महत्वाच्या बातम्या
-
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी अंडरवर्ल्डकडून धमकी
मराठी अभिनेते तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी गेल्या काही दिवसांपासून अंडरवर्ल्डकडून धमकीचे मेसेज येत असल्याची तक्रार मांजरेकर यांनी दादर पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रार अर्जावरून दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे धमकीचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांच्या मोबाईल क्रमांकावरून येत होते.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आदित्य चोप्रांचा जबाब नोंदवला
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सध्या त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. परंतु अद्यापही त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण समोर आलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येबाबतीत आतापर्यंत ३५ जबाब नोंदवण्यात आले आहेत. आता वांद्रे पोलिसांनी दिग्दर्शक आदित्य चोप्रांचा जबाब नोंदवला आहे. तब्बल चार तासांच्या या प्रक्रियेनंतर ते पोलीस स्थानकाबाहेर आले.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्साळींची मुंबई पोलिसांकडून चौकशी
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. सुशांतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी कलाविश्वातील अनेक दिग्गजांवर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच सध्या पोलीस यंत्रणा या प्रकरणी कसून चौकशी करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे मुंबईत निधन
बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यानंतर सरोज खान यांना २० जून रोजी वांद्रे येथील गुरु नानक रुग्णालयात दाखल केले होते. आज सरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तसेच त्यांची कोविड-१९ची चाचणीही घेतली होती. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, मालाड येथील मिठी चौकी कब्रिस्तानमध्ये सरोज खान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
5 वर्षांपूर्वी -
जेव्हा दिग्गज करोडपती कलाकारांना पेट्रोलचे भाव परवडत नव्हते...ते PR मॅनेजमेंट
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. देशात आज सलग विसाव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. आज डिझले 17 पैशांनी, तर पेट्रोल 21 पैशांनी महागले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८०.१३ रुपये झाले असून डिझेलचे दर प्रति लिटर ८०.१९ रुपये झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानची प्रथमच समाज माध्यमांवर प्रतिक्रिया
सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमधील नेपोटीझ्मवर जोरदार चर्चा रंगतेय. सलमान खान, आलिया भट्ट, सोनम कपूर, करिना कपूर, शाहीद कपूर, सैफ अली खान यांच्यावर चहुबाजुनी टीका होतेयं. या सेलिब्रिटींच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरील फॉलोअर्स कमी झालेयत. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवरुन त्यांना ट्रोल केलं जातंय. ट्वीटरवर देखील सुशांत सिंह राजपूत नाव ट्रेंड होतंय. या पार्श्वभुमीवर सलमान खान पहिल्यांदाच बोललाय. सुशांतच्या फॅन्सना सपोर्ट करण्याचे आवाहन त्याने आपल्या फॅन्सना केलंय.
5 वर्षांपूर्वी -
आजीसोबत अदा शर्माने धरला ‘या’ गाण्यावर ठेका
आजीसोबत अदा शर्माने धरला ‘या’ गाण्यावर ठेका
7 वर्षांपूर्वी -
पद्मावती सिनेमा पुढील महिन्यात रिलीज होण्याची शक्यता, नावात ही बदल ?
सुरवातीपासूनच राजकीय वादात अडकलेल्या पद्मावती सिनेमाचे शुक्लकाष्ट अजूनही कमी होताना दिसत नाही. अगदी सेन्सॉर बोर्डाने ही पासिंग सर्टिफिकेट नाकारल्याचे समजतंय. त्यामुळे हा सिनेमा रिलीज होणार की नाही हे अजून जुलदस्त्यातच आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम