातोश्री क्लबचं नाव चर्चेत
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. २३ सप्टेंबर पासून हे निर्बंध लागू झाले आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहून नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचं रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात नमूद केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
विलीनीकरण पडसाद: बँक ऑफ बडोदा देना बँकेचे कार्यालय लिलावात विकणार
कॅनरा, युनायटेड, सिडिंकेट, आंध्रा बँकेचे विलीनीकरण करण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं होते. ३० ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी हा निर्णय जाहीर केला होता. एकूण १० बँकांचं विलीनीकरण केलं जाणार होते असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं होतं. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी बँकांची संख्या २७ वरुन थेट १२ वर येणार आहे. बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं. मात्र मोठ्या संख्येने कार्यालयच कमी करावी लागणार असल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार नाही हा अर्थमंत्र्यांच्या निर्णय हास्यास्पद म्हणावा लागेल.
5 वर्षांपूर्वी -
आता एटीएम कार्डशिवाय सुद्धा पैसे काढता येणार.
एटीएम कार्ड क्लोनिंग करून एटीएम मशिनमधून पैसे काढण्याच्या घटनेत वाढ होत आहे. यावर खबरीचा उपाय म्हणून आता एटीएम कार्ड न वापरता एटीएम मशिनमधून पैसे काढता येणार आहेत. अनेक बँक धारकांसाठी हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योनो या अँपने अलीकडेच हि सेवा सुरु केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
विमा कंपन्या व बँकांच्या संगणमताने शेतकऱ्यांची लुबाडनूक
विमा कंपन्या व बँकांच्या संगणमताने शेतकऱ्यांची लुबाडनूक
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो