महत्वाच्या बातम्या
-
आज चौथ्या दिवशीही दूधकोंडी कायम, जनावरांसह चक्काजाम आंदोलन
राज्यातील दूधकोंडी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. ग्रामीण भागात आंदोलन अजून तीव्र करण्यात आलं आहे. तिकडे सोलापुरात ‘दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी’ या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभर दूध बंद आंदोलन सुरुच आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेला स्वतःची सत्ता असलेली औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याची वेळ का आली आहे?
औरंगाबाद महापालिकेत ५ महिन्यापासून कचराकोंडीचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. त्यात पावसाळा सुरु झाल्याने साठलेला कचरा कुजल्याने रोगराई आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परंतु अनेक महिन्यापासून हा प्रश्न जटील होत चालल्याने नागरिकांमध्ये सुद्धा रोष वाढत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या संघर्षात जनतेची होरपळ होत असल्याने मुंख्यमंत्र्यांवरील दबाव वाढत आहे.
7 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी स्वतः डहाणू स्टेशनवर ठाण मांडून, अहमदाबाद-मुंबई पॅसेंजर रोखणार?
दूध दरासाठी राज्यातील दूध उत्पादक अजून आक्रमक झाले आहेत. कारण गुजरातवरून येणारे दुधाचे टँकरही अडवायला स्वतः खासदार राजू शेट्टी डहाणू स्टेशनवर ठाण मांडून आहेत. अहमदाबाद-मुंबई पॅसेंजरने अमूल दूध पुरवठा करणार असल्याचे समजल्याने राजू शेट्टी स्वतः ते रोखण्यासाठी डहाणू स्टेशनवर ठाण मांडून आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या RCEP करारामुळे २५ कोटी शेतकरी देशोधडीला लागतील? राष्ट्रीय किसान महासंघ
थायलंड येथे २१ जुलै रोजी RCEP अर्थात क्रॉप्रेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट अंतर्गत ट्रेड करारावर भारताकडून स्वाक्षऱ्या करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने पियुष गोयल हे लवकरच थायलंडला रवाना होणार आहेत. परंतु या करारामुळे देशातील २५ कोटी शेतकरी देशोधडीला लागतील असा आरोप राष्ट्रीय किसान महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक के. व्ही. बिजू यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मंदिर आणि धर्मावर चर्चा करुन देशात रोजगार निर्मिती होणार नाहीये: सॅम पित्रोदा
मला भारताची खरंच चिंता वाटू लागते जेव्हा मी देशात मंदिर, धर्म, जात, देव अशा विषयांवर वादविवाद आणि संघर्ष पाहतो. देशात रोजगार निर्मिती ही कोणत्याही धर्मामुळे नाही तर केवळ विज्ञानच भविष्याची निर्मिती करु शकतं असं ठाम मत भारताच्या मोबाइल क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा यांनी केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांचा अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रात सामाजिक कामाचा धडाका
सध्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत आणि त्या निमित्ताने सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. त्या अनुषंगाने अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रात भाजपचे विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल यांनी सामाजिक आणि विकास कामांचा जोरदार धडाका लावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
रोखठोक! खड्डेयुक्त आयुष्याला स्वतः मुंबईकर-ठाणेकर जवाबदार? या सत्ताधारी पक्षांना एकजुटीने अद्दल घडविणे गरजेचे!
मुंबई, ठाणे असो वा कल्याण-डोंबिवली येथील प्रवाशांची अवस्था म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी झाली आहे. या शहरातील रस्त्यांच्या अवस्था आणि दर्जा पाहिल्यास, त्यावरून प्रवास करण म्हणजे स्वतःचा आणि प्रियजनांचा मजबुरी म्हणून रोज जीव धोक्यात घालणे असाच म्हणावा लागेल. परंतु स्वतःची अवस्था अशी का झाली आहे याचा कधी गंभीर होऊन या शहरातील लोकांनी प्रामाणिक विचार केला आहे का?
7 वर्षांपूर्वी -
सरकारला देशातील जनतेला नजरकैदेत ठेवायचे आहे का?
भारतातील जनता मोठ्या प्रमाणावर वापरत असलेल्या समाज माध्यमांच्या अँप्सवरून अफवा पसरवल्या जात असल्याचं कारण पुढे करत केंद्र सरकार ऑनलाइन डेटावर नजर ठेवणार आहे. त्यासाठी केंद्रातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘सोशल मीडिया हब’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मतांची भावनिक पेरणी सुरु? २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीला सुरुवात केली जाणार: अमित शहा
विकासाचे ढोल वाजवत सत्तेत आलेल्या मोदी सरकारला २०१९ मधील निवडणुकीत अखेर राम मंदिराचाच भावनिक आधार घ्यावा लागणार आहे असं चित्र आहे. कारण तसे स्पष्ट संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. त्यांच्या नुसार २०१९ च्या निवडणूकीपूर्वी आयोध्येत राम मंदिर उभारणीला सुरुवात केली जाईल असं स्पष्ट केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
जळगावात खडसे विरोधात प्रचार करतील या भीतीने खाविआ व भाजप युती तुटली
जळगाव महानगर पालिका निवडणुकीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि खान्देश विकास आघाडीचे सर्वेसेवा सुरेशदादा जैन यांचे भाजप-शिवसेना युतीचे सर्व प्रयत्नं एकनाथ खडसेंच्या एका अप्रत्यक्ष धमकीने हाणून पाडले आहेत. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी युती झाल्यास विरोधात प्रचार करण्याचे संकेत देताच युतीचा निर्णय बासनात गुंडाळण्यात आला.
7 वर्षांपूर्वी -
भाजप सोशल मिडिया'चा २०१४ मधील 'प्लॅन' २०१९ मध्ये अधिक ताकदीने वापरणार
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आले असताना हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. भाजपच्या २०१४ मधील निवडणुकीच्या यशात समाज माध्यमांचा मोठा वाटा होता. त्यामुळे समाज माध्यमांचे महत्व लक्षात घेता तो अधिक ताकदीने राबविण्यासाठी भाजपने त्यांच्या टीमला सूचना दिल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या राज्यात उदयोग सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवर: जागतिक बँक
उद्योग संपन्न म्हणून अनेक वर्ष देशभर परिचित असणार महाराष्ट्र राज्य उदयोग सुलभतेच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात समोर आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र उदयोग सुलभतेच्या बाबतीत देशातील पहिल्या दहा राज्यांच्या यादीत सुद्धा नाही. अगदी झारखंड आणि छत्तीसगड सारखी मागासलेली समजली जाणारी राज्य सुद्धा महाराष्ट्राच्या पुढे आहेत असं हा जागतिक बँकेचा रिपोर्ट सांगतो.
7 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांचे नाणार संबंधित विधानसभेत निवेदन
प्रस्तावित वेस्टकोस्ट रिफायनरी प्रकल्पाबाबत विधानपरिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले.
7 वर्षांपूर्वी -
एमआयएम-आंबेडकरांची आघाडी कॉंग्रेसच्या मुळाशी तर भाजपला फलदायी?
प्रकाश आंबेडकरांनी नुकतेच असदुद्दीन ओवेसीं’च्या एमआयएमशी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जर भविष्यात जर ही आघाडी झाल्यास ते भाजपसाठी फलदायी असेल तर काँग्रेसची डोकेदुखी वाढविणारी असेल असं दिसत आहे. मुस्लिम समाजाने २०१४ मध्ये एमआयएम’ला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याने त्याचा थेट फायदा भाजपला झाला होता. त्यामुळे २०१९ ला मुस्लिम समाज सुद्धा एमआयएम पासून लांब राहू शकतो असं सुद्धा राजकीय विश्लेषक बोलत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई दादर'मध्ये येताच भाजपचे प्रवक्ते संबित पात्रां'च्या पायातले शूज हातात
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आज मुंबईमध्ये आहेत. मुंबईमधील पावसाने भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रां’वर नियोजित पत्रकार परिषद रद्द करण्याची वेळ आली आहे. परंतु पत्रकार परिषद रद्द झाल्यावर बाहेर पडलेल्या संबित पात्रांना पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे चालणे कदाचित इतके अवघड होऊन बसले की त्यांना पायातले शूज हातात घेऊन रस्ता शोधण्याची वेळ आली.
7 वर्षांपूर्वी -
रस्त्यांवरील खड्डे; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भ्रष्ट सत्ताधारी व अधिकारी किती निष्पापांचे प्राण घेणार?
काल ज्या घटनास्थळी आरव’चा रस्त्यांवरील खड्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला, त्या ठिकाणी त्याच्या बाबांनी आरवला आवडणारा दही-भात रस्त्यावर ठेवला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. अनेकांना ते दृश्य पासून रडू कोसळले. पालिकेतील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे आणि सत्ताधार्यांमुळे अजून किती निरपराध लोक आपल्या प्रियजनांना गमावणार आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप आयटी-सेल योद्ध्यांनो शरद पवारांपासून सर्व विरोधकांना उत्तर देण्यास तयार रहा
आगामी निवडणुकीत सोशल मीडिया महत्वाची भूमिका बजावणार असल्याने भाजपच्या आयटी-सेल योद्ध्यांनी विरोधकांना जोरदार उत्तर देण्यासाठी कंबर कसली पाहिजे असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना केला आहे. तसेच शेतकरी आत्महत्यांवर बोलणाऱ्या शरद पवारांना सुद्धा सोशल मीडियातून चोख प्रत्युत्तर द्यावे असे आदेश अमित शहा यांनी त्यांच्या टीमला दिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांपेक्षा श्रेष्ठ होता: संभाजी भिडे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या या विधानाने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काल दुपारी २ वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडेंनी जंगली महाराज मंदिरात सर्व धारकऱ्यांना तासभर मार्गदर्शन करताना हे विधान केले आहे, ज्यामुळे पुन्हा वाद उफाळून येऊ शकतो.
7 वर्षांपूर्वी -
NEET व JEE परीक्षा आता वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार: प्रकाश जावडेकर
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज जेईई आणि नीट परीक्षासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. नीट व जेईई परीक्षा आता वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार आहे. तशी अधिकृत घोषणा आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांनी दिल्लीतील आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पावसामुळे नागपूरकर 'ड्रमा'त, देशाच पायाभूत सुविधांच खातं व मुख्यमंत्री पद असून सुद्धा?
नागपूरमधील तुफान पावसामुळे नागपूर महापालिकेच्या ढिसाळ पायाभूत सुविधा आणि त्याच्या दर्जाची पोलखोल झाली आहे. विशेष म्हणजे भारताच्या पायाभूत सुविधां संदर्भातील महत्वाचं खातं नितीन गडकरींकडे, राज्याचं मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे आणि नागपूर महापालिकेची सत्ता असताना सुद्धा नागपूर शहरात झालेल्या तुफान पावसाने शहरातील पायाभूत सुविधांची पोलखोल झाली आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY