महत्वाच्या बातम्या
-
बिहारी मजुरांच्या प्रवासाचे पैसे महाराष्ट्राकडून घेणाऱ्या केंद्राकडून मोफत कोरोना लसीच आमिष
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाचा मोफत लस देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज साडे दहाच्या सुमारास बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
4 वर्षांपूर्वी -
गर्दी होतं नसल्याने भाजपच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांवर लहान मुलं | फडणवीस होते उपस्थित
बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) लोकजनशक्ती पक्ष बाहेर पडला असून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने शुक्रवारी उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली. लोकजनशक्ती आता ‘एनडीए’त नसल्याने मोदींच्या छायाचित्रांचा वापर निवडणूक प्रचारासाठी न करण्याची ताकीद भाजपने दिली होती. त्यावर चिराग यांनी ‘मोदी माझ्या हृदयात वसतात’ असे विधान केले. मात्र चिराग यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका न करता बिहारचे मुख्यमंत्री नितीशुकमार यांना लक्ष्य बनवले. मोदींचे छायाचित्र लावण्याची खरी गरज मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आहे. त्यांनी नेहमीच मोदींचा अपमान केला, राजकीय विरोधही केला आहे, असेही चिराग म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
Electricity OFF | बिहारमध्ये प्रचारासाठीच मुंबई वीजघात? | नितीन राऊतांची शंका खरी?
मुंबईमधील (१२ ऑक्टोबर) खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करेपर्यंत संध्याकाळ झाली होती. २००० मेगावॉट पेक्षा जास्त पुरवठा खंडित झाला होता. उर्वरित पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत केला जाईल अशी माहिती केंद्रीय उर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय उर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी देखील दिली होती. राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित असून राज्याच्या ग्रीडच्या काही भागांमध्ये बिघाड झाला होता असे त्यांनी सांगितले होते, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील उच्चस्तरीय बैठक घेऊन चौकशीचे आदेश दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
Bihar Election | मजुरांवरून सुप्रीम कोर्टात कबुली देऊनही मोदी सरकारचा खोटा प्रचार - सविस्तर वृत्त
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून खोट्या जाहिराती करण्यास सुरुवात झाली आहे असं पुन्हा समोर येऊ लागलं आहे. विशेष म्हणजे महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर बिहार निवडणुकीची मोठी जवाबदारी सोपविण्यात आली आहे. तत्पूर्वी म्हणजे लॉकडाउनच्या सुरवातीला जेव्हा मोठ्या संख्येने मजुरांचे त्यांच्या मूळ राज्यात परतणे सुरु होतं तेव्हा महाराष्ट्रात मोठं राजकारण घडलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही आता बेरोजगारी दूर करणार | मग १५ वर्ष काय मटार सोलत होतात काय? - राबडी देवी
बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार वेगाने सुरू असून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सोशल मीडियावर देखील निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. एनडीए आणि महाआघाडीचे नेते सतत एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. विविध मुद्द्यांवरून एकमेकांवर निशाणा साधत आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर सतत टीका करणारे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यावेळी स्वत: ट्विटर करून स्वतःच अडकले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Bihar Election | RJD सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीर सोडून बिहारमध्ये आश्रय घेतील
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. याच दरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. नित्यानंद राय यांनी बिहार निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा (आरजेडी) विजय झाल्यास दहशतवादी काश्मीरमधून बिहारमध्ये आश्रय घेतील अशी भीती व्यक्त केली आहे. नित्यानंद राय यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये सर्वांत मोठा पक्ष बनण्याची रणनीती भाजप | सर्व्हनंतर जेडीयू सावध
बिहारमधील सत्तारूढ एनडीएमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा झडत आहेत. मात्र, एनडीए पुन्हा जिंकली आणि भाजपला अधिक जागा मिळाल्या तरी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री बनतील, अशा शब्दांत त्यांच्या जेडीयूने चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Bihar Assembly Election 2020 | सोनिया, राहुल आणि प्रियंका काँग्रेसचे स्टार प्रचारक
बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय घडमोडींना अधिकच वेग आला आहे. निवडणुकी अगोदरच ‘एनडीए’त फूट पडली आहे. पासवानांच्या लोक जनशक्ती पार्टीने नितीश कुमार यांचे नेतृत्व नाकारत या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे आणि त्यात रामविलास पासवान यांचा आकस्मित मृत्यू झाल्याने पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. आता काँग्रेस देखील निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एनडीएच्या अडचणी वाढविणार | सविस्तर वृत्त
महाराष्ट्र निवडणुकीनंतर एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेनेने आता बिहार विधानसभा निवडणुकीत उडी घेण्याचे ठरवले आहे. यामुळे एनडीएतील भाजप आणि जनता दल बिहार निवडणुकीत एकेकाळी ‘एनडीए’ सहभागी असलेल्या शिवसेनेनंही एन्ट्री घेतलीय. बिहार विधानसभेच्या रणसंग्रामात शिवसेनेचे ५० उमेदवारी रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. या उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द शिवसेनेचे पक्षाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील बिहारमध्ये दाखल होणार आहेत. शिवसेनेकडून आपल्या स्टार प्रचारकांची एक यादीही निवडणूक आयोगाकडे सोपवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
..त्या प्रश्नाच्या भीतीमुळेच गुप्तेश्वर पांडेंना तिकीट दिलं नसावं | राष्ट्रवादीचा भाजपाला टोला
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वादास सुरुवात झाल्यापासून बिहार पोलिसांचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचे नाव बरेच चर्चेत होते. दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच गुप्तेश्वर पांडेंनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत थेट राजकारणात उडी घेतली होती. पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर बक्सर जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील. अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र जेडीयूने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काल जाहीर केलेल्या ११५ उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचं नावच नसल्याने आता पांडे यांचं काय होणार याची चर्चा रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहार विधानसभा निवडणुक 2020 | शिवसेनेकडून २० स्टार कॅम्पेनर्स सज्ज
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना देखील सज्ज झाली आहे. बिहारच्या निवडणुकीत शिवसेना उतरणार असल्याचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्यानंतर आता शिवसेनेने आपल्या स्टार कॅम्पनेर्सची यादी देखील जाहीर केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून २० जण स्टार कॅम्पेनर सज्ज झाले आहेत. २०१५ मध्ये शिवसेनेनं ८० जागा लढवत २ लाखांपेक्षा जास्त मतं घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
जेडीयूच्या ११५ उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचं नावच नाही
बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचारात लवकरच रंग भरायला सुरूवात होणार असून, त्याआधी जागा वाटपांवरून मनधरणी नाट्य घडताना दिसत आहे. सध्या सत्तेत असलेल्या एनडीएत नितीश कुमार भाजपावर नाराज असल्याची चर्चा सुरू असून, त्यामुळे सोमवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला ते हजर नव्हते. मात्र, नाराज झालेल्या नितीश कुमार यांची भाजपानं मोठं वचन देत मनधरणी केली. त्यानंतर नितीश कुमार हजर झाले.
4 वर्षांपूर्वी -
Bihar Assembly Election 2020 | लोक जनशक्ती पक्षाचा स्वबळाचा नारा
बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय घडमोडींना अधिकच वेग आला आहे. निवडणुकी अगोदरच ‘एनडीए’त फूट पडली आहे. पासवानांच्या लोक जनशक्ती पार्टीने नितीश कुमार यांचे नेतृत्व नाकारत या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, गरज पडल्यास भाजपाबरोबर काम करण्याची तयारी असल्याचेही सांगितले आहे. रविवारी दिल्लीत पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय लोक जनशक्ती पार्टीकडून घेण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणूक २०२० | राजद - काँग्रेस महाआघाडीतील जागा वाटपाचा पेच सुटला
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीचं जागावाटप निश्चित झालं आहे. आरजेडी 144, काँग्रेस 70 आणि लेफ्ट 29 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आरजेडी आपल्या कोट्यातून व्हीआयपी पक्षाला काही जागा देईल. आरजेडी, काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (माले), सीपीएम आणि व्हीआयपी महाआघाडीतील पक्ष आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण: मुंबई पोलिसांवर टीका आणि CBI तपासावर शांत झालेले DGP अखेर जेडीयूत
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी बिहारच्या राजकारणात आज अधिकृतरित्या प्रवेश केला. पांडे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये आज प्रवेश केला. नितीश कुमार यांच्या घरी जाऊन त्यांनी पक्षात प्रवेश केला. सुशांत प्रकरणात मुंबई व महाराष्ट्र सरकारवर टीका केल्यापासून पांडे चर्चेत आले होते. तेव्हापासून त्यांच्या राजकीय प्रवेशाविषयी बोललं जात होतं.
4 वर्षांपूर्वी -
Bihar Assembly Elections 2020 | बिहारमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर
निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान होईल. यापैकी पहिल्या टप्प्यांत ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात अनुक्रमे २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला मतदान पार पडेल. यानंतर १० नोव्हेंबरला मतदानाचा निकाल जाहीर होईल.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांवर शंका उपस्थित करणारे बिहारचे DGP निवडणुकीच्या रिंगणात
बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिहारमधील नितीश कुमार सरकारच्या वतीने राज्यपालांनी पांडे यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्वीकारला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मिम्सवरून खिल्ली | कंगनावर विरोधी पक्षनेतेपदाची जवाबदारी सोपवून फडणवीस बिहारला
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बिहारसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. फडणवीस यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाकडून अन्य राज्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी प्रथमच दिली दिली आहे. ज्येष्ठ भाजप नेते भूपेंद्र यादव हे बिहारसाठी पक्ष प्रभारी असून फडणवीस हे त्यांच्यासमवेत निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहतील, असे दिल्लीतुन भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणेच झालं.
4 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये पत्रकार परिषद | सुशांतला न्याय मिळेपर्यंत भाजप गप्प बसणार नाही - फडणवीस
अभिनेता सुशांतसिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाची भावना बिहार निवडणुकीत मांडणार असे बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पाटण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. सुशांतला न्याय मिळणार नाही, तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही असे सांगताना, बिहार भाजपच्या सुशांत पोस्टरची जबाबदारीही फडणवीस यांनी घेतली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा कहर, वाढती बेरोजगारी, कोसळलेली अर्थव्यवस्था | सुशांत बिहार निवडणुकीचा मुद्दा
बिहार विधानसभा निवडणूक २०२० मध्ये सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा मुद्दा प्रचारात गाजणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचा मुद्दा उपस्थित होणार हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे. भाजपाच्या सांस्कृतिक सेलचे बिहार संयोजक वरुण कुमार सिंह यांनी सुशांतसिंग राजपूत संबंधित स्टिकर्स छापण्यास सुरुवात केली असून त्यावर घोषणा देखील असल्याचं दिसतं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS