महत्वाच्या बातम्या
-
ख्रिश्चनांसंदर्भात वक्तव्य भोवल, भाजपा खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देण्याच्या तयारीत?
मुंबईतील मालवणी येथे ख्रिश्चनांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी प्रकाश झोतात आले आहेत. परंतु त्यांच्या विधानाने पक्ष गोत्यात आल्याने त्यांची दिल्लीश्वरांनी चांगलीच खरडपट्टी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गोपाळ शेट्टी प्रचंड नाराज असल्याचे समजते. त्यामुळे ते थेट राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये वसंत गीते समर्थकांमध्ये फूट, भाजप'ला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश: भुज'बळ' पावर
नाशिक भाजपमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. भाजपचे महत्वाचे पदाधिकारी व वसंत गीते समर्थक भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ जामिनावर बाहेर आल्यानंतर या घडामोडींना जोर आला आहे. भाजप’मधील पक्ष फुटी नाशिकमधून सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
खारघर येथील १७०० कोटींची जागा निव्वळ ३ कोटीत देण्याचा सरकारचा प्रताप?
खारघर येथील १७०० कोटींची जागा निव्वळ ३ कोटीत देण्याचा सरकारचा प्रताप?
7 वर्षांपूर्वी -
विदर्भ बंदच्या हाकेला तुरळक प्रतिसाद, पोलिसांकडून ५० कार्यकर्त्यांना अटक
नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन भरल्याने विदर्भवादी संघटनांनी विदर्भ बंदी हाक दिली खरी, परंतु त्याला तुरळक प्रतिसाद लाभला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा बंद पुकारण्यात आला असल्याने चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.
7 वर्षांपूर्वी -
अंधेरी पूल दुर्घटना: जीवन ज्योत प्रतिष्ठाणचा रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या 'त्या' कामगारांना मदतीचा हात
अंधेरी पूल दुर्घटना घडल्यानंतर अनेक कामगार रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी भर पावसात राबताना दिसत आहेत. परंतु त्यात आता माणुसकीच दर्शन घडविणाऱ्या घटना सुद्धा दिसू लागल्या आहेत. भर पावसात रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या कामगारांसाठी मुरजी पटेल यांच्या जीवन ज्योत प्रतिष्ठाण या समाजसेवी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अंधेरी पूल दुर्घटना: बेजवाबदार! दिल्ली ते गल्ली एकत्र सत्तेत असल्याचा शिवसेना व भाजपला विसर?
एल्फिन्स्टन ब्रिज सारख्या दुर्घटना घडून सुद्धा सरकारने काहीच बोध घेतलेला नाही. अंधेरी पूल दुर्घटनेवरून जवाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून होताना दिसत आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अंधेरी पूल दुर्घटनेबाबत जवाबदारी झटकत त्या पुलाच्या देखभालीची जवाबदारी रेल्वे प्रशासनावर म्हणजे रेल्वे खात सांभाळणाऱ्या भाजपवर ढकलली आहे. तर भाजपचे खासदार किरीट सोमैया यांनी मला महापौर काय बोलले यात जायचे नाही, पण समस्यांचं निराकरण करण्यात जास्त रस आहे असं मत व्यक्त केलं आणि सेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना सरकारकडून सामान्यांना लवकरच वीज दरवाढीचा झटका?
सर्वसामान्यांना महागाई आधीच डोईजड झाली असताना त्यात आता भाजप-शिवसेनेच्या सरकारकडे महानिर्मिती व महापारेषण या २ वीज कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढ व वीजवहनासाठी २,५३२ कोटी रुपये इतकी प्रचंड दरवाढ मागितली आहे. लवकरच आयोगाच्या मंजुरीनंतर याबाबत अधिकृत निर्णय घेऊन अंमलबजावणी होईल. त्यामुळे भाजप शिवसेनेचं युती सरकार लवकरच तुम्हाला वीज दरवाढीचा झटका देणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास, पर्यावरण मंत्री कारवाई करणार का?
महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू झाली असताना सरकारच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमात आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असताना सुद्धा या कार्यक्रमात सर्रास पणे प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचं समोर आल आहे. त्यामुळे सरकार प्लास्टिक बंदी आणि पर्यावरणाविषयी किती गंभीर आहे हे समजते.
7 वर्षांपूर्वी -
सत्तेच्या मलईपुढे स्वबळाची घोषणा फसवी? जळगाव महापालिका निवडणुकीसाठी सेना-भाजपची दोस्ती
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वबळाची घोषणा करताना,’यापुढे भाजप सोबत कोणत्याही निवडणुकीत युती नाही म्हणजे नाही आणि आम्ही यापुढे केवळ स्वबळावर लढणार अशी घोषणा केली होती. परंतु ही घोषणा फुसकी असल्याचे समोर येत आहे. कारण आगामी जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजप सोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात भाजपकडून पुन्हा आमदार फोडाफोडी? येडियुरप्पा पुन्हा सक्रिय
भाजपकडून कर्नाटकात पुन्हा सत्ताधारी पक्षातील आमदार फोडाफोडी करून सत्ता स्थाणपणेचा दावा केला जाऊ शकतो. जेडीएस आणि काँग्रेसच्या आमदारांच्या भेटीगाठी सुरु झाल्या असून, त्यांना भाजपमध्ये सामील करण्याच्या हालचालींनी कर्नाटकात जोर धरला आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्विस बँकेतील काळा पैसा बाहेर काढणं दूरच, उलट ५० टक्क्यांनी भारतीयांचा पैसा वाढला
देश विदेशातील काळ्या पैशावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आणल्याच्या मोदी सरकारच्या दाव्याला स्विस नॅशनल बॅंकेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालामुळे मोठा धक्का बसला आहे. कारण त्या अहवालानुसार स्विस बॅंकेत असणारे भारतीयांच्या पैशावर ५० टक्क्यांनी वाढ होऊन ही रक्कम जवळपास ७००० हजार कोटीच्या घरात गेली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपने कोकणात शिवसेनेला धूळ चारली, तर सेनेने मुंबईची जागा पुन्हा राखली
मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा राखण्यात शिवसेनेला यश आलं आहे. पण दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज सकाळी जाहीर करण्यात आले, त्यात भाजपने शिवसेनेवर मात केली आहे. त्यामुळे भाजपने कोकणात आयत्यावेळी आखलेले ‘डाव’ खरे ठरले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
सावधान! मोदींच्या गुजरातमध्येच भाजप पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?
गुजरात’मध्ये लवकरच भाजपमध्ये बंड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मोदी आणि अमित शहांना गुजरातमधूनच मोठा राजकीय धक्का बसण्याची स्थित निर्माण झाली आहे असं राजकीय वातावरण आहे. कारण भाजपचे तब्बल २३ आमदार बंडाच्या पवित्र्यात असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
सदाभाऊ खोत म्हणजे छोटा व्हायरस, शेतकऱ्यांना कोणतं औषध फवारायच चांगले माहीत आहे: राजू शेट्टी
राज्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटने नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी बोचरी टीका केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना जशास तसे उत्तर देण्याची चांगली क्षमता आहे. आम्ही सर्व हाडाचे शेतकरी असल्याने आमच्या पिकावर आलेल्या रोगांवर कोणतं उपायकारक औषध मारायचं ते आम्हाला चांगलं अवगत आहे अशी थेट टीका त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीत भाजप, मनसे व शिवसेना असे सर्वच गट भरडले जाणार
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात जळगाव महानगरपालिकेवर सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व आहे. सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीने महापालिकेतील सर्वच म्हणजे ७५ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात भाजपमध्ये सर्व सूत्र गिरीश महाजन यांनी घेतल्यामुळे त्यांच्यात सुद्धा एकनाथ खडसे यांच्या गटामुळे दुही माजण्याची चिन्ह आहेत.
7 वर्षांपूर्वी -
पावसाने मुंबईची 'तुंबई' झाल्यावर सत्ताधाऱ्यांचे एकमेकांवर दोषारोप
मुंबई शहरातील पहिल्याच पावसाने जागोजागी पाणी तुंबल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते सुद्धा दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा सुद्धा खोळंबा उडाला आहे. त्यातच जवाबदारी घेण्याऐवजी मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दोषारोप करण्यात गुंतले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान
आज मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जवळ जवळ ७० हजार इतकी मतदार निंदणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यंदा चौरंगी लढती पाहावयास मिळणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
पीडीपी'च्या सर्व निर्णयात भाजप सुद्धा सोबत होता: मेहबुबा मुफ्ती
भाजपने जम्मू आणि लडाख संदर्भातील केलेले आरोप खोटे असून, जम्मू आणि काश्मीरमधील सरकारच्या सर्व निर्णयात भारतीय जनता पक्ष सुद्धा पीडीपी सोबत होता अशी रोखठोक प्रतिक्रिया जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
चाहत्यांना धडे, सोशल मीडियावर नम्रपणे उत्तर द्या
२०१४ मधील भाजपला मिळालेल्या यशानंतर त्यांचे चाहते समाज माध्यमांवर इतके उर्मट झाले की, प्रत्येकाला वेड्यात काढणे हाच त्यांचा एकमेव कार्यक्रम सुरु होता. समाजमाध्यमांवर असणारा प्रत्येकजण त्यांना काँग्रेस समर्थक आहे असच एकूण प्रतिक्रिया देताना कल आहे. याचाच दुसरा परिणाम असा झाला की भाजपची समाजमाध्यमांवर प्रतिमा डागाळण्यास ते एक कारण झालं.
7 वर्षांपूर्वी -
सावधान! शिवसेनेतील तरुण आमदारांचा गट फुटीच्या उंबरठ्यावर?
शिवसेना पक्ष प्रमुखांनी स्वबळाचा नारा दिला खरा पण उद्या हाच नारा शिवसेना पक्ष फुटीला कारणीभूत ठरू शकतो अशा राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेत तरुण आमदार आणि वरिष्ठ आमदार असे दोन गट पडले असून मातोश्रीवर वरिष्ठ आमदारांचा दबदबा असल्याने तरुण आमदारांचा मोठा गट नाराज असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY