महत्वाच्या बातम्या
-
शिवसेनेला वीर सावरकरांच्या मुद्यावरून घेरण्याची भाजपाची योजना
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं आज विधानसभा अध्यक्षांकडं सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये सावरकारांविषयी मतभेद आहेत. त्यामुळं गौरवपर प्रस्तावावरून त्यांना कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपनं आखल्याचं समजतं.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढली म्हणणारे आ. भातखळकर आज ? - सविस्तर वृत्त
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती विषयावरून भारतीय जनता पक्षातील आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात सध्या मुंबईतील भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी २०१९ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात जेव्हा असाच मुद्दा उचलत आक्रमक पवित्र घेतला होता तेव्हा आमदार अतुल भातखळकर यांनी संतापजनक प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
जातीचा दाखला रद्द; जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी धोक्यात
लोकसभा निवडणुकीत खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याने सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य अडचणीत सापडले आहेत. बनावट जात प्रमाणपत्रा प्रकरणी खासदार शिवाचार्य यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जाती संदर्भात खुलासा करण्यासाठी जात पडताळणी समितीने खासदार डॉ. शिवाचार्य यांना नोटीस बजावली होती.
5 वर्षांपूर्वी -
सत्ताधाऱ्यांमध्ये आपसांतच सुसंवाद नाही, मग आम्हाला सुसंवादासाठी का बोलावलं: फडणवीस
महाविकास आघाडी सरकारला तीन महिने झाले पण अजूनही त्यांना सूर गवसलेला नाही. विरोधकांशी संवाद साधण्यासाठी चहापान ठेवलं पण या तीन पक्षांमध्येच विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज भाजपची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी कर्जमाफी, तूर आणि भात खरेदी, बाजार समिती निवडणुकीतून शेतकऱ्यांना दूर करणं या मुद्द्यावरुन सरकारला घेणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
विखे पाटलांचं नवं संपर्क कार्यालय; ना भाजपचा झेंडा ना नेते
विरोधीपक्ष नेतेपद सोडून सत्ताधाऱ्यांच्या गोटात सहभागी झालेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ‘यू टर्न’ मारण्याच्या तयारीत दिसत आहेत. विखे पाटील आता भारतीय जनता पक्षाची साथ सोडून सत्ताधारी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणार की काय, अशा चर्चा रंगल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेना अस्वस्थ: भाजपाची प्रतिक्रिया
महाराष्ट्रातील बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातील मनसैनिक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मनसेनं राजकीय भूमिका बदलल्यानंतरचा हा पहिला मोर्चा असल्यानं त्याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ऑपरेशन लोटस 'एक दंतकथा'; राज्य भाजप फुटणार असल्याने आधीच पेरणी? सविस्तर
राज्यातल्या महाविकास आघाडीला सत्तेवर येऊन आता ३ महिने होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली. तीन वेग वेगळ्या विचारांचे पक्ष सत्तेत आल्याने अगदी पहिल्या दिवसांपासूनच या पक्षांमध्ये कुरबुरी सुरू असल्याचं पुढे आलंय. दरम्यान, सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी CAA कायद्याचं समर्थन केल्याने काँग्रेस नाराज असल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप नगरसेवक मुरजी पटेलांचं नगरसेवक पद लघुवाद न्यायालयाकडून रद्द
मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकनं वाढली आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८१ मधून विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुरजी पटेल यांचं नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा आज लघुवाद न्यायालयात न्यायमूर्ती स्वर्णिता महालेंनी केली. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या संदीप नाईक यांचा नगरसेवकपदाचा मार्ग मोकळा झाला. एकाच आठवड्यात शिवसेनेचं महापालिकेतलं संख्याबळ दोननं वाढलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसेच्या भगव्या मोर्चात भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या महाअधिवेशनात झेंडा बदलल्यानंतर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका जाहीर केली होती. आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चाही काढणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राम कदम यांच्या नंतर बबनराव लोणीकरांकडून महिला वर्गाचा अपमान
माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बबनराव लोणीकर महिला तहसीलदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच, असे विधान लोणीकर यांनी केले. दरम्यान, लोणीकर यांनी केलेल्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
नसिरुद्दीन शहा आणि स्वरा भास्कर हे स्लीपर सेल: योगेश सोमण
अभिनेते नसिरुद्दीन शहा, दिग्दर्शक फरहान अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर हे स्लीपर सेल असल्याचे खळबळजनक वक्तव्य अभिनेते योगेश सोमण यांनी केले आहे. पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत त्यांनी हे वक्तव्य केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ही वर्षानुवर्षांची विषवल्ली आहे. या संस्थांमध्ये विष पेरून पिढ्या तयार केल्या जात आहेत. हे स्लीपर सेलच्या माध्यमातून होत असून नसिरुद्दीन शहा, फरहान अख्तर, स्वरा भास्कर हे या स्लीपर सेलचे सदस्य असल्याचे सोमण यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
कोरेगाव-भीमामधील हिंसाचार भडकविण्यात भाजपचे जवळचे लोक: गृहमंत्री
कोरेगाव-भीमामधील हिंसाचार भडकविण्यात भारतीय जनता पक्षाच्या जवळचे लोक होते, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. अशा लोकांचे पितळ उघडे पडेल या भीतीनेच एनआयएची चौकशी लावली असे देशमुख यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. या हिंसाचार प्रकरणी राज्य व केंद्र सरकारमध्ये गेले काही दिवस तणातणी सुरू आहे. देशमुख म्हणाले, या हिंसाचारामागील वास्तव समोर यावे म्हणून खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. त्यावर काही कार्यवाही होण्याआधी केंद्राने एनआयए चौकशीचे आदेश दिले. राज्य सरकारने एसआयटीमार्फत चौकशी केली असती तर या भाजपच्या विचारांविरुद्ध बोलणाऱ्यांची नावे हिंसाचार प्रकरणात गोवल्याचे उघड झाले असते.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना सत्तेसाठी हिरवी झाल्यामुळेच......भाजपाची प्रतिक्रिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनापासून राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. महाविकास आघाडीमुळे शिवसेना हिंदुत्वावर मवाळ झालीय. तर आता मनसे कात टाकत हिंदुत्वावर आक्रमक होणार आहे. मनसेच्या नेत्यांनी त्यावर बोलायला सुरुवात केलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी तर एक पाऊल पुढे जात राज ठाकरे हे दुसरे हिंदुह्रदयसम्राट असतील असं मत व्यक्त केलं होतं. त्यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालीय. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी गंभीर आरोप करत राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमागे एनसीपीचे अध्यक्ष शरद पवारांचं डोकं असल्याचा आरोप केलाय.
5 वर्षांपूर्वी -
भाजपात अंतर्गत कुरघोडी सुरु; मंगलप्रभात लोढांचं पद पुन्हा आशिष शेलारांकडे?
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची वर्णी लागल्यानंतर राज्य भारतीय जनता पक्षामध्ये देखील अंतर्गत कुरघोड्या सुरु झाल्याचं वृत्त आहे. त्यात शिवसेना काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत गेल्याने पक्षाला आक्रमक मुंबई प्रदेशाध्यक्षाची गरज असून नवा चेहरा मराठीच असावा असा आग्रह पुढे आला आहे. मंगलप्रभात लोढा हे मृदू भाषिक समजले जातात आणि आक्रमकपणा त्यांच्या स्वभावात नाही. त्यात गुजराती मतदार हा भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि त्यात मुंबई अध्यक्ष गुजराती ठेऊन मराठी मतदार लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा आशिष शेलार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
सत्तेसाठी विरोधी पक्ष फोडून केलेली मेगाभरती भाजपाला आज चुकीची वाटतेय: सचिन सावंत
विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला विरोधात बसावं लागल्याचं मोठं दुःख आहे. त्यात भारतीय जनता पक्षातील जुन्या जाणत्या अनेक निष्ठावंतांना पक्षात तिकीटं मिळाली नाही याचा देखील प्रचंड राग आहे. त्यामुळे खुद्द महाराष्ट्र पक्षाध्यक्षांनीच निवडणूकपूर्व मेगाभरतीला वाचा फोडल्याने भारतीय जनता पक्षातील हा सुप्त असंतोष कदाचित मोठ्या प्रमाणावर वाढीस लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मेगाभरती अंगलट! आमदार फुटण्याची भाजपाला भीती? निष्ठावंतांना जपण्याचा संदेश: सविस्तर वृत्त
विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला विरोधात बसावं लागल्याचं मोठं दुःख आहे. त्यात भारतीय जनता पक्षातील जुन्या जाणत्या अनेक निष्ठावंतांना पक्षात तिकीटं मिळाली नाही याचा देखील प्रचंड राग आहे. त्यामुळे खुद्द महाराष्ट्र पक्षाध्यक्षांनीच निवडणूकपूर्व मेगाभरतीला वाचा फोडल्याने भारतीय जनता पक्षातील हा सुप्त असंतोष कदाचित मोठ्या प्रमाणावर वाढीस लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान मेगाभरतीसंदर्भात चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खोचक टीका केली आहे. या राजकीय धक्क्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर भारतीय जनता पक्षाला देवो अशा शब्दात त्यांनी सणसणीत टोला हाणला आहे.
5 वर्षांपूर्वी -
संजय राऊत हिंदू आहेत की मुघलांची औलाद? - भाजप आ. प्रसाद लाड
उदयनराजेंना शिवरायांचे वंशज आहेत का असे विचारणारे शिवसेना नेते संजय राऊत हिंदू आहेत की मुघलांची औलाद?, असा जळजळीत सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. हिंदुत्वाचा अपमान तर केलातच, आता शिवरायांच्या वंशजांचा सुद्धा अपमान करत आहात. मात्र शिवरायांच्या वंशजांचा अपमान कदापि सहन करणार नसल्याचं आमदार लाड म्हणाले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद उफाळून आला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी आज गुरुवारी ‘सातारा बंद’ही पुकारला आहे.
5 वर्षांपूर्वी -
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे भाजपकडून आदेश
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकाचं प्रकाशन करत वाद ओढवून घेणारे जयभगवान गोयल यांनी पक्षाने आदेश दिला तर पुस्तक मागे घेऊ असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी काम करत असल्याने आपण त्यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असल्याचं सांगितलं. तसंच कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असंही ते म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाराजांचे वंशज सुद्धा मराठीच असल्याचा गोयल यांना विसर; काय म्हटलं मराठी बाबत?
दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी सात जन्म घेतले तरी शिवाजी महाराजांच्या एका क्षणाचीही बरोबरी करता येणार नाही
दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो