महत्वाच्या बातम्या
-
भाजपात दुसरी मेगाभरती १० ऑगस्टला?
भारतीय जनता पक्षात दुसरी मेगाभरती १० ऑगस्टच्या सुमारास होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. बुधवारी झालेल्या मेगाभरतीमध्ये भाजपाने काँग्रेस राष्ट्रवादीमधील एकूण ६ बड्या नेत्यांसह अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांना पक्षप्रवेश दिला.
5 वर्षांपूर्वी -
भाजपनीती! एनसीपी'चे बहुतांश आमदार सेनेविरुद्ध निवडून आल्याचा इतिहास; युती अचानक तोडणार? सविस्तर
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.
5 वर्षांपूर्वी -
२०१४ च्या वचनाप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना तुरुंगात डामणार होते; सध्या भाजपात भरती!
काँग्रेस-एनसीपी’चेआमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईतल्या गरवारे क्लब येथे भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररीत्या प्रवेश केला आहे. एनसीपीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या आमदारांसह एनसीपीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत राष्ट्रवादीचं राजकारण संपुष्टात येणार, गणेश नाईक भाजपच्या वाटेवर?
नवी मुंबई आणि ठाणे या भागातील राष्ट्रवादीचा चेहरा असलेले माजी मंत्री गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करण्यास असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. नाईक हे राष्ट्रवादीच्या ५७ नगरसेवकांसह येत्या काही दिवसांत प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या निवासस्थानी एनसीपीच्या ५७ नगरसेवकांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत नाईक यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्रवादीला पक्ष टिकवायचा असल्याने आरोप: गिरीश महाजन
मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील लोकांचे भारतीय जनता पक्षातील आणि शिवसेनेतील प्रवेश हा सत्तेचा गैरवापर करत, प्राप्तिकर विभाग आणि ईडीच्या मार्फत दबाव टाकून करून घेतले जात आहेत असे आरोप धक्कादायक आरोप विरोधकांनी केले आहेत. काही दिवसांपूर्वीच कागलच्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी आयकर विभागाने अचानक धाडी घातल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभेपर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार संपवण्याची योजना? आतापर्यंत २० नेते बाहेर, तर १० तयारीत
देशांत २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय झाला अन् राजकारणाचे चित्रच पालटून गेले. सर्वकाही सकारात्मक नसलं तरी अनेक पिढ्या राजकारणात असल्याने मातब्बर बनलेल्या घराण्यांना मोठे हादरे बसले. वाढवलेला व्याप कायम राखण्यासाठी या घरण्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. मोठ-मोठी घराणी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसोबत होती. त्यामुळे पक्षांतराचा सर्वाधिक फटकाही राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसत असून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चिंता वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अखेर चित्रा वाघ यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; राष्ट्रवादीला रामराम
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजीनामा सत्र थांबायचं नाव घेत नाही आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सचिन अहिर यांच्याप्रमाणेच चित्रा वाघ यादेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चांना शुक्रवारी उधाण आलं होतं. शेवटी चित्रा वाघ यांनी राजीनामा देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असून पक्षाच्या प्राथमिक सभासदत्वाचा देखील राजीनामा देत आहे. महाराष्ट्रातल्या महिलांची सेवा करण्यासाठी आणि त्यांचा आवाज बनण्यासाठी मला दिलेल्या सर्व संधींसाठी मी तुमची (शरद पवार) आभारी आहे’, असं चित्रा वाघ यांनी त्यांच्या राजीनाम्यात म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांची ‘महाजनादेश यात्रा’ आपल्या मतदारसंघातून जावी यासाठी सेनेच्या आमदार व मंत्र्यांची विनंती
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या वरिष्ठांवर युती तोडण्यासाठी दबाव वाढला; स्वबळाची चाचपणी
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.
5 वर्षांपूर्वी -
लवकरच भाजपमधून लोकं काँग्रेसमध्ये येतील: बाळासाहेब थोरात
गोवा, कर्नाटक या राज्यांमध्ये जे काही घडलं आहे ते लक्षात घेता भाजपला सत्तेची हाव सुटली असल्याची टीका काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. अन्य पक्षांतून लोक भाजपमध्ये जात आहेत. मात्र, लवकरच भाजपामधूनही लोक काँग्रेसमध्ये येतील, अशी भविष्यवाणी थोरात यांनी केली. विरोधी पक्षनेते पद सांभाळणारे एकनाथ खडसे यांना भाजपने योग्य तो सन्मान दिला नाही. त्यांच्यासारखे अनेक जण भाजपमध्ये दुःखी आहेत. लवकरच ते आमच्याकडे येतील. दोन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेनंतर ही निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची आहे, असं थोरात यांनी म्हटलं.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या झुंजार नेत्या चित्रा वाघ देखील भाजपच्या वाटेवर?
जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तस तशी सत्ताधाऱ्यांच्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहेत. दलबदलीचा सर्वाधिक मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला बसत आहे. मात्र त्याचे लोन आता पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघात देखील पसरू लागल्याचे दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या बाततीत घडणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कसबा विधानसभेसाठी चंद्रकांत पाटील आग्रही? वेटिंगलिस्ट'वरील नेते ५ वर्ष वेटिंगवरच?
विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तस तशी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची धडपड सर्वच पक्षातील उमेदवारांकडून होताना दिसते. भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेते आणि विद्यमान महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये राजकारण खेळत सध्या अचानकपणे पुण्यातील कसबा विधानसभेच्या जागेवर डोळा ठेऊन असल्याचं वृत्त आहे आणि त्यासाठी त्यांनी अंतर्गत चाचपणी देखील सूर केल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा: बॉर्डर, कारगिल हे चित्रपट असताना भाजपचा 'उरी' फुकट शोचा घाट कशासाठी? सविस्तर
राज्यातील तरुणांना ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट मोफत पाहायला मिळणार आहे. याबाबत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत सुचना केल्या आहेत. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित हा चित्रपट कारगिल विजयदिनी म्हणजेच २६ जुलैला सकाळी १० वाजता दाखवण्यात येईल.
5 वर्षांपूर्वी -
८९% मिळाले पण फी'साठी पैसे नव्हते; शेतकऱ्याच्या लेकीची आत्महत्या; सत्ताधाऱ्यांकडे कर्नाटकी 'लाड' पुरवण्यासाठी पैसा
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आधीच नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे भीषण झालेली असताना त्याची झळ शेतकऱ्यांच्या कर्तृत्ववान मुलांना देखील मोजावी लागत आहे. राज्यात विषय केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्येपुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो थेट त्यांच्या कुटुंबांनादेखील कुरवाळत आहे असंच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांच्या साड्यांचे पदर ओढले व चिमटे काढले; तक्रारींवर वरिष्ठ म्हणाले?
काही दिवसांपूर्वी भाजपशी संबंधित नेत्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कालच्या पुण्यातील मेळाव्यातील प्रकारामुळे भाजपमध्ये असे किती लोकं अजून आहेत, जे महिलांसाठी धोकादायक आहेत. कारण स्वतः भाजपच्या महिलांनी रागाने पक्षाच्या ग्रुपवर मेसेज टाकून तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान घडलेल्या धक्कादायक प्रकाराबद्दल जेव्हा संबंधित महिला पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली तेव्हा, ‘जावू दया सोडून दया. पत्रकार आहेत इथं. उगीच विषय वाढेल. पक्षाचे नाव जाईल असे सांगितले गेले’. सदर घटनेने संबधित महिला हादरून गेल्या असल्या तरी वरिष्ठांनी प्रकरण मिटवण्यासाठी शक्ती पणाला लावल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
युती पुन्हा नाजूक वळणावर; शिवसेनेकडून देखील स्वबळाची चाचपणी सुरू? सविस्तर
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.
5 वर्षांपूर्वी -
नेतेगिरी मिरवू नका पक्षाला काय दिले ते सांगा: जे. पी. नड्डा यांनी खडसावले
मी २५ वर्षे भारतीय जनता पक्षाचे काम करतो, २० वर्षे पक्षाचे काम करतो असे स्वत:ला मिरवण्यापेक्षा एवढ्या वर्षात तुम्ही पक्षाला काय दिलं याचा विचार करा आणि निकाल देणारं काम करा अशा कानपिचक्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांनी शनिवारी भाजपचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत येथे दिल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे प्रभारी सरोज पांडे,माजी पक्षाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रामुख्याने उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री म्हणून आदित्य यांना प्रोजेक्ट केल्याने आदित्य व शिवसेनेचेही नुकसान
सध्या शिवसेनेकडून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना राज्यभर प्रमोट करण्याचे आणि ब्रँड आदित्य सामान्यांच्या माथी मारण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यानिमित्त राज्यभर आदित्य ठाकरे यांच्या नावाने इव्हेंट आयोजित केले जात असून, त्यासाठी एका नामांकित खासगी कंपनीला काम देण्यात आले असून, त्यांच्या योजनेनुसारच सर्व नियोजन सुरु आहे. त्यासाठी जागोजागी आदित्य संवाद सुरु करण्यात आले असून, त्यासाठी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली जाते आहे.
5 वर्षांपूर्वी -
खिदी-खिदी हसून पाठिंबा देतात की बेंच वाजवून? भारती पवार यांना पाठींबा देण्यासाठी थांबलेलो: रक्षा खडसे
भारतीय जनता पक्षाच्या बीडच्या खासदार प्रितम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा संसदेमधील हसण्याचा एक व्हिडिओ समजा माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यावरून विरोधक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. यावरून रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र त्यांच्या एकूणच स्पष्टीकरणावरून त्यांची किंवा करावी असंच म्हणावं लागेल. देशाने आजपर्यंत संसदेत एवढ्या विषयाला किंवा मुद्दयाला पाठिंबा देताना समर्थन करणारे खासदार हे हाताने बेंच वाजवून समर्थन देतात हे पाहिलं आहे. मात्र संसदेतील बेंचखाली तोंड लपवून खिदी-खिदी हसून समर्थन देण्याचा जावईशोध खासदार प्रितम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या प्रतिक्रयेतून लागला आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस नागपूर व मुंबई अशा २ मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता
राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच सर्वच पक्षातून नवनवीन बातम्या येत आहेत. विशेष करून भारतीय जनता पक्षात सर्वात वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सूर केली केली आहे. त्यानुसार या विधानसभेला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील २ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार