महत्वाच्या बातम्या
-
प. बंगालने पहिला डोस दिला आहे, उत्तर प्रदेशात दूसरा डोस | २०२४ पर्यन्त महामारी समाप्त - आ. भाई जगताप
नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यातील विधानसभा निवणुकीत भाजपाला तीन मोठ्या राज्यात मोठा राजकीय फटका बसला आहे. त्यात पश्चिम बंगालमधील सर्व स्वप्नं भंगल्याने भाजपमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सध्या कोरोना आपत्तीमुळे देशात चिंतेचं वातावरण असलं तरी देखील उत्तर प्रदेशात अत्यंत भीषण परिस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना आपत्तीमुळे उत्तर प्रदेशात हाहाकार मजल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत आणि कोरोना आपत्ती २०२२ पर्यंत लांबणार असेच संकेत मिळत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे तोडणारे कोकणात जाऊन झाडांची चिंता व्यक्त करत आहेत - आ. भाई जगताप
महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असताना राजकीय वर्तुळात अनेक विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सूरु आहेच. महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची चिंता व्यक्त करत आहेत. जरा तपासून घ्या स्वत:ला’ अशा शब्दांत काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप यांनी टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राला छत्तीसगड'मधून येणारा ऑक्सिजनचा पुरवठा 110MT वरून 60MT केला - काँग्रेसचा आरोप
देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. असं असतानाच दिल्ली उच्च न्यायालयानेही बुधवारी केंद्र सरकारला चांगलंच फेलावर घेत, “भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, असं उद्वेगाने सुनावलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस
देशासाठी सर्वात वाईट बातमी आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती सातत्याने बिघडत असलेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात विक्रमी 2 लाख 16 हजार 642 लोक संक्रमित आढळले आहेत. गेल्या वर्षी संक्रमणाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एका दिवसात समोर आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. या दरम्यान 1 लाख 17 हजार 825 लोक बरेही झाले आहेत. तर 1182 रुग्णांनी जीव गमावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सत्तेसाठी लोकांच्या जीवाशी खेळ?, मोदी सरकार म्हणजे माणुसकीला काळीमा आहे - भाई जगताप
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस मिळवण्याच्या धडपडीत लसीचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशानंतर आता बिहार, उत्तर प्रदेशातही लसीचा तुटवडा हाेऊ लागला आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. अनेक राज्यांत एक ते दाेन दिवसांचाच साठा शिल्लक आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातच्या माजी गृहमंत्र्यांवर आरोप करणारे IPS संजीव भट्ट जेलमध्ये | परमवीर सिंह कोर्टात आणि भक्त...
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्याकडे दरमहा १०० कोटी रुपये मागितले होते, असा धक्कादायक आरोप गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीरसिंग यांनी केला होता. अँटिलिया स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणावरून नुकतेच परमबीर यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले आहे. परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून यामध्ये थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. पत्राची प्रत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पाठवली आहे. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मीडियाला अंबानीच्या जीवाची काळजी | शेतकरी प्रश्नांवर मीडिया चर्चा केव्हा घेणार? - भाई जगताप
मागील १०० दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनात आज पर्यंत शेकडो शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. मात्र त्यासंदर्भात केंद्र सरकारकडून कोणताही खेद किंवा गरजेचं पाऊल टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील केंद्र सरकार विरोधात रोष वाढताना दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ल्यापेक्षा अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांची चौकशी महत्वाची - भाऊ जगताप
मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हिरेन प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी उचलून धरले. यासोबतच मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरासमोर आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
लोढांवर फसवणूक-खंडणीचा गुन्हा | करमचंद जासुस, मामू-विरोधी पक्षनेते याची पाळेमुळे शोधणार का?
भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांच्या मुलाविरोधात कोर्टाच्या आदेशाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी ज्वाला रिअल इस्टेट प्रा. लि. आणि मायक्रोटेक डेव्हलपर्सचे मालक मंगलप्रभात लोढा, त्यांचा मुलगा अभिषेक तसेच सुरेंद्रन नायर यांच्याविरोधात खंडणी, फसवणूक, धमकी या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO