महत्वाच्या बातम्या
-
दोनवेळा मतदान करण्याचे आवाहन; भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंविरोधात गुन्हा
लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रचंड मेहनत करायची आहे. अगोदर २३ एप्रिल रोजी साताऱ्यात मतदान करा, त्यानंतर २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा, असा धक्कादायक सल्ला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मतदारांना दिला आहे. याविरोधात मंदा म्हात्रे यांच्याविरुद्ध निवडणक आयोगाकडून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती
VIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती
6 वर्षांपूर्वी -
अमळनेर येथे भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात झालेल्या राड्याची सुरुवात
अमळनेर येथे भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात झालेल्या राड्याची सुरुवात
6 वर्षांपूर्वी -
भाजप आमदाराने विंग कमांडर अभिनंदन यांना दिली चंदन तस्कराची उपमा
लोकसभा निवडणुकीचा आखाडा प्रचार सभांनी तापला असताना आरोप प्रत्यारोपाच्या फैरीदेखील एकमेकांवर झाडल्या जात आहेत. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी मात्र विकासापेक्षा भारतीय सैनिकांच्या शौर्याचा अधिक वापर करून मतांचा जोगवा मागितला जात आहे. परंतु त्या नादात भाजपची नेते मंडळी सैनिकांचाच अपमान वारंवार करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
केशरबेन पटेल, मुरजी पटेल व राजपती यादव यांचे नगरसेवक पद अखेर रद्द
मुंबई महानगर पालिकेतील भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस नगरसेवकांची याचिका जात पडताळणी समितीने अवैध ठरवत फेटाळली होती. या प्रकरणी नगरसेवकांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असता, कोर्टानेदेखील त्यांच्या पदरी निराशाच पडली. दरम्यान आज झालेल्या पालिका सभागृहात भाजपाच्या २ काँग्रेसच्या १ नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द केल्याची अधिकृत घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
पालघरमधून महाआघाडीची बळीराम जाधव यांना उमेदवारी
पालघर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, एनसीपी, बहुजन विकास आघाडी या महाआघाडीतर्फे माजी खासदार बळीराम जाधव यांनी काल मोठं शक्तिप्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीने राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडे उमेदवार नसल्याने त्यांनी आयत्यावेळी भाजपचे राजेंद्र गावित यांना शिवसेनेकडून तिकीट देत पालघरच्या मैदानात उतरवले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप युवा मोर्च्याच्या वतीने भव्य युवा-महोत्सव २०१९ साजरा, अनेक मान्यवरांची उपस्थिती
अंधेरी पूर्व येथे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने भव्य युवा महोत्सव २०१९ साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई विभागातील अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान, या युवा महोत्सवाचे आयोजन एस. के. बंजारा फाउंडेशन आणि अजिंक्य युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले होते.
6 वर्षांपूर्वी -
आज भाजपाला विकासावर प्रश्न विचारला तर अटक, उद्या फासावर लटकवणार? नेटकरी संतापले
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारसभेदरम्यान एक विचित्र प्रकार शनिवारी अमरावती येथील जरुडमधील प्रचारसभेत घडला. वर्धा लोकसभा मतदारसंघातून उभ्या असलेल्या तडस यांच्या प्रचारासाठी आलेले भाजपा आमदार अनिल बोंडे सभेत भाषण देत होते. त्याचवेळी एका तरुणाने मध्येच उभं राहून बोंडे यांना विकासकामांसंदर्भात प्रश्न विचारला. या अनपेक्षित प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. पण बोंडेंसहीत इतर नेत्यांनी आपली भाषण सुरु ठेवत वेळ मारुन नेली. मात्र नंतर या प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त अनेक प्रसार माध्यमांनी दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्ताकाळात शिवसेना-भाजप खासदारांची संपत्ती ६० टक्क्यांनी वाढली
भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांच्या संपत्तीमध्ये तब्बल १०६ टक्क्यांची घट झाल्याची आकडेवारी समोर आली होती. पण, आता शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल ६० टक्क्यांची वाढ झाल्याचे समजते. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी ३.२० कोटींची वाढ झाली आहे. ADRच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. २०१४ आणि २०१९ मधील आकड्यांची तुलना केल्यानंतर ही आकडेवारी देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
उत्तर मुंबई उमेदवार उर्मिला मातोंडकर विरोधात भाजपाची पोलिसात तक्रार
काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करणाऱ्या आणि उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उमेदवार म्हणून उतरलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंना मोदींच्या मुद्यावरून विचलित करण्याची राज्यातील नेत्यांची रणनीती?
मागील काही महिन्यापासून राज ठाकरे यांनी केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशपातळीवरील नेत्यांना लक्ष करण्याचं एकमेव ध्येय ठेवलं आहे. त्यात ते अनेक व्हिडिओ पुरावे दाखवून मोदींना लक्ष करत असल्याने मोदींच्या अडचणीत वाढताना दिसत आहेत. त्याचा थेट परिणाम राज्यातील नेत्यांवर देखील होताना दिसत आहे. त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना बारामतीचा पोपट असा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढे कार्यकर्त्यांना म्हणाले की त्यांच्या भाषणाने तुम्ही विचलित होऊ नका.
6 वर्षांपूर्वी -
शिक्षणमंत्र्यांचं गणित बघा; ७००० गुणिले १२ बरोबर ७२ हजार?
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे पुन्हा एकदा सामान्यांच्या टीकेचे लक्ष झाले आहेत. ययाधी ते त्यांच्या पदवीवरून तर कधी त्यांच्या शिवराळ भाषेवरून नेहमीच वादात अडकले आहेत. आज पुन्हा पालघरमध्ये काँग्रेसच्या न्याय योजनेचा गुणाकार उपस्थितांन समोर करत असताना स्वतःच गणित देखील कच्च असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यावरून उपस्थितांमध्ये तावडेंच्या शिक्षणावरून पुन्हा कुजबुज सुरु झाली होती.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: गोंदियात मोदींच्या सभेसाठी प्रति १००-१५० रुपये देऊन गर्दी जमवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल गोंदियात जाहीर सभा पार पडली. याआधी मेरठ आणि वर्धा येथील सभेत गर्दी न झाल्याने भारतीय जनता पक्ष आणि मोदींची मोठी नाचक्की झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र गोंदियात भारतीय जनता पक्षाने विशेष काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले, परंतु त्यातही ते पकडले गेले असंच म्हणावं लागेल. कारण लोकं मोदींना ऐकण्यासाठी स्वतःहून आले नाही तर ही गर्दी पैसे देऊन जमा करण्यात आल्याचे प्रसार माध्यमांच्या पाहणीतून रेकॉर्डवर आलं आहे. त्यामध्ये १०० रुपयांपासून ते प्रति गाडी ५०० रुपयांपर्यंत असं पैसे वाटप करून सभेसाठी लोकांनी आणण्यात आल्याचं स्वतः लोकांनीच कॅमेऱ्यावर मान्य केले.
6 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी, सोमय्यांचा पत्ता कट की दुसरी सेटलमेंट?
शिवसेना-भारतीय जनता पक्षाचं जागावाटप निश्चित झालं असतानाही ईशान्य मुंबईतून भाजपकडून नक्की कोणाला उमेदवारी द्यायची यावर अजूनही निर्णय झाला नव्हता. त्यात किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता, त्यानंतर आता भाजपाकडून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अवधूत वाघ यांना जाब विचारून तिथेच त्यांच्या कानाखाली मारु: आमदार बच्चू कडू
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख लावारिस असा करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांच्यावर आमदार बच्चू कडू यांनी टीकास्त्र सोडले आहे. अवधूत वाघ याचा डीएनए तपासला पाहिजे, त्याचा डीएनए कदाचित पाकिस्तानचा असावा, तो स्वतःच बेवारसची औलाद आहे, अशा कडक शब्दात त्यांनी अवधूत वाघ यांच्यावर टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
संतापजनक! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलं लावारीस: भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अजून एक संतापजनक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख ‘लावारीस’ म्हणून केला आहे. एका ट्विटला उत्तर देताना अवधूत वाघ यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघ यांनी पातळी सोडून केलेल्या या विधानामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानावर टीकेची झोड उठली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अंधेरी पूर्व विधानसभा: भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष मनोज नायक यांची जबाबदारी वाढली?
मुंबईमधील अंधेरी विधानसभा क्षेत्रात भाजपाची भिस्त असलेले विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल सध्या अनेक विवादास्पद प्रकरणांमध्ये अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच नगरसेवक मुरजी पटेल यांना मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा दंड म्हणजे तब्बल २४ लाख रुपये भरपाई निमित्त देण्यास सांगितले. कारण होतं अनधिकृत होर्डिंग प्रकरणी पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करणे. विशेष म्हणजे मुरजी पटेल यांना लेखी प्रतिज्ञापत्र देणं भाग पडल्याने, भविष्यात लहानशी चूक झाली तरी त्यांचं पद धोक्यात येऊ शकतं आणि मोठी किंमत स्थानिक भाजपाला मोजावी लागू शकते. त्यासोबतच स्थानिक भाजप नगरसेवक मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी तसेच नगरसेविका केसरबेन पटेल या दोघांवर सध्या जातीच्या प्रमाणपत्रावरून मुंबई उच्च न्यायालयात खटले दाखल आहेत. त्यामुळे अंधेरी पूर्व येथील शिवसेना आणि काँग्रेस पक्ष मजबूत स्थितीत असताना, स्थानिक भाजप मात्र नव्या नैतृत्वाकडे आस लावून आहेत.
6 वर्षांपूर्वी -
नातू म्हणाला आजोबा मीच 'पार्थ' मीच लढणार, आजोबांना ताईंची काळजी, दादांना पोराची
मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. जाणते आजोबा नातवडांसमोर मुके.. मुके, आजोंबाच्या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके, अशा शब्दात भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना राज्य सरकारकडून झटका, १ एप्रिलपासून वीज दरात ६ टक्क्याने वाढ
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर १ एप्रिलपासून महावितरणकडून विजेच्या दरात तब्बल सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे विजबिलात सहा टक्क्यांनी वाढ होईल आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसेल.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, किरीट सोमैयांच्या उमेदवारीला तीव्र विरोध
ईशान्य मुंबईच्या लोकसभा उमेदवारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर आज पुन्हा चर्चा झाली. परंतु आज देखील याबाबत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे समोर येत आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून भाजपाचे विद्यमान खासदार किरीट सोमैया यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा