महत्वाच्या बातम्या
-
आमदार खरेदी प्रकरण | झारखंड पोलिस पथक मुंबईत | बावनकुळे, चरणसिंग, बेलखेडे चाैकशीच्या फेऱ्यात
झारखंडमधील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी कट उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. या कटात सहभागी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, व्यावसायिक जयकुमार बेलखेडेंसह ६ जणांची पोलिस चाैकशी करणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार
झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आमदारांना ५० कोटी रुपये आणि मंत्री पदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
अहमदनगरमध्ये जिल्हास्तरीय बैठकीत भाजपमधील पक्षांतर्गत विरोधकांची हकालपट्टी
नेवासे तालुक्यातील शिवसेनेचे झापवाडी येथील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत असतानाच पक्षविरोधी कामे केल्याने नेवासे तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते अनिल ताके, माजी तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य दिनकर गर्जे, माजी शहराध्यक्ष पोपट जिरे यांची पक्षातून हाकालपट्टी केली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
झारखंड सोरेन सरकारमधील आमदार खरेदी कटात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव | आरोपीचा कबुलीजबाब
झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. झारखंड पोलिसांच्या विशेष शाखेनं एक कारवाई करत तीन जणांना अटक केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्याचा कट तिघांनी रचला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रांचीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकत तिघांना अटक केली. हे तिघे सरकारमधील बाराहून अधिक आमदारांच्या संपर्कात होते अशी माहितीही समोर आली आहे. तिघांच्या अटकेनंतर काँग्रेसच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला इंदापूरात जोरदार धक्का | हर्षवर्धन पाटलांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सख्खे चुलत बंधू व इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईतील आरे मेट्रो प्रकल्पावेळी दडपशाही करणारे भाजप नेते सत्ता जाताच मालाड कुरार मेट्रोवरून रस्त्यावर
तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुंबईतील आरे मेट्रो कारशेडच्या निमित्ताने भाजपने मोठं राजकारण केल्याचं पाहायला मिळालं होतं. हजारो तरुण, तरुणी, सेलिब्रिटी, आणि पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरून फडणवीस सरकारच्या आरेतील मेट्रो प्रकल्पाला विरोध करत होती. मात्र त्यावेळी फडणवीस सरकारने पत्रकारांवर देखील दडपशाही केली होती आणि शेकडो तारूंना तुरुंगात पाठवून त्यांच्यावर गुन्हे लादले होते. लोकांच्या कोणत्याही मागण्यांना फडणवीस सरकारने ढुंकूनही पाहिलं नव्हतं. मात्र आज तेच भाजप नेते सत्ता गेल्यावर मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या विकास कामात आणि स्वतःची मतपेटी जपण्याच्या बहाण्याने रस्त्यावर उतरवून लोकांच्या मदतीचा कांगावा करत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.
4 वर्षांपूर्वी -
राज्य भाजपवर आयात नेत्यांचं वर्चस्व | शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस ते मनसे नेत्यांना लॉटरी
देशात असो किंवा राज्यात, भारतीय जनता पक्षाचं राजकारण २०१४ नंतर पूर्णपणे बदललं असून त्यात मूळ भाजप पदाधिकारी आणि नेते मंडळींच्या राजकारणाला अहोटी लागल्यात जमा आहे. त्यात फडणवीसांनी देखील देशातील मोदी नीतीप्रमाणे राज्यातही फडणवीस नीती सुरु करून केवळ निवडून येण्याच्या निकषावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ते मनसेतील नेते मंडळींना प्राधान्य दिल्याचं वारंवार पाहायला मिळालंय. त्यातही या पक्षातील नेत्याचा पराभव झाल्यास त्यांना पुन्हा विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवून मोदी पद बहाल करण्याचा फडणवीसांनी सपाटाच लावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांना तो अधिकारच नाही | तर कोर्टात विरोधात निर्णय जाण्याची धास्ती? | फडणवीसांसोबत बैठक
भारतीय जनता पक्षाच्या १२ निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडली. सदर प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन राज्यपालांनी त्यांना दिलं. मात्र घटनात्मक सत्य हे आहे की राज्यपालांना तो अधिकारच नाही. त्यानंतर आता हे सर्वच्या सर्व बारा आमदार पुन्हा एकदा फडणवीसांच्या निवासस्थानी बैठकीसाठी जमले आहेत. न्यायालयात जाऊन विरोधात निर्णय लागण्याच्या धास्तीने भाजपाच्या अडचणी अजून वाढतील आणि मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता असल्याने चिंता वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी फडणवीसांच्या काळात क्लीनचिट | आता कृपाशंकर सिंग भाजपप्रवेशाला सज्ज
राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह उद्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. असं असलं तरी कृपाशंकर सिंग यांची उत्तर भारतीयांमध्ये राजकीय पत जवळपास संपली आहे. त्यामुळे लोकसभेच्या वेळी देखील त्यांचा प्रवेश लांबवण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
निलंबन आणि अपात्रता यामध्ये फरक | निलंबन मागे घेण्याचे राज्यपालांना अधिकारच नाहीत | तज्ज्ञ काय सांगतात?
अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी, अशा विषयांवरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची अशी कोंडी करणार की सरकारला प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येणार असं चित्र होतं. भाजपनेही पहिल्या अर्ध्या तासात आक्रमक होत याचे संकेत दिले. मात्र तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव विराजमान झाले आणि चित्रच पालटलं.
4 वर्षांपूर्वी -
भाजप आमदारांचा धुडगूस | सभागृह अध्यक्षांना धक्काबुक्की आणि आई-बहिणीवरून शिव्या | १२ आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. या प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. तर, सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेऱ्यात कैद
सोलापुरात घोंगडी बैठकीला आल्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आला. यात गाडीच्या काचेचे नुकसान झाले असून, पोलीस अज्ञात व्यक्तीचा तपास करीत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून दगडफेक करणारा युवक कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला महाविकास आघाडीचा धक्का | सांगली, जळगाव पाठोपाठ भाजपने अहमदनगर महापालिका गमावली
याआधी अहमदनगर महापालिका निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. गतवेळी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी महापौरपदी बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौरपदी मालन ढोणे यांची निवड करण्यात आली होती. परंतु आता सांगली आणि जळगाव पाठोपाठ भारतीय जनता पक्षाने तिसरी महापालिका गमावली. अहमदनगर महानगरपालिकेतही महाविकास आघाडी पॅटर्न आल्याने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत, आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते - शरयू देशमुख
देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला असून, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं, अशी विचारणा थोरात यांनी केली होती. थोरात यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या वक्तव्यावरून थोरातांना टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बावनकुळेंचं निवडणुका रद्द करण्यासाठी निवदेन | राज्य निवडणूक आयुक्तांचा स्पष्ट नकार
राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका रद्द कराव्यात या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक आयुक्त मदान यांची भेट घेतली. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केलं आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांमधील रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुका रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकार कोसळत नसल्याने भाजप हतबल? | दिल्लीच्या आदेशावर भाजपच्या बैठकीत अजित पवारांच्या CBI चौकशीचा प्रस्ताव मंजूर?
प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर जेलिटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यापासून सुरु झालेल्या सचिन वाझे प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझेनेच आणखी एका पत्रातून स्फोट केला. त्यामध्ये, शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनीही खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. त्यावरुन आता भाजपा आक्रमक पवित्रा घेत असल्याचे दिसून येते.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना भाजपचा हा कळवळा कुठे गेला होता? | रोहिणी खडसेंचा थेट हल्लाबोल
जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी प्रतिसवाल केलाय. ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?, असा प्रश्न त्यांनी फडणवीसांना केलाय.
4 वर्षांपूर्वी -
पुणे आंबिल ओढा | भाजप सरकारची भर पावसाळ्यात गरिबांवर कठोर कारवाई | लहान मुलं, स्त्रियांकडून आक्रोश
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पुण्यात स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध केला. घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर आंबिल ओढ्यातील नागरिकांनी विरोध केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही जणांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
जिल्हा परिषद निवडणुकांवरून भाजपमध्ये गोंधळ? | फडणवीस OBC उमेदवार देणार तर पंकजा न्यायालयात जाणार
पावसाळी अधिवेशनाचा कालावधी, विधानसभा अध्यक्ष निवडणूक, ओबीसी आरक्षण आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
दोन दिवसांपूर्वी बावनकुळेंचं शिवसेनेला संपवण्यावर भाष्य | आज सेना-भाजप एकत्र येण्यावर पुड्या
मागील काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक शनिवारी माध्यमांसमोर आले. सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्यात आपलं मत मांडलं आहे. यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जुळवून घेण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिलाय. सरनाईकांनी लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC