Blockchain Technology | क्रिप्टोकरन्सी संबंधित ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय ते जाणून घ्या
क्रिप्टोकरन्सीची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. ज्यांनी यात गुंतवणूक केलेली नाही त्यांनीही याबद्दल ऐकले आहे. RBI ने डिजिटल रुपया आणल्यानंतर आणि बजेटमध्ये 30 टक्के कर लागू केल्यानंतर क्रिप्टो पुन्हा एकदा चर्चेत आहे. आता आरबीआयचे डिजिटल चलन काय असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. या चर्चेदरम्यान, क्रिप्टोकरन्सीचा कणा असलेल्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेऊया. त्याचे नाव ब्लॉकचेन तंत्रज्ञान आहे. बिटकॉइन, इथेरियम आणि डॉगेकॉइन यासह इतर अनेक आभासी चलनांच्या संकल्पनेमागे ब्लॉकचेन तंत्रज्ञान आहे.
3 वर्षांपूर्वी