महत्वाच्या बातम्या
-
नाशिकमध्ये येणारा KIA मोटर्स प्रकल्प नाशिकच्या दत्तक बापाने नागपूरला पळवून नेला - मनसेचा आरोप
ऑस्ट्रेलियन कर मेकर “KIA” मोटर्स कंपनी आपला प्रकल्प नाशिकमध्ये सुरु करणार होती परंतु नाशिकचे दत्तक बाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नागपूरला पळवून नेला असा गंभीर आरोप नाशिकचे मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या वाटेचं पाणी हे नालायक सरकार गुजरातला देत आहे असा देखील गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गुजरातमधील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांवेळी अज्ञातवासात गेलेले नेते महाराष्ट्रात प्रकटले
गुजरातमधील एका घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरून संतापाच वातावरण झाल्यानंतर हजारो परप्रांतीयांवर हल्ले करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यानंतर हजारो उत्तर भारतीयांनी रातोरात गुजरातमधून पलायन केलं होतं. मात्र या संपूर्ण घटनेनंतर भारतीय जनता पक्षातील आणि काँग्रेसमधील सर्व उत्तर भारतीय नेते अज्ञातवासात गेल्याचे दिसले होते.
5 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज अखेर भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे हा विलिनीकरण सोहळा पार पडला. राणे कुटुंबीयांसह स्वाभिमान पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला.
5 वर्षांपूर्वी -
भाषणात बेरोजगारीवर भाष्य नाही आणि जाहीरनाम्यात नव्या एक कोटी रोजगारांचा मुद्दा
राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान आठ दिवसांवर आल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या रणधुमाळीमध्येच भाजपनं आज निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं.
5 वर्षांपूर्वी -
त्याच विषयावर दोन निवडणुका; २०१४ नंतर पुन्हा २०१९ मध्ये शिव स्मारकाचा समावेश
राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान आठ दिवसांवर आल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या रणधुमाळीमध्येच भाजपनं आज निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभेसाठी भाजपाचं ‘संकल्पपत्र’ प्रकाशित
राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान आठ दिवसांवर आल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या रणधुमाळीमध्येच भाजपनं आज निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे शहर: मुख्यमंत्र्यांची सभा फ्लॉप; सभेतील रिकाम्या खुर्च्यांची चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या राज्यभर सभांचा सपाटा लावला असून त्यांच्या दिवसाला ३-४ सभा नियोजित असल्याचं कळतं. मात्र अनेक ठिकाणच्या आयोजकांनी सभेसाठी मागवलेल्या खुर्च्या देखील भरत नसून त्यांच्या सभेकडे लोंकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. प्रसार माध्यमांचे कॅमेरे सभेतील केवळ स्टेजचं चित्रीकरण करत असल्याने इतर वास्तव समोर येत नसल्याचं प्रकाशाने निर्दशनास येतं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण: भाजपच्या बंडखोर आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी
विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झाली असताना कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे बंडखोर आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षाला अखेर रामराम ठोकला आहे. नरेंद्र पवार ‘शिट्टी’ या चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे पक्षाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी आपण भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नरेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्टवरुन जाहीर केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
ये अंदर की बात है, शिवसेना मनसे के साथ है
असाच काहीसा प्रकार घाटकोपर मतदार संघात घडला आहे. दोन दिवसांपूर्वीच घाटकोपरमधील मनसेचे उमेदवार गणेश चुक्कल यांनी शिवसेना कार्यालयात जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी काही शिवसैनिक देखील उपस्थित होते. मात्र चुक्कल यांनी पुष्पहार अर्पण करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच “ये अंदर की बात है, शिवसेना मनसे के साथ है” असं कॅप्शन लिहून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
सर्जिकल स्ट्राईक वरून मतं मागणारे मोदी स्वतः स्ट्राईकसाठी गेले होते कि जवान? - शरद पवार
नागपूर: पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणायचे ‘घर मै घूस कर मारुंगा… ‘, मात्र दहशतवाद्यांना मारायला एअर स्ट्राईकमध्ये मोदी स्वतः गेले होते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे अनिल देशमुख यांच्या प्रचारसभेत बोलत होते तेव्हा त्यांनी सर्जिकल स्ट्राईक वरून नरेंद्र मोदींची खिल्ली उडविली.
5 वर्षांपूर्वी -
कोथरूड: चंद्रकांत पाटील आल्याने आता ब्राह्मण समाजातच फूट पडण्यास सुरुवात? सविस्तर
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना थेट कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आणि विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्यसह इतर तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या मागे जाणारे मतदारच नालायक: प्रकाश आंबेडकर
भारतीय जनता पक्षाच्या मागे जाणाऱ्या मतदारांना नालायक नाही तर काय म्हणायचे, असे खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते बुधवारी अकोला क्रिकेट मैदानावर भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मतदान करणाऱ्या नागरिकांविषयी संताप व्यक्त केला. मतदार नालायक वागतो म्हणून शासन बेफाम वागते, असे त्यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO: समाजातील प्रत्येक घटक नाराज तरी फडणवीसांचा २४० जागांचा दावा
मागील काही दिवसांचा विचार करता निवडणुकीची हवा पूर्ण पलटल्याचे दिसत आहे. अगदी रस्त्यावर ते समाज माध्यमांपासून सर्वत्र सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका होताना दिसत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांनी राज्यातील मूळ प्रश्नांना बगल देत सर्वत्र जम्मू-काश्मीर संबंधित कलम ३७० हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा केलं आहे आणि त्यामुळे सामान्यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा लोकसभेप्रमाणे लष्कर आणि इतर भावनिक मुद्यांवरून राजकारण केल्याचा आरोप करत, आम्ही एकदा फसलो मात्र पुन्हा फसणार नाही असं म्हणत समाज माध्यमं देखील भाजप-शिवसेनेवर तुटून पडली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
डोंबिवली स्टेशन: भाजप कार्यकर्त्यांच्या ‘भारत माता की जय’ घोषणा; मतदार 'आधी खड्डे बुजवा'
सध्या विधानसभा निवडणुकीचा भारतीय जनता पक्षाचा प्रचार पाहिल्यास त्यात केवळ भावनिक मुद्दे महत्वाचे करण्यात आले आहेत. मात्र त्यात सामान्यांच्या मूळ समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार अशा एक ना अनेक गंभीर विषयांवरून सामान्य माणूस संतप्त असताना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी केवळ भावनिक मुद्दे पुढे रेटून लोकांच्या संतापाला अजून वाट करून देत आहे असेच म्हणावे लागेल.
5 वर्षांपूर्वी -
सेना-भाजपाला तब्बल ३० जागांवर बंडखोरांचा फटका बसण्याची शक्यता
राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीची बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील एकूण ३० विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांनी बंडखोरी केल्याने या तीसही जागांवर महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत बंड शमवण्यात महायुतीला यश आले नाही. काही नेत्यांनी आपली तलवार म्यान केली. मात्र, काही नेत्यांनी बंडाचा झेंडा उचलला. या बंडखोरीमुळे शिवसेना-भारतीय जनता पक्षाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
समस्या कोथरूडच्या आणि जावईबुवांची 'लडाख पे चर्चा'; सासरवाडीलाच भावनिक टोप्या?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रश्न किंवा स्थानिक मुद्दे न आणता राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा होणार आहे. ते घडणार आहे पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी कलम ३७० वर लडाखचे खासदार जयमांग नामग्याल यांचं खास व्याख्यान आयोजित केलं आहे. आज म्हणजे ९ ऑक्टोबर रोजी कोथरूडमधल्या सिद्धी बँक्वेट्स या ठिकाणी संध्याकाळी ४.३० ते ६ या दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘एक चर्चा कलम ३७०, ३५ अ आणि लडाख’ वर अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे.
5 वर्षांपूर्वी -
बीडच्या समस्या राहिल्या दूर; घरोघरी जाऊन कलम ३७०बद्दल सांगण्याची शहांची अजब सूचना
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारच्या काळात राज्यावरील कर्जाचा डोंगर तब्बल ४.७१ लाख कोटींवर
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मागील ५ वर्षात राज्याचा कसा विकास झाला याचा प्रचार करत आहेत. तर विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या अपयशाचा पाठा वाचत आहेत. निवडणुकीच्या प्रचाराला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या २० तारखेपर्यंत बरेच आरोप प्रत्यारोप होणार याच शंका नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी दिवसरात्र एक करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर पोहोचवल्याचा दावा फडणवीस करत आहेत. पण राज्याच्या विकासाची दुसरी बाजू देखील आहे.
5 वर्षांपूर्वी -
बंडखोरांना शांत करण्याचा भाजप-सेनेकडे शेवटचा दिवस
भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली तरी राज्यात युतीसाठी पूरक असे वातावरण सध्यस्थितीत दिसत नाही. त्यामागील कारणही अगदी तसेच आहे. राज्यात चंद्रपूर जिल्हा सोडला तर प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप पक्षाच्या बंडखोरांनी युतीच्या उमेदवाराला आव्हान दिले आहे. या बंडखोरांचा फार मोठा फटका युतीच्या उमेदवाराला बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान दोन्ही पक्षांना असणार आहे. दरम्यान, आज म्हणजे सोमवारी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज बंडखोरांची मनधरणी करण्यात शिवेसेना आणि भाजपला यश आले नाही, तर त्याचा मोठा फटका युतीच्या उमेदवारांना बसणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपकडून सहकारी पक्ष हॅक; कमळावर निवडणूक
भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांना संपवतो असा आरोप त्यांच्यावर नेहमीच करण्यात आला आहे. वास्तविक त्यात तथ्य असलं तरी सत्तेतील सहकारी पक्षातील नेते आणि त्यांच्या पक्षाला देखील भाजपने राज्यात अप्रत्यक्षरीत्या हॅक केले आहेत, असंच म्हणावं लागेल. महादेव जाणकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अप्रत्यक्षरीत्या का होईना, पण त्यातीलच म्हणावे लागतील.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा