महत्वाच्या बातम्या
-
आधी बांधकाम अनधिकृत नसल्याचा कांगावा | आता बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी अर्ज
कंगनाच्या खारमधील राहत्या फ्लॅटवर केलेल्या मुंबई महापालिकेच्या कारवाईविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केलेली याचिका अखेर कंगनाकडून मागे घेण्यात आली आहे. बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे रितसर अर्ज करणारअसून कंगनाच्या अर्जावर चार आठवड्यांत निकाल देणं बीएमसीला बंधनकारक असणार आहे. जर निकाल कंगनाच्या विरोधात गेला तर कारवाईला दोन आठवड्यांची स्थगिती देण्यात देईल असा आदेश हायकोर्टाने दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत रात्री 11 नंतरही फूड डिलिव्हरीला परवानगी | महापालिकेची माहिती
आज संध्याकाळपासून थर्टी फर्स्ट पार्ट्यांना उधाण येईल. नववर्ष स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरु होईल. मात्र दरवर्षी प्रमाणे यंदा जोरदार सेलिब्रेशन करता येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. कोविड-19 चे संकट आणि त्यामुळे सरकार, पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेले नियम पाळणे अनिवार्य आहे. दरम्यान, नाईट कर्फ्यू असला तरी मुंबईकरांची पार्टी थांबू नये म्हणून पालिकेने चोख व्यवस्था केली आहे. रात्री 11 नंतरही फूड डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती बीएमसीने ट्विटद्वारे दिली आहे. हा निर्णय मुंबईकरांसाठी नक्कीच दिलासादायक आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईतील शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंदच | पालिकेचा निर्णय
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शाळांंबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा-महाविद्यालये 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याआधी 31 डिसेंबर 2020 पर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिकेला दणका | कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई बेकायदा - हायकोर्ट
बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर (Bollywood Actress Kangana Ranaut Mumbai Office) मुंबई महापालिकने अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने मुंबई पालिकेची कारवाई अवैध असल्याचा म्हणत पालिकेचा जोरदार दणका दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार | पालिका आयुक्तांचे आदेश
मुंबईतील कोरोनाबाधितांचा पुन्हा वाढणारा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत संसर्ग लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशांप्रमाणे, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंदच ठेवण्यात येतील. खरंतर,राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना घाई | मुंबई मनपाच्या स्थायी समितीला ६०० मलईदार प्रस्तावांच्या मंजुरीची घाई -सविस्तर वृत्त
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीची पहिली बैठक २१ ऑक्टोबरला आहे. या एकाच बैठकीत कोट्यवधी रुपयांचे ६०० प्रस्ताव झटपट मंजुरीसाठी सादर होणार असल्याचे वृत्त आहे. भाजपने चर्चेशिवाय प्रस्ताव मंजूर करणे चुकीचे असल्याचे सांगितले तर सत्ताधारी शिवसेनेने स्थायी समितीचे अध्यक्ष नियमाला धरुन निर्णय घेतील अशी भूमिका घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Mumbai Power Cut | BMC Alert | लाइट आली, आता पाण्याचं टेन्शन
मुंबई व उपनगरांतील वीज पुरवठा आज दुपारी सुमारे साडेतीन तास ठप्प होता. युद्धपातळीवर बिघाड दुरूस्त करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असला तरी पाणीपुरवठ्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबई आणि ठाण्यातील नागरिकांना याची मोठ्या प्रमाणात झळ बसणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका एल वॉर्डच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकाम? - सविस्तर वृत्त
असल्फा येथे अनधिकृत आणि धोकादायक बांधकाम करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत महापालिकेने साकीनाका पोलिसांना लेखी पत्र देऊन तब्बल दोन वर्षे उलटली तरी अद्याप पोलीस त्याकडे डोळेझाक करीत कोणतीही कारवाई करीत नसल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत या भागातील अनेक सोसायटींनी पाठपुरावा करूनही पोलीस दाद देत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. परेरावाडी, साईबाबा मंदिर समोर, पाईप लाईन, साकीनाका, मुंबई येथील अनधिकृत रित्या बांधण्यात आलेली आशीर्वाद धाम हौसिंग सोसायटी कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारच्या निकषांनुसार BMC रुग्णालयांसाठी बॉडी बॅग्जची खरेदी - महापालिका
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपयोगात आणण्यात येणा-या ‘बॉडी बॅग्स’ या केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच घेतल्या गेलेल्या आहेत, असं बीएमसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महापालिकेद्वारे सदरहू बॉडी बॅग्स खरेदी करण्यासाठी संकेतस्थळाच्या मार्फत खुल्या पद्धतीने तीन वेळा स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात आली. 10 एप्रिल 2020 रोजी मागविण्यात आलेल्या पहिल्या स्वारस्याच्या अभिव्यक्तीला प्रतिसाद न मिळाल्यामुळे 21 एप्रिल 2020 रोजी दुसऱ्यांदा स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात आली परंतु त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे 2 मे 2020 तिसऱ्यांदा स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात आली होती, असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पालिकेचा २०-२१'चा अर्थसंकल्प ३३,४३४.५० कोटीचा; राखीव निधीतून ४३८० कोटीचं कर्ज घेणार
बंद झालेला जकात कर, मालमत्ता कराच्या वसुलीत झालेली घट आणि मंदीमुळे आटलेले विकास शुल्क आदी विविध कारणांमुळे देशातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या महसुलात घट झाली असून या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी मंगळवारी मुंबई महापालिकेचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ढिसाळ सरकारी वैद्यकीय यंत्रणेमुळे KEM इस्पितळात निष्पाप प्रिन्सचा अखेर मृत्यू
परळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये भाजलेल्या अडीच महिन्यांच्या प्रिन्सचा गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला. हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्सची काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. तो उपचारांना काहीसा प्रतिसाद देत नव्हता. शिवाय, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच त्याच्या प्रकृतीबाबतची सर्व माहिती पालकांना देण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईच्या महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर शिवसेनेच्या उमेदवार
शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना मुंबईच्या नव्या महापौर होणार आहेत. शिवसेनेकडून त्यांनी महापौरपदाच्या उमेदवार म्हणून आज अर्ज भरला आहे. पेडणेकर या पालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका असून त्यांनी पालिकेच्या विविध पदांवर काम केलं आहे. आक्रमक नगरसेविका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे सुहास वाडकर यांनी अर्ज भरला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पालिका कंत्राटदारांवरील धाडीमार्गे सेना लक्ष? राज्यात सत्ता येताच सेना उत्तर देणार?
मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेचे बिनसले असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्राप्तीकर विभागाने सेनेच्या ताब्यातील महापालिकेतील कंत्राटदारांवर छापे टाकले आहेत. यावरून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी शिवसेना पक्ष नैत्रुत्वाच्या विरुद्ध आघाडी उघडल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, राज्यात सत्ता स्थापन होताच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी देखील भाजपच्या संबंधित घोटाळ्यांमध्ये लक्ष घालण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी चालवलेला हा खेळ काही दिवसचं बघायचा आणि सत्ता येताच चोख प्रतिऊत्तर द्यायचं अशी चर्चा शिवसेना आणि मित्रपक्षांमध्ये रंगली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अनधिकृत फेरीवाले: कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटले दाखल करण्याची गरज?
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३५३ नुसार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला असून १४ तारखेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिकारी पी एस काळे यांनी दिले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याची महापालिका सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संदीप देशपांडे यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता, कोर्टाने त्यांना १४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पालिका अधिकारी कलम ३५३चा गैरवापर करून हुकूमशाही राबवत आहेत? सविस्तर
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३५३ नुसार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला असून १४ तारखेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिकारी पी एस काळे यांनी दिले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याची महापालिका सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संदीप देशपांडे यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता, कोर्टाने त्यांना १४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रनामा इफेक्ट: मुंबईतील शहाजी राजे भोसले संकुलातील स्विमिंग पुल अखेर सभासदांसाठी खुला
मुंबई महापालिकेतील गलथान कारभाराचे आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार अजून एक प्रकरण उजेडात आला होता. मुंबई पालिकेशी संबंधित शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठाण’ सामान्यांच्या पैशाचा चुराडा आणि गैरप्रकार करत असल्याचं महाराष्ट्रनामा टीमने उजेडात आणलं होतं. याच विषयाला अनुसरून आम्ही अंधेरी शहाजी राजे भोसले संकुलाच्या स्विमिंग पुलाची वार्षिक सभासद फीस भरणाऱ्या शंकर येराम यांची आमच्या टीमने प्रत्यक्ष भेट घेतली होती. मात्र हा विषय केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नसल्याने, त्यांच्यासारख्या हजारो लोकांनी येथे स्वामिंग पुलाच्या वापरासाठी वार्षिक सदस्यता फीस भरली होती.
5 वर्षांपूर्वी -
शहाजी राजे भोसले संकुल; स्विमिंग पुल व ललितकला प्रतिष्ठान; गैरप्रकाराच्या संशयावरून जनहित याचिका दाखल होणार
मुंबई महापालिकेतील गलथान कारभाराचे आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार अजून एक प्रकरण उजेडात आलं आहे. मुंबई पालिकेशी संबंधित शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठाण’ सामान्यांच्या पैशाचा चुराडा आणि गैरप्रकार करत असल्याचं उजेडात आलं आहे. याच विषयाला अनुसरून आम्ही अंधेरी शहाजी राजे भोसले संकुलाच्या स्विमिंग पुलाची वार्षिक सभासद फीस भरणाऱ्या शंकर येराम यांची प्रत्यक्ष भेट घेतली. मात्र हा विषय केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नसून, त्यांच्यासारख्या हजारो लोकांनी येथे स्वामिंग पुलाच्या वापरासाठी वार्षिक सदस्यता फीस भरली आहे.
5 वर्षांपूर्वी -
BLOG : ५ रुपये भी बोहोत बडी चीज होती है बाबू!
एखाद्या सर्वसामान्य मुंबईकराला रेसकोर्स मध्ये धावणाऱ्या घोड्याच्या ताशी वेगापेक्षा मुंबई लोकलचा वेग आणि वेळ हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. खरं मुंबईकराच आयुष्य जगायचं असेल तर लोकलमधून प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही. मुंबई लोकल मेरी जान हे जरी खरं असलं तरी बेस्टच्या बस ही मुंबईच्या रस्त्यांची शान आहे. लोकल हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे ह्यात शंका नाही.
5 वर्षांपूर्वी -
ना भेट, ना शब्द, उद्धव ठाकरे किती असंवेदनशील आहेत ते आज मुंबईकरांनी पाहिलं
मुंबई : मुंबई महापालिका ते दिल्लीत खुर्च्या उबवणाऱ्या शिवसेना नेत्यांची तसेच उद्धव ठाकरे यांची मुंबई शहर आणि मुंबईकरांप्रती असलेली असंवेदनशीलता आज अधोरेखित झाली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल येथील पादचारी पूल काल रात्री कोसळून अनेकजण मृत्युमुखी पडले आणि जखमी देखील झाले. परंतु, मुंबई महापालिकेत सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी चकार शब्द देखील काढला नाही, ना जागेची पाहणी केली, ना मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, ना जखमी झालेल्यांची विचारपूस केली.
6 वर्षांपूर्वी -
टोलवाटोलवीनंतर मुंबई महापालिकेची कबुली, त्या पुलाची जबाबदारी आमची होती
महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत ६ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटने नंतर शिवसेना प्रणित मुंबई महानगर पालिका आणि रेल्वे मध्ये चांगलीच टोलवाटोलवी रंगली. सुरुवातीला तर दोघांनीही एकमेकांकडे बोट दाखवत आपली जबाबदारी सपशेल झटकली.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो