महत्वाच्या बातम्या
-
Mumbai River | मुबईतील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी BMC १३०० कोटी खर्च करणार | नद्यांच्या सौंदर्यीकरणावर भर
मुंबईतील नद्यांमध्ये प्रदूषण होत आहे. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच राष्ट्रीय हरित लवादाने मुंबई महापालिकेला अनेकवेळा फटकारले आहे. त्यासाठी नद्यांचे सौंदर्यीकरण व सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार दहिसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचे पुनरुज्जीविकरण केले जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल १ हजार ३०४ कोटी ५१ लाख रुपये खर्च करणार आहे. नदीच्या प्रदूषणाबाबत पालिकेने केलेले दुर्लक्ष व आता उशिराने आलेली जाग याबाबत विरोधकांकडून प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
सावधान मुंबईकर | आज 5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन | विसर्जनाच्या पवई तलावात मगरीचे दर्शन
सोनपावलांनी घरी आलेल्या गौराईची पाच दिवस पूजाअर्चा करण्यात आली. या पाच दिवसात महिलांनी फुगडी घालून फेर धरला. घागरी फुंकल्या आणि सूपही उडवले… सासू-सूनांनी गौराई समोर गाणी म्हणत मनमोकळंही केलं. पाच दिवस चालेल्या या पारंपारिक पूजाअर्चेनंतर आज माहेरवाशीण गौराईला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज दुपारनंतर या माहेरवाशीण गौराईंना जड अंतकरणाने निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकाही सज्ज झाली आहे
3 वर्षांपूर्वी -
दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज | 246 ठिकाणी विसर्जनाची सोय
मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुंबईमध्ये घरगुती आणि सार्वजनिक अशा एकूण २ लाख मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. या मूर्तीचे दीड, पाच, सात आणि दहा दिवसांनी विसर्जित केल्या जातात. मुंबईत गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत आज शनिवारी(११ सप्टेंबर) दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | पेंग्विनच्या देखभालीसाठी काढले जाणारे टेंडर आयुक्तांनी केले रद्द
राणीबागेतील पेंग्विनसाठी काढले जाणारे १५ कोटींचे टेंडर पालिका प्रशासनाकडून मागे घेण्यात आले आहे. पेंग्विनची जास्तीत जास्त देखभाल महापालिका प्रशासनाच्या अखत्यारितच करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
मुंबईत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा | महाराष्ट्रातही अशा शाळा सुरू करणार - आदित्य ठाकरे
देशात आणि जगात जे सर्वोत्तम असेल त्या पद्धतीचे शिक्षण मुंबईतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. भविष्यात राज्य शासनामार्फत राज्यातील विद्यार्थ्यांना असे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
Global Warming | मुंबईतील नरीमन पॉईंट, मंत्रालय परिसर 80% पाण्याखाली जाईल | महापालिका आयुक्तांचा इशारा
पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे मुंबई वातावरणीय बदल अॅक्शन प्लॅन योजनेच्या वेबसाईटचं लाँचिंग करण्यात आलं. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यावेळी मुंबईकरांना एक इशारा दिला आहे. वातावरणीय बदलांमुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन 2050 पर्यंत मुंबईतील नरिमन पॉईंट, मंत्रालय, दक्षिण मुंबईतील ए, बी. सी आणि डी वार्डमधील 80 टक्के भाग पाण्याखाली जाईल, अशी गंभीर भविष्यवाणी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
तिसऱ्या लाटेपूर्वी मुंबई महापालिका सज्ज | 35 दिवसात 2170 बेडच्या कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती
महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. येत्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी तिसऱ्या लाटेसाठी सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत केवळ 35 दिवसात 2170 बेडच्या कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
आगामी BMC निवडणुक | उत्तर भारतीय मतदारांचा फटका त्यात शिवसेनासोबत नाही | भाजपची महत्वाची बैठक
संपूर्ण देशात अत्यंत महत्वाच्या अशा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेत्यांवर महत्वाची जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
डॉ .रेड्डीज लॅबोरेटरीज मुंबई महानगरपालिकेला स्पुटनिक लसीचा पुरवठा करणार
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबईकरांना स्पुटनीक लसींचे डोस उपलब्ध होणार आहेत. लसींच्या तुटवड्याअभावी मुंबई मनपाने ग्लोबल टेंडर काढत लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याच दरम्यान आता डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज सोबत बोलणी यशस्वी झाली असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकांचे कोरोना काळातही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सुरूच, हायकोर्टाकडून संताप | दिले हे आदेश
लोकांचे कोरोना काळातही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सुरूच असल्यामुळे केवळ आर्थिक दंड आकारण्यासोबतच लोकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यावरही भर द्या, असे निर्देश राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाने दिले आहेत. यावर पालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांपासूनच याची सुरूवात करावी, कारण तेही याबाबतीत गंभीर दिसत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांची तक्रार करण्याऱ्या नागरिकांना गंभीरतेने घेतले जात नाही.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | मुंबई महानगरपालिकेच्या दोनशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोना आपत्तीत मुंबई महानगरपालिकेच्या दोनशेपेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभाग, सफाई विभाग, आरोग्य विभाग, जल विभागाच्या कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश यात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना आपले कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई महापालिकेच्या जवळपास २२० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Good News | BMC'च्या ग्लोबल टेंडरवला ३ पुरवठादारांकडून प्रतिसाद | स्पुतनिक लस उपलब्ध करण्यास तयार
राज्यात बाधित रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा खाली येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. कालच्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
घरोघरी जाऊन वरिष्ठ नागरिकांच्या लसीकरणास केंद्र BMC'ला मान्यता देत नसेल तर आम्ही देऊ - मुंबई हायकोर्ट
ज्यात बाधित रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा खाली येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. कालच्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी ५२ हजार ८९८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील अशा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ४९ लाख २७ हजार ४८० इतका झाला असून राज्याचा रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर गेला आहेेेे.
4 वर्षांपूर्वी -
High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा
तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. राजापूर, रत्नागिरीच्या किनारपट्टीभागात सोसाट्याचा वारा सुरू असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तौत्क चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई जवळून प्रवास करणार आहे. त्यामुळे किनारपट्टीभागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं नशीब | मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल
भारतीय जनता पक्षाचेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी एकाबाजूला मुंबई महानगरपालिकेच्या कामावर संशय निर्माण केला आहे. त्यात मोदी त्यांची स्तुती करणारच नाहीत असं देखील भाजपचे नेते बोलू लागले. तत्पूर्वी सुप्रीम कोर्टाने देखील मुंबई मॉडेलचा दाखल देत एक प्रशस्तीपत्र दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
कोर्टाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर | लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला पण मुख्यमंत्री संयमी - महापौर
दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी मुंबई मॉडल स्वीकारण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन व्यवस्थापनाची सुप्रीम कोर्टाने स्तुतीही केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई महानगरपालिकेच्या कोरोनासंबंधित चांगल्या नियोजनाची आठवण, दिल्लीला सल्ला
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरुच आहे. अशावेळी काही राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतोय. त्याचबरोबर व्हेटिलेटर्सही कमी पडत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी आणि आजही ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. ‘देशात जी स्थिती आहे. ती पाहून तुम्ही आंधळे बनू शकता, आम्ही नाही. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही. केंद्राने तर डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, पण आम्ही तसं करु शकत नाही’, अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईमध्ये खासगी रुग्णालयात 80% बेड कोव्हिड रुग्णांसाठी राखीव
बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीत खासगी रुग्णालयांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, खासगी रुग्णालयांना कोरोना रूग्णांसाठी 80% बेड आणि 100% आयसीयू बेड आरक्षित करावे लागतील. वॉर्ड वॉर रूममधून कोरोना रूग्णांचे बेड वाटप केले जातील. रूग्णांना थेट भरती करण्यास रुग्णालयांना प्रतिबंधित करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांनो उद्या मुंबईतील 'या' विविध ठिकाणी पाणीपुरवठ्यावर परिणाम
मुंबईच्या काही भागांमध्ये उद्या (23 मार्च) दिवशी पाणीपुरवठा बंद असेल तर काही ठिकाणी कमी दाबाने पुरवला जाणार असल्याची माहिती बृह्न्मुंबई महानगरपालिकेने अर्थात बीएमसीने दिली आहे. बीएमसी कडून 12 तासांसाठी हा पाणीपुरवठा प्रभावित असेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच उद्यासाठी देखील पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत लग्नसमारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमातून कोरोना वाढतोय | BMC'चा दावा
राज्यासह मुंबईतही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आता धडक मोहिम सुरु केली असून यात कोरोनाचे नियम मोडणा-यांवर कडक कारवाई केली जात आहे. यात आतापर्यंत केलेल्ये सर्वेनुसार, मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभातून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. दरम्यान हॉटेल्स, बार, पब्ज, हॉल यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी मुंबई महापालिकेचे छापे टाकण्याचे काम सुरु आहे. यात कोरोना नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा