महापुरुषांवरील संतापजनक विधानांवरून भाजप आमदारांविरोधात भीम सैनिकांमध्ये रोष, अजून एक भाजप आमदार लक्ष
BJP MLA Vijaykumar Deshmukh | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या विधानांवरून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. भाजप नेत्यांकडून केल्या गेलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद अजूनही महाराष्ट्रभर उमटत आहेत. अशाच वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावरून पिंपरी चिंचवडमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाई फेक करण्यात आली होती. त्यानंतर असाच प्रकार सोलापूर घडता घडता राहिला. सोलापुरात भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावरही शाई फेक करण्याचा प्रयत्न झाला.
2 वर्षांपूर्वी