महत्वाच्या बातम्या
-
पंकजा मुंडेंचा पक्ष ठरला, उद्याच जाहीर प्रवेशानंतर भाजपामध्ये भूकंप होणार? सविस्तर वृत्त
मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा शिवनेरीवर होणार आहे. शिवनेरी नंतर ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या एकविरा देवीच्या दर्शन घेऊन मुख्यमंत्री थेट गोपीनाथगडावर जाणार आहेत. ठाकरे यांच्या गोपीनाथ गडावरील उपस्थितीमुळे राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून यानिमित्ताने पंकजा मुंडेचा शिवसेना प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री असूनही फडणवीसांनी ५ वर्षांत स्व. गोपीनाथ मुंडें'चं स्मारक उभारलं नाही
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडूनही वरिष्ठ नेत्यांना एकनाथ खडसेंशी चर्चा करण्यास सांगितल्याचंही बोललं गेलं. मात्र, आता स्वतः एकनाथ खडसे यांनीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने खडसेंच्या पुढील राजकीय प्रवासाविषयी उत्सुकता वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सेनेचा अपमान छोट्या-मोठ्या गोष्टीं? भाजपा - शिवसेना यांनी एकत्र यायला हवं: मनोहर जोशी
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले तर उत्तम होईल, पण सध्या दोन्ही पक्ष त्या मानसिकतेत नाहीत, असं मनोहर जोशी म्हणाले. मनोहर जोशी यांनी हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही यावेळी नमूद केलं.
5 वर्षांपूर्वी -
नवा शोध! प्रादेशिक पक्षांमुळे भ्रष्टाचार होतो...आइन्स्टाइनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला सांगणारे सुद्धा हेच
भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही. देशानं १९९०-२०००मध्ये राजकीय अस्थिरता पाहिली आहे. प्रादेशिक पक्ष हे देशाच्या राजकारणासाठी योग्य नाहीत. प्रादेशिक पक्षांमुळेच भ्रष्टाचार होतो, असा आरोपही पीयूष गोयल यांनी केला आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात मुलाखती दरम्यान ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना गद्दार आहे, स्वबळावर लढलो असतो तर...पुढे काय म्हणाले पियुष गोयल?
भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही. देशानं १९९०-२०००मध्ये राजकीय अस्थिरता पाहिली आहे. प्रादेशिक पक्ष हे देशाच्या राजकारणासाठी योग्य नाहीत. प्रादेशिक पक्षांमुळेच भ्रष्टाचार होतो, असा आरोपही पीयूष गोयल यांनी केला आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात मुलाखती दरम्यान ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरेंचं नाव निश्चित; पण भाजपचा विरोध?
मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचे काम गतिमान झालेले नसले तरी त्याच्या नामकरणावरून निर्माण झालेला वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव मोडीत काढत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या महार्गाचे नामांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याची घोषणा लकरच केली जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रानी दिली.
5 वर्षांपूर्वी -
सेनेचा मुख्यमंत्री झाल्याच्या धक्क्यातून भाजप नेते सावरले नाहीत? म्हणाले सरकार मे-जून'मध्ये कोसळणार
कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या मे-जून महिन्यापर्यंत कोसळेल’, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेतील आमदार गिरीश व्यास यांनी केला. इतकंच नाही तर भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचंही गिरीश व्यास म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
ओबीसीं'ना सर्वाधिक संधी दिल्याचं सांगत पंकजा मुंडेंच्या मागण्या अमान्य करण्याची रणनीती
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी मोठा राजकीय निर्णय घोषित करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्यानंतर यावर भारतीय जनता पक्षातील केंद्रापासून ते राज्यातील नेते मंडळी हिदुत्वापेक्षा थेट ओबीसी’च्या मुद्यावर घसरल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीला एकनाथ खडसेंची दांडी
भारतीय जनता पक्षातील पक्षांतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर आज जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने सुरू झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला भारतीय जनता पक्षाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अनुपस्थिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
१९८० मध्ये पवारांनी प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून स्थिर सरकार दिलं होतं: भाजप खा. संजय काकडे
महाराष्ट्रात शिवसेनेनं काँग्रेस-एनसीपी’सोबत जात ऐतिहासिक आघाडीची सत्ता स्थापन केली आहे. परंतु, ही आघाडी टिकणार नाही, सरकार पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू शकणार नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र आता भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
५,००० कोटी मंजूर झालेल्या ४ जलसिंचन प्रकल्पात अनियमितता; भाजपचे संकटमोचक संकटात?
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नैत्रुत्वात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताच मागील फडणवीस सरकारच्या कारभाराचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे आढावा बैठकांचा धडाका लागल्यापासून स्वतःला स्वच्छ आणि पारदर्शक सरकार म्हणवणारे फडणवीसांचे सहकारी आढावा बैठकांमुळे धास्तावल्याचे बोललं जातं आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व नेत्यांनी केवळ याच आढावा बैठकांवरून एकामागे एक प्रतिक्रिया देण्याची स्पर्धा सुरु केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लाचार बोलणाऱ्या भाजपच्या 'वाघ'प्रवक्त्याचं कसाब ट्विट?
राज्यात आणि देशात कोणताही नवं सरकार स्थापन झालं की आधीच्या कामासंदर्भात आढावा बैठका म्हणजे नित्याचाच भाग आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठा दिलासा दिल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अजित पवार यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. मात्र तोपर्यंत त्यांच्या ट्विट्स’चे स्क्रीनशॉट्स घेतले गेल्याने मोठी अडचण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
भिवंडी महापालिकेत काँग्रेसला बाजूला करत 'कोणार्क विकास आघाडीचा' महापौर
परस्परविरोधी विचारांची शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आल्याच्या धक्क्यातून जनता सावरत असतानाच भिवंडी महापालिकेत आणखी एक राजकीय चमत्कार घडला आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाचा पराभव करून अवघ्या ४ नगरसेवकांच्या कोणार्क विकास आघाडीनं भिवंडीचं महापौरपद पटकावलं आहे. काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्यानं ही उलथापालथ झाली आहे. ‘कोणार्क’च्या प्रतिभा पाटील निवडून आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे-पवार दणका! भाजपने स्वपक्षासंबधित साखर कारखान्यांना दिलेली ३१० कोटीची हमी रोखणार?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि राजकीय हेतूने फडणवीस सरकारने भारतीय जनता पक्षाशी संबंधित साखर कारखान्यांवर आर्थिकदृष्ट्या संकटात असल्याचा बहाणा करत तब्बल १५ सहकारी साखर कारखान्यांना राजगोपाल देवरा समितीच्या (Rajgopal Deora Commission) शिफारशींच्या नावाखाली आर्थिक मदतीची खैरात केली होती. तसा अधिकृत निर्णयच फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तडकाफडकी जाहीर केला होता आणि त्यासाठी मंत्रिमंडळ बैठक देखील बोलावली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा निर्णय राजकीय हेतूने घेतल्याचा आरोप अनेक विरोधकांनी केला होता.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या नेत्याकडून आरे-नाणार आंदोलकांवरील गुन्ह्यांची तुलना दहशतवादी दाऊद'वरील गुन्ह्यांशी
तर्कशून्य अंदाज बांधण्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा हात कोणीही पकडू शकत नाहीत. मुंबई आणि कोकणात सेव्ह आरे आणि नाणार प्रकल्पबाधितांची आंदोलनं प्रचंड गाजली. सदर आंदोलनं लोकशाही मार्गाने केली होती आणि ती निसर्गाच्या भल्यासाठीच होती हे देखील सर्वश्रुत आहे. परंतु, याच आंदोलकांवर युती सरकार असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते.
5 वर्षांपूर्वी -
खळबळ! जनतेचे हक्काचे ४० हजार कोटी केंद्राकडे पाठविण्यासाठी फडणवीस ३ दिवस मुख्यमंत्री झाले
‘तीन दिवसांचे मुख्यमंत्री’ म्हणून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात असतानाच कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे (BJP MP Anant Kumar Hedge) यांनी या संदर्भात नवा गौप्यस्फोट केला आहे. ‘केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी बहुमत नसतानाही फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले होते, असा दावा हेगडे यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे १२ डिसेंबरला मोठा राजकीय निर्णय जाहीर करणार; भाजपाला जय महाराष्ट्र?
निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं आहे. या पोस्टमध्ये पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) यांनी म्हटलंय की, निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पाहत होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जबाबदारी माझी आहे असं त्यांनी सांगितले. मात्र त्याच्या पोस्टवर अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाला जय महाराष्ट्र करा असं सांगत, देवेंद्र फडणवीसच राज्यातील भाजपच्या सर्व जुन्या स्पर्धकांना संपवत आहेत असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शपथविधीत छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांच्या उल्लेखाला भाजपचा आक्षेप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आज बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. दुपारी २ च्या सुमारास विधानसभेत बहुमत ठराव मांडण्यास सुरुवात झाली आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील सभागृहाचं कामकाज सांभाळत आहेत. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे किसन कथोरेंविरुद्ध उल्हासनगरच्या कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश का दिले होते?
विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांचं नाव निश्चित करण्यासाठी लवकरच ते अर्ज दाखल करतील अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. त्यानंतर आज विधिमंडळ सचिवांकडे नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे , बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले विरूद्ध भाजपचे किसन कथोरे
विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांचं नाव निश्चित करण्यासाठी लवकरच ते अर्ज दाखल करतील अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Congress Maharashtra President Balasaheb Thorat) यांनी दिली आहे. त्यानंतर आज विधिमंडळ सचिवांकडे नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे , बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या