महत्वाच्या बातम्या
-
महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर: चंद्रकांत पाटील
उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सहा आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु आता या शपथविधी सोहळ्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला. तसंच याविरोधात राज्यपलांकडे एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
5 वर्षांपूर्वी -
पवारसाहेबांसाठी काहीही! भिडली पोरगी भाजपाला अन ऑपरेशन लोटसच्या पाकळ्याच गळाल्या
महाराष्ट्रात २२ नोव्हेंबरला सकाळी राजकीय भूकंप झाला आणि राज्याने सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीचा बातमी बघितली. मात्र त्यानंतर राज्यात खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या खऱ्या एकीची कसोटी होती. विशेष म्हणजे यावेळीच खऱ्या अर्थाने शिवसेना, राष्टवादी आणि काँग्रेस एकमेकांसोबत विश्वासाने एकत्र आल्याचे पायाला मिळाले.
5 वर्षांपूर्वी -
अशोक चव्हाण मंत्रिमंडळात सामील होण्याच्या शंकेने ईडीकडून पुन्हा आदर्श घोटाळ्याची चौकशी?
राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे आणि त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी देखील सामील होणार असल्याने भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचं सध्या चित्र आहे. मागील ४-५ वर्षांपासून काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या भाजपाची उलटीगिणती सुरु झाल्याचं सध्या राजकीय वातावरण आहे. त्यात मेहनतीने राज्यात काँग्रेसची सर्व नैतृत्व संपवण्यासाठी आटापिटा करणाऱ्या भाजपाची सर्व स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिखर बँक प्रकरणातील वास्तव अजित पवार जनतेसमोर आणणार का? सविस्तर वृत्त
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) कर्जांचे वितरण करताना २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह ७० जणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हे दाखल केले आहेत. सदर प्रकरणात या सर्वांवर पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सदर गुन्हे दाखल झाल्याने शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
एकनाथ खडसे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता? सविस्तर वृत्त
भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात जाताच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. तसेच त्यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी काढलेल्या मोर्चाची तसेच गाडीभर पुराव्यांवरून देखील मोक्याच्या क्षणी लक्ष केल्याने वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा सुरु
महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय (Supreme Court of India Order) देते, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आता आपले बहुमत दाखवत ‘महाविकास’आघाडी सत्ता स्थापन करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सोनिया गांधींच्या नावाची शपथ घेत शिवसेनेने लाचारी पत्करली आहे: फडणवीस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलं नाही, त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच नवं सरकार बनविणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांची विरोधाभास असलेली आघाडी त्यांनाच लखलाभ असो, असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला.
5 वर्षांपूर्वी -
बहुमत चाचणी पूर्वीच फडणवीसांनी राजीनामा द्यावा: पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे. ‘न्यायालयाच्या या निर्णयामुळं देशाच्या राज्यघटनेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी आता बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच राजीनामा द्यावा,’ अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांची भेट घेण्यासाठी अजित पवार 'वर्षा' बंगल्यावर पोहोचले
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालय राखून ठेवलेला आपला निर्णय देणार आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सरकार स्थापन केलं. त्या शपथविधीविरोधा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २ दिवस म्हणजे रविवार आणि सोमवार सुनावणी झाली. सोमवारी कागदपत्र सादर करण्यात आले आणि दोन्ही पक्षाकारांची बाजू न्यायालयानं ऐकून घेतली आणि आपला निर्णय राखून ठेवला होता आणि त्यावर आज अंतरिम निकाल देणार असल्याचं म्हटलं जातं होतं.
5 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च आदेश! गुप्त मतदान नाही...व्हिडिओ शूट करा
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालय राखून ठेवलेला आपला निर्णय देणार आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सरकार स्थापन केलं. त्या शपथविधीविरोधा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २ दिवस म्हणजे रविवार आणि सोमवार सुनावणी झाली. सोमवारी कागदपत्र सादर करण्यात आले आणि दोन्ही पक्षाकारांची बाजू न्यायालयानं ऐकून घेतली आणि आपला निर्णय राखून ठेवला होता आणि त्यावर आज अंतरिम निकाल देणार असल्याचं म्हटलं जातं होतं.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात लोकशाहीची चेष्टा चालवली आहे; चिराग पासवान यांची भाजपवर टीका
महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने (Shivsena, NCP and Congress) केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता आदेश देणार आहे. दोन्ही बाजूंकडून सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर, सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला. बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी सोहळा उरकणाऱ्या फडणवीस सरकारचा शपथविधी उरकण्यात आला आहे. त्यामुळे विश्वासमताची तारीख लवकरात निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करत या तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) याचिका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: दहशतवादी हल्ल्याला ११ वर्ष पूर्ण; तर शहिदांचा अपमान करणारी व्यक्ती संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत सदस्य
२६ नोव्हेंबर २००८ हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. या घटनेला आज ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहे. या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास १६६ लोक मृत्यूमुखी पडले होते, तर ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
धक्का! विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील हेच अधिकृत गटनेते अशी नोंद; त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत
अजित पवारांचा आदेश न मानल्यास अपात्रतेची कारवाई होईल, अशी भीती नवीन आमदारांना दाखवली जात होती. पण ते चुकीचे आहे. राष्ट्रवादीने अजित पवार यांना गटनेतेपदावरून दूर केले आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना पक्षादेश काढण्याचा अधिकारच उरलेला नाही, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. अजित पवार यांनी पक्षादेश काढलाच तर त्यांच्याविरोधात मतदान करणाऱ्यांवर कसलीही कारवाई होणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
अवधूत वाघ यांनी सिंचन घोटाळ्यांची प्रकरणं बंद होताच अजित पवारांचं अभिनंदन केलं
भाजपमध्ये क्लीनचिट म्हणजे गमतीचा विषय बनत चालला आहे आणि त्याचं अजून उदाहरण समोर आलं आहे. यातच, कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अजित पवार यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केल्याचे समजते. मात्र तोपर्यंत त्यांच्या ट्विट्स’चे स्क्रीनशॉट्स घेतले गेल्याने मोठी अडचण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बंड अजित पवारांचं; अन भाजप नेत्यांकडून खुलेआम 'आम्हाला राष्ट्रवादीचा पाठिंबा' असल्याची वक्तव्य
राज्यात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली. त्यांनतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर अजित पवार यांचे गटनेतेपद काढून टाकण्यात आले. यावर राजकीय वर्तुळात बराच गदारोळ माजला. तसेच अजित पवार यांनी पाठिंबा दिला तेव्हा ते राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते होते आणि आजही तेच नेते आहेत त्यांनी काढलेला व्हिप राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाळावाच लागेल” असंही रावासाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. या संबंधी भारतीय जनता पक्षाचे नेता रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांना अजूनही गटनेतेपदाचे अधिकार असल्याचे सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
जस्टीस खन्ना यांनी विचारलं 'त्या आमदारांचा आता पाठिंबा आहे का'...पुढे?
भाजपाच्या वतीनं बाजू मांडतांना मुकूल रोहतगी यांनी महत्त्वाचा युक्तीवाद केला. ५४ आमदारांचा आम्हाला पाठिंबा असून, एक पवार आमच्या सोबत आहेत. तर दुसरे आमच्या विरोधात आहेत. त्यांच्या कुटुंबातील वादाशी आम्हाला देणंघेणं नाही. राज्यपालांनी पत्रांच्या आधारे निर्णय घेतला आहे,” असं रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवार कार्यरत होताच भाजपने समर्थक अपक्ष आमदारांना तातडीने गुजरातला हलविले
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणखी तीन आमदार परतले आहेत. त्यामुळे अजित पवारांसोबत केवळ एक आमदार राहिला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यात शिवसेनेनं महत्त्वाची भूमिका बजावली. अजित पवारांसोबत गेलेले आमदार माघारी फिरल्यानं विश्वासदर्शक ठरावावेळी नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे आमदार जागेवरच; टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या खयाली कहाण्या कोणासाठी? सविस्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणाऱ्या आणि त्यांना राज्याला स्थिर सरकार देण्याचं आश्वासन देणाऱ्या अजित पवारांना राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांनी मोदींना धन्यवाद देणारं ट्विट केल्यानंतर शरद पवारच आपले नेते असल्याचं दुसरं ट्विट केलं. त्यावरुन शरद पवारांनी अजित पवारांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. याशिवाय भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
बहुमत नसताना शपथविधी हा केवळ आमदार फोडण्यासाठीचा माइंडगेम भाजपवरच उलटणार? सविस्तर
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करा; राष्ट्रवादीसारखी शिवसेनेत व काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता?
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार