संसदेच्या नव्या इमारतीचं उदघाटन आणि शाहरुख खानचं मोदींची स्तुती करणारं ट्विट ही CBI रडारवरील समीर वानखेडेंसाठी धोक्याची घंटा?
New Parliament Inauguration | बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटांद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख खानचे हे दोन्ही सिनेमे यावर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. तत्पूर्वी, पठाण चित्रपटातील ‘भगवी बिकनी’ वादानंतर भाजपने शाहरुख खानला प्रचंड लक्ष केलं होतं. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी शाहरुख खानवर धार्मिक टिपण्या करत खळबळजनक वक्तव्य करत केली होती. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी शाहरुख खानची प्रेत यात्रा देखील काढली होती. मात्र आता भाजपचे नेते आणि पदाधिकारी अचानक शाहरुख खानचे गुणगान गाऊ लागले आहेत.
2 वर्षांपूर्वी