महत्वाच्या बातम्या
-
150 कोटी थकवले | भाजप आ. राहुल कुल यांच्या साखर कारखान्याला जप्तीची नोटीस
पुणे जिल्ह्यातील दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याला जप्तीची नोटीस आली आहे. आमदार राहुल कुल यांच्या ताब्यातील भीमा पाटस साखर कारखान्याने पुणे जिल्हा बँकेचे तब्बल दीडशे कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. त्यामुळे बँकेने ही नोटीस बजावली आहे.
3 वर्षांपूर्वी -
ACB Raided PCMC | पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट 'वसुली राज'वरून राजकारण तापलं
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांसह 4 जणांवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत ताब्यात घेतलं आहे. एसीबीच्या या कारवाईवरुन पिंपरी-चिंचवड शहरात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या कारवाईनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असा संघर्ष सुरू झाल्याचं चित्र शहरात दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या वसुलीराज’वरून भाजपाला लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय.
3 वर्षांपूर्वी -
Jan Ashirwad Yatra | आगरी-कोळी पट्ट्यात शिवसेनेकडून कपिल पाटील यांचं स्वागत | भाजपची क्रॉस पॉलिटिक्सने कोंडी
केंद्रीय मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री जात आहेत, तेथील जनतेशी संवाद साधत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा बुधवारी बदलापूरमध्ये आली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजपच्या मंचावर जाऊन त्यांचं स्वागत केलं. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. बदलापूरच्या घोरपडे चौकात भाजपनं कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या मंचावर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कपिल पाटील यांचं स्वागत करत त्यांचा सत्कार केला.
3 वर्षांपूर्वी -
मिशन महाराष्ट्र | भाजपच्या 'जन आशीर्वाद यात्रे'ला आजपासून सुरुवात | मुंबई-कोंकण ते मराठवाडा
भाजपकडून आजपासून देशभरात ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनीही आपल्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेची सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा भाजपने काढली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई महानगरपालिका निवडणुक २०२२ | भाजपची जोरदार तयारी | 'समर्थ बूथ अभियाना'साठी विशेष रणनीती
शिवसेनेला कोंडीत पकडायचे असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला धक्का देणे गरजेचे आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला भाजप लागलेली आहे. याबाबत विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एक महत्वाची बैठक आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावली होती.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांसह अन्य शिवसेनेच्या नेत्यांनाही रिफायनरी प्रकल्प हवा आहे - प्रमोद जठार
शिवसेनेची अनेक नेते मंडळी तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, स्थानिक आमदार राजन साळवी यांना रिफायनरी प्रकल्प हवा आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीदेखील या प्रकल्पाच्या बाजूने आहे. त्यामुळे हा प्रकल्प राजापूरमध्येच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे वक्तव्य भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे. रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महानगरपालिका २०२२ | एकगठ्ठा मतांसाठी भाजप सर्व विधानसभा क्षेत्रात गुजराती सेल थाटत आहेत?
भारतीय जनता पक्ष एकाबाजूला राज्यातील २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं चित्र आहे. त्यासाठी राज्यातील नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रा काढण्याचं नियोजन आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महानगरपालिकेच्या 132 अधिकाऱ्यांच्या बढतीचा प्रस्ताव शिवसेनेने का अडवला? - आशिष शेलारांचा प्रश्न
भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलारांनी शिवसेनेला सुनावलं आहे. मुंबई महापालिकेतील एससी, एसटीच्या 132 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला घेरलं आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या का रखडवल्या आहेत? मंत्रालयातली बदल्यांप्रमाणे महापालिकेतही वसुली केली जात आ हे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादांच्या नेतृत्वात भाजप पुण्यातही बहुमत गमावणार | गिरीश बापट यांना पुढे करण्याची रणनीती?
विद्यमान विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाने काबीज केलेल्या पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक पक्षासाठी अवघड ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण भारतीय जनता पक्षाकडूनच करण्यात आले होते. त्यामुळे भाजपच्या गोटात सध्या अस्वस्थता पसरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसी नेते राम शिंदेंना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद देण्याची मागणी पुढे | फडणवीस काय करणार?
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेत आता अहमदनगर जिल्ह्यातयून आणखी एक नाव पुढे आले आहे. नगर जिल्ह्यातील भाजप नेते राम शिंदे यांचे नाव त्यांच्या समर्थकांमधून पुढे करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि ओबीसी समाजाचे नेते, मंत्री असताना अनेक खाती सांभाळण्याचा अनुभव, पक्षात विविध पदांवर कामाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांनाच हे पद मिळावे, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांडून व्यक्त केली जात आहे राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी गेल्या निवडणुकीत शिंदे यांचा पराभव केला.
4 वर्षांपूर्वी -
‘त्या’ २७ नगरसेवकांना कोणते गाजर दिले ते लवकरच कळेल - गिरीश महाजन
सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून गेल्या वर्षभरात कोणत्याही योजनेसाठी पैसे देण्यात आलेले नाही. सरकार स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेनेने भाजपाला जोरदार धक्का देताना तब्बल २७ नगरसेवकांचा प्रवेश घडवून आणला होता. त्यावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपकडून OBC आ. संजय कुंटेंना पुढे करून पंकजा मुंडेंच्या राजकारणाला धक्का देण्याची खेळी? - सविस्तर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील बडे नेते दिल्लीत असून महाराष्ट्रातील नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीवर सध्या खलबते सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले जळगाव-जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. संजय कुटे हे फ्रंटलाइन नेते नसले तरी ते मागील चार टर्म आमदार म्हणून निवडून येत आहेत. ते मूळचे बुलडाण्यातील आहेत. काही वर्षांपासून ते देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसी राजकीय आरक्षण | आम्ही आघाडी सरकारला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देतोय अन्यथा...काय म्हणाले बावनकुळे?
भारतीय जनता पक्ष अपेक्षेप्रमाणे आता जातीय मुद्यांवर लक्ष केंद्रित करू लागल्याचं समोर येतंय. मराठा आरक्षणावरून १०२’वी घटना दुरुस्ती करून ५० टक्के आरक्षणाची मर्यादा कायम ठेवून गुंता वाढवला आहे. तर दुसरीकडे राजकीय ओबीसींच्या आरक्षणावरून केवळ ‘ओबीसी आरक्षण’ हा शद्बप्रयोग करून संभ्रम वाढवत असल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
इंधन दर, महागाई, बेरोजगारी मुद्द्यांवर निवडणुका कठीण | भाजप राज्यात आखतंय फक्त 'जात' युद्ध? - सविस्तर वृत्त
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची उद्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दिल्लीत महत्वाची बैठक | कारण गुलदस्त्यात
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची उद्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
सर्वसामान्य जनतेला रेल्वे प्रवासाची मुभा द्या | भाजपचं मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जेलभरो आंदोलन
सर्वसामान्य जनतेला रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी म्हणून भारतीय जनता पक्षाने आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जेलभरो आंदोलन केलं. चर्चगेट, चर्नी रोड आणि कांदिवली रेल्वे स्थानकात शेकडो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जमले. यावेळी आंदोलकांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रेलभरो आंदोलन केलं.
4 वर्षांपूर्वी -
जळगाव | भाजप आ. सुरेश भोळेंच्या दौऱ्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांचे बॅनर फाडले
जळगाव शहरातील SBI कॉलनीत आ.सुरेश भोळे यांनी पाहणी दौरा केल्यानंतर काही वेळातच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने शिवसेना नगरसेवकांनी रस्त्यांच्या कामासंबंधी लावलेले विकासाचे बॅनर फाडून फेकल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. बॅनर फाडणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याने या कार्यकर्त्या विरोधात आपण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध कलम 499, 500 नुसार चारित्र्यहननाचा गुन्हा दाखल
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा बलात्कारी म्हणून उल्लेख करून बदनामी केल्याप्रकरणी त्यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याविरुद्ध सोमवारी चारित्र्यहननाचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद पंचायत समितीत राडा | भाजपच्या उपसभापतीला दालनात घुसून मारहाण
औरंगाबादच्या पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप सदस्यांत तूफान राडा झाला. पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती अर्जुन शेळके यांच्या दालनात घुसून सोमवारी मारहाण करण्यात आली. काँग्रेस सदस्यांनीच ही मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, अर्जुन शेळके यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर 4 दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत ते उपसभापती म्हणून निवडून आले. काँग्रेसने त्याचाच राग काढल्याचा आरोप केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना गुंडांचा पक्ष हे संजय राऊत यांनी मान्य केले आहे - गिरीश महाजन
शिवसेना गुंडांचे समर्थन करणारा पक्ष असून शिवसेनेत गुंड असल्याचे खा.संजय राऊत यांनी मान्य केले आहे. सत्ताधारी पक्षाने गुंडांच्या समर्थनाची भाषा करणे हे राज्याचे मोठे दुर्दैव असल्याची बोचरी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC