महत्वाच्या बातम्या
-
विमा कंपन्या व बँकांच्या संगणमताने शेतकऱ्यांची लुबाडनूक
विमा कंपन्या व बँकांच्या संगणमताने शेतकऱ्यांची लुबाडनूक
6 वर्षांपूर्वी -
मतांसाठी वाट्टेल ते? प्रभू राम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय: पूनम महाजन
उत्तर भारतीय समाज म्हणजे मुंबईचा कणा असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांनी एका कार्यक्रमात विधान केला आहे. युपीच्या लोकांनी पुढे जाण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. तसेच या समाजानं मुंबईच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्याही विकासात मोलाचं आणि भरीव योगदान दिलं आहे, असं सुद्धा त्या उपस्थित उत्तर भारतीयांना संबोधित करताना म्हणाल्या. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात आयोजित एका कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी हे भाष्य केलं.
6 वर्षांपूर्वी -
#BreakingNews - भाजप डोंबिवली शहर उपाध्यक्षाच्या दुकानातून १७० प्राणघातक शस्त्रे जप्त
डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून कल्याण गुन्हे शाखेने तब्बल १७० प्राणघातक शस्त्रे जप्त केल्याने मोठी राजकीय खळबळ माजली आहे. धनंजय कुलकर्णी या भाजप कार्यकर्त्यांचं वय वय ४९ वर्षे असून, त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
सालाबादाप्रमाणे आयोजित होणारा अंधेरी फेस्टिवल लवकरच रसिकांच्या भेटीला
अंधेरी पूर्व येथे विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची पर्वणी असणारा भव्य अंधेरी फेस्टिवल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या फेस्टिवलचे दरवर्षी मुंबई अंधेरी पूर्व येथे भव्य आयोजन करण्यात येते. जीवन ज्योत प्रतिष्ठानचे संस्थापक आणि भाजपचे स्थानिक कार्यसम्राट नगरसेवक मुरजी पटेल त्यांच्या पत्नी व नगरसेविका केसरबेन पटेल यांच्या पुढाकाराने प्रतिवर्षी या फेस्टिवलचे भव्य आयोजन करण्यात येते.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना-भाजपामध्ये जागावाटप आणि युतीच्या गुप्त चर्चा सुरू, ४ बैठका झाल्या
आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस-एनसीपीदरम्यानचे जागावाटप पूर्णत्वाला आली असताना आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीची सुद्धा गुप्तपणे चर्चा सुरू झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांमध्ये आतापर्यंत एकूण ४ बैठका मुंबईतच पार पडल्याचे वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुंतवणुकदारांचे पैसे थकवले, भाजपचे मंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगल'ची खाती सेबीकडून सील
गुंतवणुकदारांचे तब्बल ७४ कोटी रुपये परत करण्याचे सेबीचे आदेश धुडकावल्याने राज्याचे सहकारमंत्री सुभास देशमुख यांना ‘सेबी’ अर्थात सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने जोरदार दणका दिला आहे. मंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’चे म्युच्युअल फंड आणि डी-मॅट खात्यांना सेबीकडून सील ठोकण्यात आले आहे. तसंच ७४ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मंत्री सुभाष देशमुख यांना नोटीस सुद्धा धाडण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेलार मामा, हे बघा! भागवतांना सुद्धा चौकीदारची मूलाखत समजली नाही: गजानन काळे
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरून एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आणि ते भाजपच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचे दिसले. त्या व्यंगचित्रात स्वतः मोदी हेच मोदी यांना प्रश्न विचारत असल्याची मार्मिक टिप्पणी केली होती. त्यावर चवताळलेले भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी लगेच ट्विट करत, ‘राज ठाकेर यांना ही मुलाखत समजणं अवघड असून त्यांनी चला हवा येऊ द्या, हा कार्यक्रम बघावा’, असा खोचक टोला लगावला होता.
6 वर्षांपूर्वी -
फिल्मी भाजपला पद्म पुरस्कार श्रीदेवी लक्षात, पण पद्म पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर सरांचा विसर
भारताला ‘क्रिकेटचा देव’ देणारे आणि जो भविष्यात भारतरत्न झाला, अशा महान सचिन तेंडुलकरचे गुरु आणि पद्म पुरस्कार विजेते द्रोणाचार्य रमांकात आचरेकर सर यांचे बुधवारी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मुंबईतील अनेक महान क्रिकेटपटू, जाणकार आणि राजकीय नेते मंडळी उपस्थित होती. भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपले गुरु आचरेकर सरांच्या पार्थिवाला खांदा दिला. दरम्यान, यावेळी सचिन आणि सरांचे सर्वच शिष्य अत्यंत भावुक झाले होते.
6 वर्षांपूर्वी -
धुळ्यात भाजपचे चंद्रकांत सोनार महापौरपदी विराजमान
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी तर उपमहापौर पदासाठी भाजपच्याच कल्याणी अंपळकर यांची वर्णी लागली आहे. महानगरपालिका निवडणुकीत एकूण ७४ जागांपैकी भाजपने ५० जागांवर घवघवीत यश प्राप्त केलं होतं. त्यामुळे अन्य कुणाची सुद्धा मदत न घेता भारतीय जनता पक्षाने स्वबळावर धुळे महानगर पालिकेत सत्ता स्थापन केली.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील सरकारचा जन्मच मुळात अनैतिक संबंधांतून झाला आहे: उद्धव ठाकरे
भाजप-एनसीपीचे अनैतिक राजकीय संबंध खूप जुनेच असून राज्यातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात अशा अनैतिक संबंधांतून झाला आहे. केवळ अहमदनगरमधील नव्या पॅटर्नमुळं फक्त मोठ्या प्रमाणावर उफाळून आले इतकेच,’ अशी उपहासात्मक टीका टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भंडारा: अभयारण्यात वाघ मृतावस्थेत आढळला
भंडाऱ्यातील अभयारण्यात आज सकाळी एक नर वाघ मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे. सकाळच्या सुमारास पर्यटक तसेच गाइड यांना सफारीदरम्यान हा वाघ मृत अवस्थेत आढळला. दरम्यान, वाघाची अद्याप ओळख पटली नसून त्याच्या मृत्यूचं मूळ कारण सुद्धा अजून अस्पष्ट आहे.
6 वर्षांपूर्वी -
९ महिन्यात ११, ९३२ बालमृत्यू, जवाबदार मंत्र्यांचा वेळ कुठे...सीएम चषक?
महाराष्ट्रात कुपोषणामुळे होणारे बालकांचा मृत्य अजून जैसे थे अशीच अवस्था आहे. सरकार बदलून सुद्धा बालमृत्यूंचा गंभीर प्रश्न अद्याप सुटलेला नाही. केवळ जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यामध्ये महाराष्ट्रात तब्बल ११,९३२ बालमृत्यूची नोंद झाली आहे. परंतु हे प्रमाण आधीच धक्कादायक असताना त्यात कमी वजनाच्या बालकांचे सुद्धा प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी समोर येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
हे शिवसेनेचे नेते कुठेही डोकं लावतात! - रावसाहेब दानवे
शिवसेनेचे नेते कुठे सुद्धा डोकं लावतात असं खिल्ली उडवणारे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. त्याला निमित्त आहे ते राज्य सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा केली, असे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना शुक्रवारी दुपारी सुपूर्द केले. राज्यातील बळीराजाचे कर्ज माफ करावे आणि राज्य सरकारने कर्जमाफीच्या फसव्या घोषणा करुन केवळ जाहिरातबाजी केली आहे. त्यामुळे शेतकर्यांची केवळ क्रूर चेष्टा चालवली आहे. अशा कडक शब्दांमध्ये ते निवेदन देण्यात आल्याने, रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेत्यांवर ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेच्या नगरसेवकांनी शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमचा पाठिंबा मागितला, ऐकवली ऑडिओ क्लिप
महापौर निवडणुकीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनीच माझ्याकडून पाठिंबा मागितला, त्यामुळे त्यांच्याच विनंती आणि मागणीनुसार मी शिवसेनेला मतदान केलं असं स्पष्टीकरण शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम याने प्रसार माध्यमांशी संबंधित विषयावरून संवाद साधताना दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
नगर निवडणूकः भाजपा-एनसीपी'ची खेळी, शिवसेनेला धोबीपछाड, महापौर भाजपचा
सकाळी अकरा वाजता महापौर निवडीची सभा पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्यास सुरुवात झाली. शिवसेनेच्या २४ नगरसेवकांपैकी २३ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. तर सपा नगरसेवकांनी शिवसेनेला पाठींबा दिला. सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला एकूण ०८ मते मिळाली तर एनसीपीचे महापौर पदाचे उमेदवार संपत बारस्कर, अविनाश घुले, नज्जू पहिलावान हे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांच्यासोबतच महापालिकेत हजर झाले.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचा गुन्हा काय? भाजप-शिवसेनेच्या सरकारकडून धर्मा पाटलांच्या कुटुंबाला नजरकैद?
केवळ मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात अडथळा नको म्हणून काही महिन्यांपूर्वी मंत्रालयात आत्महत्या करणा-या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, भाजप-शिवसेना सरकारची ही कारवाई म्हणजे या सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती असल्याची बोचरी टीका दाखवून देते. सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध.
6 वर्षांपूर्वी -
बुडत्या जहाजाची जाणीव? खासदार कपिल पाटील भाजपला रामराम करत काँग्रेसवासी होणार?
ठाणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. ठाणे भिवंडी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार कपिल पाटील हे सध्या ठाणे जिल्ह्यात भाजपचे एकमेव खासदार आहेत. त्यात स्वतः कपिल पाटील यांनीच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस प्रवेशबाबत तब्बल ३ वेळा भेट घेऊन चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
ESIC इस्पितळ जळीत प्रकरण: मृतांच्या नातेवाईकांना मुरजी पटेल यांच्या हस्ते मदत सुपूर्द
काही दिवसांपूर्वी मुंबई अंधेरी पूर्व येथे असलेल्या इएसआयसी इस्पितळाला प्रचंड मोठी आग लागल्याने अनेकांनी जीव गमावला होता. त्यानंतर संबंधित विषयाला अनुसरून आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेता सरकाकडून ताबडतोब मदत मिळावी अशी मागणी पुढे येत होती. दरम्यान, स्थानिक नगरसेवक मुरजी पटेल यांनी त्यांची राजकीय शक्ती पणाला लावत केंद्राकडून ताबडतोब मदत मिळण्यासाठी पाठपुरावा केली होता.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडचे सत्य सांगून शिवसेनेचे करून दाखवलेचे पितळ उघडे पडले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडचे सत्य सांगून शिवसेनेचे करून दाखवलेचे पितळ उघडे पडले
6 वर्षांपूर्वी -
भाजपनेच पुण्यातील मोदींच्या कार्यक्रमापासून खासदार काकडेंना दूर ठेवले?
पुण्यातील शिवाजीनगर- हिंजवडी या मेट्रोच्या तिस-या टप्प्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल मोठ्या थाटात पार पडले. परंतु, या सोहळ्याकडे भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पाठ फिरवल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, खासदार संजय काकडे यांचा भाजपनेच या भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून पत्ता कट केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच त्यांनी रागाने या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा