महत्वाच्या बातम्या
-
भाजपकडून हिंदू देवतांचा अपमान, प्रभू हनुमानाच्या मूर्तीसमोर बॉडीबिल्डर्स महिलांची बिकीनीत पोजिंग, घृणास्पद स्पर्धा
Women Bodybuilders Posing in front of Hanuman ji Statue | होळीपूर्वी राजकीय वातावरणाला वेगळाच रंग आला आहे. मध्य प्रदेशातील रतलाम येथे भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेवरून राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. यामागचं कारण म्हणजे व्हायरल झालेला व्हिडिओ, ज्यात स्टेजवर ठेवलेल्या प्रभू हनुमानाच्या मूर्तीसमोर महिला बॉडीबिल्डर्स बिकीनी घालून पोज देत आहेत. ज्यावरून बराच गदारोळ सुरू आहे. हा व्हिडिओ राजकारणातही चर्चेचा विषय ठरला आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यावरून भाजपवर हल्लाबोल करत असून चौकशीची मागणीही करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावले | राज्यातील पदाधिकारीही दिल्लीला | हिमाचलमध्येही मुख्यमंत्री बदलणार?
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना हायकमांडने दिल्लीला बोलावले आहे. त्यांच्यासोबत प्रदेश भाजप पदाधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले आहे. यामुळे हिमाचलच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत, कारण मुख्यमंत्री रविवारीच दिल्लीहून परतले. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर हिमाचलमध्येही चर्चा सुरु झाल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये आयारामांचा दबदबा | तब्बल १७७ आमदार आणि खासदारांचा काँग्रेसला रामराम
निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पक्ष बदलणे ही नवी गोष्ट नाही. मात्र, सध्यस्थितीत राजकीय ‘बदला’मुळे काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे. एका अहवालानुसार, 2014 ते 2021 पर्यंतची आकडेवारी दर्शवते की काँग्रेसचे 177 खासदार आणि आमदारांनी पक्ष सोडला आणि इतर पक्षांमध्ये सामील झाले.
3 वर्षांपूर्वी -
भारताच्या तिरंग्या पेक्षा भाजपच्या झेंड्याचा मान मोठा? | तिरंग्याच्या वर स्थान दिल्याने भाजपाविरोधात संताप
युपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं शनिवारी निधन झालं. काल त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गर्दी केली होती. परंतु यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण सिंह यांना अखेरचा निरोप दिला जात असताना तिरंग्यावर भारतीय जनता पक्षाने पक्षाचा झेंडा ठेवला होता. यावरुन विरोधकांनी नाराजी जाहीर केली असून संताप व्यक्त करत नव्या भारतात हे चालतं का ? अशी विचारणा केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजप आरक्षण विरोधी? | 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याच्या उपसूचनेवर भाजपने दुरुस्तीविरोधात मतदान केलं
102व्या घटना दुरुस्तीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना आम्ही आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची सूचना केली. या उपसूचनेवर संसदेत मतदान झालं. त्याला काँग्रेससहीत इतर खासदारांनी पाठिंबा दिला. पण भारतीय जनता पक्षाने या दुरुस्तीविरोधात मतदान केलं. रावसाहेब दानवे यांनी तर तोंडही उघडलं नाही. त्यामुळे भाजप हा मराठा आणि धनगर आरक्षण विरोधी असल्याचं उघड झालं आहे, असा घणाघाती हल्ला विनायक राऊत यांनी चढवला.
3 वर्षांपूर्वी -
भाजपला मिळणाऱ्या निवडणूक निधीचा आकडा एखाद्या उद्योग समुहासारख्या वार्षिक उलाढालीप्रमाणे - सविस्तर वृत्त
मागील वर्षी भारतीय जनता पक्षाने इलेक्टोरल बाँडच्या (रोखे) माध्यमातून जवळपास ७५ टक्के देणगी मिळवली असून मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसला मात्र फक्त नऊ टक्केच देणगी मिळवण्यात यश आलं. भारतीय निवडणूक आयोगाकडून ही माहिती मिळाली आहे. ३ वर्षांपूर्वी इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणगी मिळवण्याची योजना आणण्यात आली होती. यामध्ये देणगीदाराची ओळख जाहीर होत नसल्याने याचा वापर वाढला आहे.
3 वर्षांपूर्वी -
देशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी
देशात सत्ता आल्यापासून भाजपचा खजिना तुडुंब भरल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २०१९-२० मध्ये भारतीय जनता पक्षाला कॉर्पोरेट आणि व्यक्तिगत स्वरुपात तब्बल ७८५ कोटी देणगी मिळालं आहे. काँग्रेस पक्षाला १३९ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. याचा अर्थ काँग्रेसच्या ५ पट जास्त भारतीय जनता पक्षाला देणगी मिळाली आहे. तर याच कालावधीत एनसीपीला ५९ कोटी, टीएमसी (TMC) ८ कोटी, सीपीएम १९.६ कोटी आणि सीपीआय १.९ कोटी रुपये देणगी मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे प. बंगालचे प्रभारी जितिन प्रसाद यांचा काँग्रेसला प. बंगालमध्ये शून्य केल्यानंतर युपी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
युपीए-२ च्या काळात केंद्रात मंत्रीपदी राहिलेले उत्तर प्रदेशमधील वरीष्ठ नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमधील भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसमधील एक महत्त्वाचा चेहरा आणि प्रमुख नेताच भाजपानं गळाला लावल्यामुळे भाजपने देखील मोठा गाजावाजा केल्याचं पाहायला मिळतंय. पण खरं वास्तव दुसरंच आहे.
4 वर्षांपूर्वी -
आपत्तीत भाजप कार्यकर्ते मदतकार्यात अन विरोधक कॉरंटाईन, नेटीझन म्हणाला श्रीनिवास एकटाच भारी पडेल भाजपला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला केंद्रामध्ये सत्तेत दुसऱ्यांदा येऊन दोन, तर एकून सात वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष २०१४मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत असून, केंद्रीय गृहमंत्री मित शाह यांच्यापासून सर्वच नेत्यांनी यासंदर्भात ट्विट करून मोदींची स्तुती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | जन्मदात्या आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या व्यक्तीला भाजप खासदाराची कानाखाली लगावण्याची धमकी
तील कोरोनास्थिती भयावह आहे. ऑक्सिजनचा तुटवडा मोठा आहे. महाराष्ट्रासह आता देशाचे राजधानी शहर असलेल्या दिल्लीतील कोरोना परिस्थितीही प्रचंड बिघडली आहे. दिल्लीतील रुग्णालयातही ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र त्याच ऑक्सिजन वरून राजकीय नेत्यांचे धक्कादायक प्रकार देखील समोर येतं आहेत.
4 वर्षांपूर्वी -
देशात रेमडेसिविर इंजेक्शनसाठी लोकांची वणवण | पण गुजरातमध्ये भाजप कार्यालयात स्टॉक
महाराष्ट्रात वीकेंड लाॅकडाऊन सुरू हाेण्याबराेबरच सरकारने तीन दिवसांसाठी खासगी लसीकरण केंद्रे बंद केली आहेत. परंतु सरकारी केंद्रात लसीकरण सुरू राहील. मुंबईत शुक्रवारीही १२० पैकी ७५ लसीकरण केंद्रे बंद झाले. यामध्ये बहुतांश खासगी आहेत. राज्याला दर आठवड्याला ४० लाख डाेसची गरज आहे. केंद्राने १७ लाख डाेस पाठवले असून ते पुरेसे नाहीत, असे आरोग्यमंत्री राजेश टाेपे आधीच म्हणाले होते. तर आता रेमडेसिवीरचाही तुटवडा देशभर जाणवू लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आज प. बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान | IT सेलकडून पुन्हा संभ्रमाच्या अर्धवट क्लिप्स प्रसिद्ध
राजकारणाची रणभूमी झालेल्या पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. चौथ्या टप्प्यात ४४ जागांसाठी मतदान होत असून, सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं आहे. ४४ जागांसाठी तब्बल ३७३ उमेदवार रिंगणात असून, १ कोटी १५ लाख ८१ हजार २२ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
उन्नाव बलात्कार | आरोपीच्या पत्नीला भाजपाकडून निवडणुकीचं तिकीट
उन्नाव बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोप कुलदीप सिंह सेंगरची पत्नी संगीता सेंगर भारतीय जनता पक्षाच्या तिकीटीवर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणूक लढणार आहेत. संगीता सेनगर यांच्याकडे उन्नाव जिल्हा पंचायतीचं अध्यक्षपद होतं. संगीता सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार आहेत. १५ एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आङे. २ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनती असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही - भाजप आ. गोविंद पटेल
देशात सलग ११ व्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांत वाढ झाली. रविवारी ४४,०४२ रुग्ण आढळले. त्यातील एकट्या महाराष्ट्रातील ३०,५३५ रुग्ण आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी २० ते २४ नोव्हेंबरदरम्यान जेव्हा रोज आढळणाऱ्या रुग्णांची सरासरी ४४ हजार होती तेव्हा रोज सरासरी ५१४ मृत्यू होत होते. आता पुन्हा ४४ हजार रुग्ण आढळत आहेत, पण रोज होणाऱ्या मृत्यूंची सरासरी १८० च्या खाली आहे. म्हणजे आधीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी मृत्यू होत आहेत. देशात गेल्या ३० दिवसांतच रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १४ हजारांवरून ४४ हजारांवर गेली आहे. म्हणजे तिपटीपेक्षाही जास्त वाढ. रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या १०१ वरून १९७ झाली आहे, म्हणजे दुपटीपेक्षाही कमी वाढ झाली.
4 वर्षांपूर्वी -
महिला वर्गाकडून भाजप उत्तराखंड मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा असा निषेध | ट्विटरवर ट्रेंड
महिलांच्या रिप्ड जिन्स घालण्यावरून उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा महिलांनी ट्वीटर वर खरपूस समाचार घेतला आहे. दरम्यान ‘रिप्ड जिन्स घालणार्या महिला ‘चांगले आदर्श’ ठेवत आल्याचं वक्तव्य काल तिरथ सिंग रावत यांनी केल्यानंतर त्याचे अनेक स्तरांमधून प्रतिसाद येण्यास सुरूवात झाली. अल्पावधीतच नेटकर्यांनी देखील #RippedJeans सह रिप्ड जिन्स मधील फोटो पोस्ट करण्यास सुरूवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शक्तिमान घोड्याचे क्रूरपणे पाय तोडणाऱ्या भाजप आमदारचं आता महिलांप्रति धक्कादायक विधान
मार्च २०१६ मध्ये शक्तिमान घोड्याला गंभीर मारहाण करून त्याचा एक पाय जायबंदी करणारे भाजपचे आमदार गणेश जोशी यांना त्यावेळी पोलिसांनी अटक झाली होती. प्राण्याला क्रुरपणे मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्याचा आरोप जोशी यांच्यावर ठेवण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
गुडघ्यावर फाटलेली जीन्स, पायात गमबूट, अशा महिला काय संस्कार देणार | भाजपा मुख्यमंत्र्यांचं विधान
उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तीरथ सिंह रावत यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमळु ते सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. ते मंगळवारी देहरादून येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तरुण-तरुणींना संस्काराचे महत्व पटवून देताना रावत यांची जीभ चांगलीच घसरली.
4 वर्षांपूर्वी -
आक्षेपार्ह सेक्स CD प्रकरण भाजपाच्या मंत्र्याला भोवलं | रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा
भारतीय जनता पक्षाची सत्ता असणाऱ्या कर्नाटकात एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून खळबळ माजली आहे. या आक्षेपार्ह सीडी प्रकरणात कर्नाटकच्या भाजप सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांने ही सीडी जारी केली आहे, यामध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत. दरम्यान, याबाबत राजकीय षड्यंत्र असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
वसुंधरा राजे नाराज | समर्थकांनी वेगळा राजकीय मंच स्थापला | जिल्हा निहाय अध्यक्ष नेमले
मोदी-शहा जोडीने राजस्थानमधील सरकार उलटून लावताना वसुंधरा राजेंना कोणतीही कल्पना दिली नव्हती आणि त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवलं होतं. राजस्थान काँग्रेसमधील महत्वाचे तरुण नेते सचिन पायलट यांना हाताशी धरून मागील काही महिन्यापासून राजस्थान सरकार पाडण्याची प्रक्रिया सुरु होती.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | शुद्राला शुद्र बोललं, तर वाईट वाटतं | भाजपा खासदारचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
वेळोवेळो वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Bhopal BJP MP Pragya Singh Thakur ) यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. त्यांनी मध्य प्रदेशच्या सिहोर येथील कार्यक्रमात जातीव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन