महत्वाच्या बातम्या
-
4 खासदार असणारे लोकनेते | मग 303 खासदार असणाऱ्या मोदींच्या नेतृत्वला काय म्हणाल
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. तर ज्या पक्षाचे 4 खासदार आहे त्यांना लोकनेते म्हणताय मग 303 खासदार निवडून आणणाऱ्या मोदी यांच्या नेतृत्वाला काय म्हणायचे’ असा सवाल करत भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीला डिवचले आहे.
4 वर्षांपूर्वी -
तीन तिघाडी, काम बिघाडी असे निष्क्रिय आघाडी सरकार | भाजपचं वीजबिलांवरून आंदोलन
वाढीव वीज बिलाविरोधात भारतीय जनता पक्षाने कल्याणमध्ये आंदोलन केले. या दरम्यान, वीज बिलाची होळी करताना भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की, झटापट झाली. यावेळी आमदारांनी पोलिसांवर दपडशाहीचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.
4 वर्षांपूर्वी -
तुमचे कार्यकर्ते फडणवीसांना टरबूज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालतं का? - चंद्रकांत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्याने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Maharashtra State President Chandrakant Patil) यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मला पवार साहेबांबाबत असं बोलायचं नव्हतं,” अशा शब्दांत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “मला पवार साहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालतं का?”
4 वर्षांपूर्वी -
वारकऱ्यांनो सावधान | श्री विठ्ठल महापूजेला विरोध करणारे ते RSS'चे चमचे आहेत - आ. मिटकरी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठलाची महापूजा पार पडणार आहे आहे. मात्र या पूजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे आहेत असं राष्ट्रवादीचे विधान परिषदेचेआमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे. “तुका म्हणे खळ! करु समयी निर्मळ” असं देखील त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेलार यांच्या विधानाशी असहमती | सुप्रिया सुळेंना आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही - चंद्रकांत पाटील
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला भाजप नेते आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी बोलताना शेलारांनी मराठा समाजातल्या स्त्रियांच्या कर्तृत्त्वावर भाष्य केलं. ‘मोठ्या पदावर मोठ्या मनाच्या व्यक्ती फार कमी असतात. ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ पुस्तकात शरद पवारांच्या आई शारदाबाई यांच्याबद्दल जे लिहिलंय, ते अतिशय प्रेरणादायी आहे. मराठा समाजातली कर्तृत्ववान स्त्री मुख्यमंत्री व्हावी, असं मला वाटतं. तसं होणार असेल, तर त्याला माझं समर्थन आहे,’ असं शेलार म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजप तोंडघशी | आत्महत्याग्रस व्यापाऱ्याच्या नोटमध्ये NCP नव्हे भाजपचा कार्यकर्ता
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानच्या शेजारील घरामध्ये एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. पवार यांच्या शेजारी राहणाऱ्या प्रीतम शाह यांनी आत्महत्या केली असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मुलाने बारामती पोलिसांकडे नऊ जणांविरोधात तक्रार केली आहे. या प्रकरणामध्ये सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून तीन जण फरार असल्याचे वृत्त सकाळी प्रसिद्ध झालं होतं.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणूक | आ. भातखळकरांवर जवाबदारी | तर आ. शेलार यांचा राजकीय..?
मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ (Mumbai Municipal Corporation Election 2022) मध्ये होणार असून मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकवण्याचा निर्धार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (State Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी बोलून दाखवला आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिंकण्याचा संकल्प जाहीर केला आहे. त्यादरम्यान, शिवसेनेवर सातत्याने हल्ले करणारे आमदार अतुल भातखळकर यांच्यावर महत्वाची जबाबदारी देखील सोपविण्यात आली आहे. मात्र फडणवीसांनी आमदार अतुल भातखळकर यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची जवाबदारी देताना मुंबईतील भाजपचे महत्वाचे आमदार आशिष शेलार यांचा राजकीय गेम केल्याची चर्चा रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपा मुबंईत चितपट होणार | म्हणून ते आतापासून तयारीला लागले आहेत - जयंत पाटील
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचा आढावा घेतला. महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे नेते यावेळी उपस्थितीत होते. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड आणि जयंत आजगावकर यांच्या प्रचाराची सुरवात झाली. उद्यापासून पुणे जिल्ह्यात प्रचार सुरू होणार असून, त्याचा देखील आढावा यावेळी जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले,”महाराष्ट्रात ५ जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. सर्वच्या सर्व ५ ही जागांवर आमचे उमेदवार निवडून येतील. आम्ही तिन्ही पक्ष संयुक्त प्रचार करत आहोत, कोणी कुठं जायच तसं ठरलेलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचं राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन | नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन
राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार असून नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले.
4 वर्षांपूर्वी -
रश्मी ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे लक्ष | आशर प्रोजेक्ट्स डीएम'मध्ये आदित्य ठाकरे पार्टनर - सोमैया
अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून धक्कादायक आरोप केले होते. मुंबईच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले होते की, ठाकरे सरकार भूखंडाचं श्रीखंड करणारं सरकार आहे. दहिसर येथील जमीन एका बिल्डरने २ कोटी ५५ लाखात घेतली आणि मुंबई महापालिका ९०० कोटीत ती जमीन विकत घेत आहे.
4 वर्षांपूर्वी -
...तशीच बनवाबनवी 'सरासरी राज्य सरकारने' वीज ग्राहकांसोबत ही केली - आ. आशिष शेलार
वीज बिलाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारने दिलेला शब्द न पाळल्यामुळं आता सर्वसामान्य जनतेसोबतच विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील राज्य सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून सूट किंवा वीजबिल माफी मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
भाजपशासित राज्यांमध्ये छटपुजा उत्सव साजरा करण्यावर निर्बंध | भाजप नेत्यांना माहित नाही
कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी छठपूजा साजरी करण्यावर महाराष्ट्र सरकारकडून निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार समुद्र किनारी, नदी किनारी किंवा तलावाच्या काठी हा उत्सव साजरा करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या टीकेवर काँग्रसे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चोख प्रतिउत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
चप्पल घालून मंदिरात प्रवेश केल्याने दोन गटात हाणामारी | पडळकरांच्या भावासह 12 जणांवर गुन्हा दाखल
कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली मंदिर अखेर सुरू करण्यात आली आहे. मात्र, सांगलीमध्ये चप्पल घालून मंदिरात गेल्याच्या कारणावरून आटपाडी तालुक्यातील झरे इथं दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सत्तेसाठी लाज आणि हिंदुत्व विकले | मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर बिघडले कुठे? - भाजप
माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस देखील हफ्त घेत नाहीत का? असं धक्कादायक विधान केले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. भास्कर जाधवांचं हे विधान 8 नोव्हेंबर 2020 रोजीचं आहे. सध्या त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल देखील होत आहे. तसेच फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका. पहिली म्हणजे मुलींची छेडछाड आणि दुसरी म्हणजे चोरी. ‘बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी आहे’, अशी पुष्टी देखील यावेळी जाधव जोडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उ. महाराष्ट्रात भाजप आधीपासून मजबूत | पवार ५० वर्षांपासून राज्याचे दौरे करत आहेत
अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी सातत्यानं चालू आहे. अशातच आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला धक्का | संघाच्या मुशीतून घडलेल्या माजी केंद्रीय मंत्र्याचा भाजपाला रामराम
उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र तसेच राज्यात मंत्री पद भूषविणारे नेते देखील भाजपाला सोडचिट्ठी देत असल्याचा पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाला एका माजी केंद्रीय पद भूषविणाऱ्या नेत्याने रामराम ठोकला आहे आणि त्यामुळे भाजपाची चिंता कमी होण्याची चिन्ह दिसत नाही.
4 वर्षांपूर्वी -
राजकारणाच्या आखाड्यात देवाला ओढण्याचा भाजपाचा नेहमीच प्रयत्न राहिला - सचिन सावंत
कोरोना आपत्तीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मंदिरं तसेच इतर धर्मियांची प्रार्थना स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचा धोका टळला नसला तरी सामान्य लोकांच्या मनातील भीती मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. दरम्यान, अनलॉक ५ ची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर राज्य जवळपास पूर्णपणे अनलॉक झालं आहे. त्याला अपवाद केवळ मुंबई लोकल राहिली असून ती सर्वांसाठी खुली झालेली नाही. तसेच महाविकास आघाडी सरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजप सावध | पंकजा मुंडे आणि तावडेंना प्रभारीपद
भारतीय जनता पक्षाने 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रभारी व सह प्रभारींची यादी जाहीर केली आहे (BJP Party announced state in charges). पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंकजा मुंडे (Former Minister Pankaja Munde) यांची मध्य प्रदेश सह प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विनोद तावडे (Former Minister Vinod Tawde) यांची हरियाणा प्रदेश भारतीय जनता पक्ष प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. तसेच सुनील देवधर यांची आंध्र प्रदेश सह प्रभारीपदी नियुक्ती केली असून, विजया रहाटकर यांना दमन दीव-दादरा-नगर हवेली प्रभारीपदी नियुक्ती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अशी सरकारं फार काळ टिकत नाहीत | जेव्हा कोसळेल तेव्हा पर्यायी सरकार देऊ - फडणवीस
राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे दावे भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली ते गल्लीतील नेत्यांनी केले आहेत. मात्र बिहार मधील सत्ता एनडीएने कायम राखल्यानंतर भाजपच्या नेत्यांना पुन्हा स्वप्नं पडू लागली आहेत. पाच वर्षातील एक वर्ष सरकार पडण्याची वाट पाहिल्यानंतर उरलेल्या ४ वर्षांवर पुन्हा वक्तव्य येण्यास सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार येण्यापूर्वीचा कायदेशीर व्यवहार | भाजपची रश्मी ठाकरेंविरुद्ध अर्थहीन बोंबाबोंब?
अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते भाजपच्या नेत्यांसाठी देखील झगडताना दिसले नसतील तितकी बोंबाबोंब सध्या ते आता करताना दिसत आहे. त्यासाठी ते कोणत्याही अर्थहीन विषयाचा संबंध अन्वय नाईक आणि अर्णब प्रकरणाशी जोडताना दिसत आहेत. यापूर्वी देखील समाज माध्यमांवर अन्वय नाईक कुटुंबियांच्या राहणीमानावरून त्यांना लक्ष केलं होतं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा